Battlegrounds Mobile India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 28 May 2021 12:07:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Battlegrounds Mobile India चा लॉन्च 18 जून! जाणून घ्या या गेमसंबंधित 5 मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-release-date-leaked-know-everything/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-release-date-leaked-know-everything/#respond Fri, 28 May 2021 12:07:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11021 Battleground Mobile India देशात कधी लॉन्च केला जाईल याचा अधिकृत खुलासा अजूनतरी झाला नाही. क्राफ्टनने गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन लिंक 18 मेपासून ओपन केली आहे. अँड्रॉइड युजर प्ले स्टोरवर जाऊन या गेमसाठी प्री-रजिस्टर करू शकतात.

The post Battlegrounds Mobile India चा लॉन्च 18 जून! जाणून घ्या या गेमसंबंधित 5 मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG च्या नवीन अवतार Battlegrounds Mobile India च्या लॉन्चपूर्वीच फॅन्स या गेमबद्दल खूप उत्साहित आहेत. जशी जशी या गेमसंबंधित माहिती समोर येत आहे तसा तसा या गेमच्या चाहत्यांचा उत्साह वाढत आहे. कंपनीव्यतिरिक्त लीकमध्ये पण या गेमबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. कंपनीने अजूनतरी या गेमची लॉन्चिंग डेट अधिकृतपणे सांगितली नाही. पण एका नवीन लीकमध्ये समोर आले आहे कि या गेमची लॉन्च डेट 18 जून असेल. जर तुम्ही पण या नवीन पबजीबद्दल उत्साहित असाल तर आम्ही तुम्हाला या गेमसंबंधित पाच मोठ्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमचा उत्साह अजून वाढवतील.

Battleground Mobile India चे प्री-रजिस्ट्रेशन

Battleground Mobile India देशात कधी लॉन्च केला जाईल याचा अधिकृत खुलासा अजूनतरी झाला नाही. क्राफ्टनने गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन लिंक 18 मेपासून ओपन केली आहे. अँड्रॉइड युजर प्ले स्टोरवर जाऊन या गेमसाठी प्री-रजिस्टर करू शकतात. पण, अजून आयओएस युजर्ससाठी गेमचे प्री-रजिस्ट्रेशन सुरु झाले नाही.

Battlegrounds Mobile India

जाणून घ्या Battlegrounds Mobile India संबंधित 5 मोठ्या गोष्टी

नवीन असेल प्रायव्हसी पॉलिसी

क्राफ्टॉनने सांगितले आहे कि गेममध्ये यावेळी नवीन प्राइवेसी पॉलिसी असेल. नवीन पॉलिसीनुसार, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या प्लेयर्सना गेम खेळण्यासाठी आपल्या खेलनेसाठी असहमती घ्यावी लागेल. पालकांना, ज्यांना वाटते कि त्यांच्या पाल्याने त्यांच्या परवानगीविना खाजगी माहिती दिली आहे, ते डेवलपरकडे संपर्क करू शकतात आणि सिस्टमवरून माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकतात. पबजी प्रमाणेच या गेममध्ये खेळण्याची वेळ मर्यादित केली जाऊ शकते. कंपनीने याची पुष्टी केली नाही, परंतु PUBG Mobile मध्ये पण प्लेयर्सना गेम खेळण्यापासून रोखण्यासाठी गेमप्ले टाइम मर्यादित करण्यात आला होता. असंच काहीसं बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये पण मिळू शकते.

नवीन नावासह येतील जुने मॅप

Battleground Mobile India द्वारे अलीकडेच आलेल्या टीजरवरून समजले होते कि या गेममध्ये PUBG Mobile प्रमाणे ERANGEL मॅप पण असेल, पण टीजरमध्ये मॅपच्या नावाची शेवटची अक्षरे बदलण्यात आली आहेत. या मॅपचे नाव ERANGEL च्या ऐवजी ERANGLE लिहण्यात आले आहे. याआधी डेवलपर्सनी Sanhok मॅपचे एक ठिकाण पण टीज केला आहे, त्यामुळे अंदाज लावला जात आहे कि गेममध्ये Sanhok मॅप पण असेल. परंतु याचे नाव काय असेल, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. जर गेममध्ये दोन मॅप्स असतील तर Miramar किंवा Karakin मॅपचा पण समावेश होण्याची शक्यता आहे. डेवलपर्सनी याबाबत माहिती दिली नाही परंतु, येत्या काही दिवसांत आपल्याला मॅप्सबद्दल अजून काही टीजर्सची अपेक्षा आहे. असे पण असू शकते कि हे मॅप्स Krafton नवीन नावांसह सादर करू शकते. तसेच Google Play Store वरील लिस्टिंगमधील स्क्रीनशॉटमध्ये एक नवीन लोकेशन दिसत आहे. कदाचित नवीन गेममध्ये एक नवीन मॅप मिळेल.

battlegrounds mobile india sanhok map featured

इन-गेम फीचर्स असतील

Krafton नुसार या गेममध्ये खास भारतासाठी इन-गेम फीचर्स असतील, जसे कि आउटफिट आणि स्किन. तसेच, भारतीय प्लेयर्ससाठी एक्सक्लूसिव ई-स्पोर्टस इकोसिस्टम पण बनवण्यात येईल, ज्यात स्पेशल टूर्नामेंट आणि लीगचा समावेश असेल. गेममध्ये ग्लाइडर (Glider) पण टाकण्यात आला आहे, जो ग्लोबल PUBG Mobile मध्ये पण आला आहे. कंपनीच्या पोस्टरमध्ये नवीन कॅरेक्टर पण दिसत आहेत.

रक्ताचा रंग असेल हिरवा

PUBG Mobile बॅन करण्यामागे भारत सरकारने हिंसा आणि व्यसन हि कारणे सांगितली होती, त्यामुळे Battlegrounds Mobile India मधील हिंसेत पण काही बदल दिसू शकतात. चीनमध्ये Game for Peace वर्जन प्रमाणेच या वर्जनमध्ये पण रक्ताचा लाल इफेक्ट हिरव्या रंगाने बदलला जाऊ शकतो. गेम खेळताना वेळ मर्यादित केली जाऊ शकते.

स्क्वाडसोबतच वन-ऑन-वन गेम प्ले असेल

गुगल प्ले स्टोरच्या लिस्टिंगमध्ये असलेल्या माहितीवरून समजले आहे कि यात स्क्वाड मोडसोबत वन-ऑन-वन गेमप्लेचा पर्याय असेल. गेम Unreal Engine 4 मध्ये बनलेला आहे आणि 3D साउंडला सपोर्ट करतो. लॉन्चपूर्वी आठवड्यात लॉन्च वीक इवेंट्स आयोजित केले जातील आणि प्लेयर्सकडे एक्सक्लूसिव आउटफिट्स जिंकण्याची संधी असेल. विशेष म्हणजे गेमचे प्री-रजिस्ट्रेशन पण सुरु आहे आणि जे प्लेयर्स गेमसाठी प्री-रजिस्टर करतील त्यांना काही एक्सक्लूसिव रिवॉर्ड पण मिळतील.

The post Battlegrounds Mobile India चा लॉन्च 18 जून! जाणून घ्या या गेमसंबंधित 5 मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-release-date-leaked-know-everything/feed/ 0
Battlegrounds Mobile India ची लॉन्च डेट आली समोर, बघा कधी करता येईल तुमच्या फोनमध्ये Download https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-launch-date/#respond Thu, 20 May 2021 12:41:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10996 BattleGrounds Mobile India गेम भारतात 18 मेपासून प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स गुगल प्ले स्टोरवर जाऊन रजिस्टर करता येईल. काही दिवसातच हजारो मोबाईल युजरनी या गेमसाठी नोंदणी केली आहे.

The post Battlegrounds Mobile India ची लॉन्च डेट आली समोर, बघा कधी करता येईल तुमच्या फोनमध्ये Download first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG ची वाट जितकी भारतीयांनी बघितली असेल तेवढी कदाचित इतर कोणीही केली नसेल. गेम निर्माता कंपनी KRAFTON ने जेव्हा घोषणा केली होती कि PUBG Mobile एक नवीन रंग रुपासह भारतात लॉन्च होणार आहे तेव्हा मोबाईल युजर्सचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा गेम BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने भारतात पुन्हा येत आहे आणि याचे स्वागत पण मोबाईल गेमर्सने मोठ्या उत्सहाने केले आहे. गेल्या 18 मेला हा गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया देशात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला होता. तसेच आता या गेमची लॉन्च डेट म्हणजे रिलीज तारीख पण समोर आली आहे. (battlegrounds mobile india launch date)

BattleGrounds Mobile India गेम भारतात 18 मेपासून प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स गुगल प्ले स्टोरवर जाऊन रजिस्टर करता येईल. काही दिवसातच हजारो मोबाईल युजरनी या गेमसाठी नोंदणी केली आहे. प्री-रजिस्ट्रेशन नंतर आता या गेमचीची लॉन्च डेट पण समोर येत आहे. KRAFTON कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे गेमची रिलीज डेट सांगितली नाही परंतु मीडिया रिपोर्टमध्ये समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 18 जूनपासून भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.

18 जूनला BattleGrounds Mobile India गेम भारतात लॉन्च होईल आणि त्यादिवसापासून स्मार्टफोन युजर त्यांच्या मोबाईल फोनमध्ये हा गेम डाउनलोड करू शकतील. हि माहिती आईजीएन इंडियाच्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे जो वेबसाइटने इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे. कंपनीने आतापर्यंत कोणत्याही लॉन्च डेटची अधिकृत माहिती दिली नाही परंतु इतर लीकमध्ये असे पण समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 10 जूनला पण कंपनीद्वारे डाउनलोड व इंस्टालसाठी सादर केला जाऊ शकतो. 91मोबाईल्स अजूनतरी कोणत्याही तारखेला दुजोरा दिला नाही.

अश्याप्रकारे करा BattleGrounds Mobile India साठी प्री-रजिस्टर

PUBG Mobile भारतात BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने पुन्हा येत आहे, ज्याचे प्री-रजिस्ट्रेशन 18 मेपासून सुरु झाले आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी यावर तुमचे अकाउंट बनवता येईल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. तुमच्या Android SmartPhone मध्ये Google Play Store ओपन करा.

2. गुगल प्ले स्टोरमध्ये BATTLEGROUNDS MOBILE INDIA सर्च करा, किंवा (या लिंकवर ) क्लिक करा.

3. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम उघडल्यानंतर तिथे “Pre-Register” चे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. तिथे युजरचे नाव, वय, ईमेल आयडी आणि डिवायस कम्पॅटबिलटी चेक केली जाईल.

5. आवश्यक डिटेल सबमिट केल्यानंतर मोबाईल गेम मध्ये युजरचे अकाउंट तयार होईल.

सांगू इच्छितो कि BATTLEGROUNDS MOBILE INDIA साठी प्री-रजिस्टर केल्यावर गेम निर्माता कंपनीकडून युजर्सना काही स्पेशल रिवॉर्ड्स पण दिले जातील जे गेममध्ये वापरता येतील. रजिस्टर झाल्यावर जेव्हा गेम लॉन्च होईल आणि फोनमध्ये डाउनलोड करून रन केला जाईल, तेव्हा हे स्पेशल रिवॉर्ड तुमच्या युजरच्या गेम अकाउंटवर क्रेडिट केले जातील. या रिवॉर्ड्समध्ये गेम स्कीन, प्लेयर ड्रेस, एक्स्ट्रा पॉईंट्स व गन इत्यादींचा समावेश होऊ शकतो.

The post Battlegrounds Mobile India ची लॉन्च डेट आली समोर, बघा कधी करता येईल तुमच्या फोनमध्ये Download first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-launch-date/feed/ 0
अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु https://www.91mobiles.com/marathi/how-to-pre-register-battlegrounds-mobile-india-in-android-smartphone-full-steps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-pre-register-battlegrounds-mobile-india-in-android-smartphone-full-steps/#respond Tue, 18 May 2021 12:28:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10955 BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम आजपासून भारतात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे. KRAFTON कंपनीने आज भारतात PUBG Mobile च्या नवीन आणि देशी वर्जनच्या प्री-रजिस्ट्रेशन लिंक ऑफिशियल केली आहे आणि अश्याप्रकारे गुगल प्ले स्टोरवर पण या गेमचे पदार्पण झाले आहे.

The post अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज जे लोक अंथरुणावर पडून इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हिडीओज स्क्रॉल करत आहेत ते गेल्यावर्षी वेगळ्याच एडवेंचरमध्ये आयुष्य घालवत होते. आणि हे एडवेंचर होते PUBG Mobile. पबजी मोबाईल भारतात बॅन झाल्यावर हजारो लोकांच्या आयुष्य रटाळ झाले होते. परंतु जेव्हा गेल्या आठवड्यात घोषणा झाली कि PUBG Mobile गेम BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने भारतात पुन्हा येणार आहे तेव्हा लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हाच आनंद आता चार पाऊले पुढे नेत गेम निर्माता कंपनी KRAFTON ने घोषणा केली आहे कि आजपासून BATTLEGROUNDS MOBILE INDIA देशात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध होत आहे. (How to pre register Battlegrounds Mobile India in android smartphone full steps)

BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम आजपासून भारतात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे. KRAFTON कंपनीने आज भारतात PUBG Mobile च्या नवीन आणि देशी वर्जनच्या प्री-रजिस्ट्रेशन लिंक ऑफिशियल केली आहे आणि अश्याप्रकारे गुगल प्ले स्टोरवर पण या गेमचे पदार्पण झाले आहे. या गेमची आतुरतेने वाट बघणाऱ्या मोबाईल युजर्सना नक्कीच जाणून घ्यायचे असेल कि कशाप्रकारे आणि कुठून बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमसाठी रजिस्ट्रर करता येईल. लोकांच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही पुढे दिले आहे. परंतु सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि हा आनंद फक्त Android युजर्सच्या वाट्याला आला आहे, iPhone ग्राहकांना अजून वाट बघावी लागू शकते.

battlegrounds mobile india pre register image

BATTLEGROUNDS MOBILE INDIA अश्याप्रक्रारे करा रजिस्टर

PUBG Mobile भारतात BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने पुन्हा येत आहे, ज्याचे प्री-रजिस्ट्रेशन 18 मेपासून सुरु झाले आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी यावर तुमचे अकाउंट बनवता येईल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. तुमच्या Android SmartPhone मध्ये Google Play Store ओपन करा.

2. गुगल प्ले स्टोरमध्ये BATTLEGROUNDS MOBILE INDIA सर्च करा, किंवा (या लिंकवर ) क्लिक करा.

3. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम उघडल्यानंतर तिथे “Pre-Register” चे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. तिथे युजरचे नाव, वय, ईमेल आयडी आणि डिवायस कम्पॅटबिलटी चेक केली जाईल.

5. आवश्यक डिटेल सबमिट केल्यानंतर मोबाईल गेम मध्ये युजरचे अकाउंट तयार होईल.

सांगू इच्छितो कि BATTLEGROUNDS MOBILE INDIA साठी प्री-रजिस्टर केल्यावर गेम निर्माता कंपनीकडून युजर्सना काही स्पेशल रिवॉर्ड्स पण दिले जातील जे गेममध्ये वापरता येतील. रजिस्टर झाल्यावर जेव्हा गेम लॉन्च होईल आणि फोनमध्ये डाउनलोड करून रन केला जाईल, तेव्हा हे स्पेशल रिवॉर्ड तुमच्या युजरच्या गेम अकाउंटवर क्रेडिट केले जातील. या रिवॉर्ड्समध्ये गेम स्कीन, प्लेयर ड्रेस, एक्स्ट्रा पॉईंट्स व गन इत्यादींचा समावेश होऊ शकतो.

The post अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-pre-register-battlegrounds-mobile-india-in-android-smartphone-full-steps/feed/ 0
PUBG फॅन्ससाठी खुशखबर: Battlegrounds Mobile India डाउनलोडसाठी उपलब्ध, परंतु… https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-pubg-mobile-apk-download-link-fake/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-pubg-mobile-apk-download-link-fake/#respond Tue, 11 May 2021 13:46:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10894 प्रसिद्ध पबजी मोबाईल कॉमेंटेटर ओशन शर्मा यांनी न्यूज वेबसाइट Sportskeeda ला सांगितले कि बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेमची APK जूनमध्ये उपलब्ध होईल.

The post PUBG फॅन्ससाठी खुशखबर: Battlegrounds Mobile India डाउनलोडसाठी उपलब्ध, परंतु… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पबजी मोबाईल गेम (PUBG Mobile) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच पबजी फॅन्सना खुशखबर देत KRAFTON कंपनीने सांगितले होते कि भारतात हा गेम नवीन नाव Battlegrounds Mobile India सह आणला जात आहे. तेव्हापासून फॅन्स या गेमच्या लॉन्च डेटची वाट बघत आहेत. आतापर्यंत कंपनीने या गेमच्या लॉन्च डेटची अधिकृत घोषणा तर केली नाही, पण युजर्समध्ये या गेमचे वेड इतके आहे कि ते प्रतीक्षा करू शकत नाहीत. आणि त्यांनी हा गेम इंटरनेटवर शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे Battlegrounds Mobile India शोधणाऱ्या लोकांना खोटी APK फाइल किंवा डाउनलोड लिंक मिळत आहे जी तुमच्या फोनचे नुकसान करू शकते. (Battlegrounds Mobile India PUBG mobile apk download link fake)

खोट्या लिंकचा आला पूर

गेल्या आठवड्यात गेमची घोषणा केल्यानंतर सायबर क्रिमिनल्सनी इंटरनेटवर खोट्या डाउनलोड लिंक्सची एक मोठी यादी तयार केली आहे. या लिंकमध्ये Battlegrounds Mobile डाउनलोड करण्याचा दावा केला जात आहे. जर तुम्ही गुगलवर Battlegrounds Mobile सर्च केले तर तुम्हाला या गेमच्या डाउनलोडिंगसंबंधित हजारो पर्याय दिसतील. चुकूनही या लिंकवर क्लिक करू नका कारण हि लिंक तुमच्या फोनमधील खाजगी माहिती हॅकर्सच्या देऊ शकते.

हे देखील वाचा : Redmi K40 Gaming Enhanced Edition ला भारतात मिळाले BIS सर्टिफिकेशन, Poco ब्रँडिंगसह लवकरच होऊ शकतो लॉन्च

PUBG india launch

Battlegrounds Mobile India ची खरी APK

प्रसिद्ध पबजी मोबाईल कॉमेंटेटर ओशन शर्मा यांनी न्यूज वेबसाइट Sportskeeda ला सांगितले कि बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेमची APK जूनमध्ये उपलब्ध होईल. याचा अर्थ असा आहे कि अजूनतरी या गेमच्या चाहत्यांना एक महिना वाट बघावी लागेल. तसेच रिपोर्टमध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि गेमचा ट्रेलर पण या महिन्याच्या शेवटी प्रकाशित केला जाईल.

Battlegrounds Mobile India लॉन्च

सध्या Krafton ने या गेमसंबंधित एखाद्या APK फाइलची कोणतीही घोषणा केली नाही, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि या सर्व लिंक आणि APK फाइल ज्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर शेयर होत आहेत त्या नकली आहेत. बोलले जात आहे कि पुढल्या महिन्यात हा गेम डाउनलोडसाठी सादर केला जाऊ शकतो.

The post PUBG फॅन्ससाठी खुशखबर: Battlegrounds Mobile India डाउनलोडसाठी उपलब्ध, परंतु… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-pubg-mobile-apk-download-link-fake/feed/ 0