या पद्धती अवलंबल्यास कधी करावी लागणार नाही कॉन्टेक्ट डिलीट होण्याची चिंता, बदल कितीही फोन, सर्व नंबर राहतील सोबत

नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा आनंद वेगळा असतो. आणि का असू नये दिवसातील बराच वेळ आपण आपल्या मोबाईल फोन सोबतच घालवतो. नवीन फोन मध्ये नवनवीन ऍप्स इंस्टाल होतात, कॅमेऱ्याने फोटो काढले जातात आणि नवीन गेम्स डाउनलोड केले जातात. प्रत्येक गोष्ट करताना मजा येते पण जेव्हा गोष्ट कॉन्टेक्ट्सची येते तेव्हा अनेक मोबाईल युजरला चिंता सतावते कि कशाप्रकारे जुन्या फोनचे कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये आणावे. आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्प्या टिप्स सांगणार आहोत, ज्या अवलंबल्यास कितीही फोन्स बदलेले तरी कॉन्टेक्ट्स डिलीट होण्याची चिंता रहाणार नाही.

अश्याप्रकारे करा नंबर सेव

1. फोन मध्ये नंबर सेव करण्याचा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे कि ते फोन मेमरी किंवा सिम मेमरी मध्ये नाही तर गुगल अकांउट वर सेव करावे.

2. सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन गुगल आधारित असतात आणि त्यात जीमेल अकाउंट सोबतच लॉग-इन करता येते.

3. जेव्हा नवीन फोन सेटअप करता तेव्हा जीमेलचा ‘कॉन्टेक्ट सिंक’ ऑन करा.

4. सिंक ऑन झाल्यानंतर कॉन्टेक्ट्स किंवा फोन बुक मध्ये जाऊन कॉन्टेक्स सेव करण्याचे लोकेशन बाय डिफॉल्ट ‘जीमेल’ वर सेट करा.

5. असे केल्यावर तुम्ही जे कॉन्टेक्ट तुमच्या फोन मध्ये सेव कराल ते सर्व जीमेल अकाउंट वर सेव होतील. आणि नंतर कोणत्याही फोन मध्ये तुमचे जीमेल अकाउंट लागइन करून तुमचे सर्व कॉन्टेक्ट्स त्या फोन मध्ये डाउनलोड करू शकता.

जुन्या फोनचे कॉन्टेक्ट असे करा नवीन फोन मध्ये ट्रांसफर

1. जुन्या फोन मध्ये ‘सेटिंग्स’ मध्ये जीमेल अकाउंट वर जाकर ‘सिंक’ ऑप्शन उघडा.

2. इथे ‘कॉन्टेक्ट’ ऑप्शन वर जाऊन तो ऍक्टिव्हेट करा.

3. कॉन्टेक्ट सिंक ऑन करून, सर्व कॉन्टेक्ट्सचा बॅकअप जीमेल अकाउंट वर घ्या.

4. त्यानंतर नवीन फोन मध्ये त्याच जीमेल अकाउंटने लॉगइन करा, ज्यावर जुन्या फोन मध्ये बॅकअप घेतला आहे.

5. नवीन फोन मध्ये पण कॉन्टेक्ट्स सिंक ऑन करा, असे केल्यावर आपोआप सर्व कॉन्टेक्ट्स फोन बुक मध्ये डाउनलोड होतील.

मेमरी कार्डच्या माध्यमातून बॅकअप

1. जर तुम्ही फोन मध्ये माइक्रोएसडी कार्डचा वापर करत असाल तर तो जुन्या फोन मध्ये टाका.

2. कॉन्टेक्ट लिस्ट किंवा फोनबुक मध्ये जाऊन इंपोर्ट/एक्सपोर्ट कॉन्टेक्ट ऑप्शन वर क्लिक करा.

3. इथे एक्सपोर्ट कॉन्टेक्टच्या ऑप्शन वर जा आणि ‘एक्सपोर्ट टू स्टोरेज डिवायस’ किंवा ‘एक्सपोर्ट टू कार्ड’ सिलेक्ट करा, इथे कॉन्टेक्ट लिस्टच्या फाईलला तुमच्या सोयीनुसार नाव पण देता येईल.

4. कॉन्टेक्ट एक्सपोर्ट झाल्यानंतर मेमरी कार्ड जुन्या फोन मधून काढून नवीन फोन मध्ये टाका.

5. इथे पण फोनबुक मध्ये इंपोर्ट/एक्सपोर्ट कॉन्टेक्ट वर जाऊन, ‘इंपोर्ट फ्रॉम स्टोरेज डिवायस’ किंवा ‘इंपोर्ट फ्रॉम कार्ड’ चा ऑप्शन निवडा.

इथे तुमच्या द्वारे सेव केलेली कॉन्टेक्ट फाईल सिलेक्ट केल्यावर त्यातील सर्व कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये डाउनलोड होतील. वर सांगितलेल्या सर्व ऑप्शन्स मध्ये तुमचे कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये येतील तसेच तुमच्या मेमरी कार्ड आणि जीमेल अकाउंट वर पण सेव राहतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिथे ठेऊ शकता किंवा डिलीट पण करू शकता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here