Battlegrounds Mobile India चा लॉन्च 18 जून! जाणून घ्या या गेमसंबंधित 5 मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही

PUBG च्या नवीन अवतार Battlegrounds Mobile India च्या लॉन्चपूर्वीच फॅन्स या गेमबद्दल खूप उत्साहित आहेत. जशी जशी या गेमसंबंधित माहिती समोर येत आहे तसा तसा या गेमच्या चाहत्यांचा उत्साह वाढत आहे. कंपनीव्यतिरिक्त लीकमध्ये पण या गेमबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. कंपनीने अजूनतरी या गेमची लॉन्चिंग डेट अधिकृतपणे सांगितली नाही. पण एका नवीन लीकमध्ये समोर आले आहे कि या गेमची लॉन्च डेट 18 जून असेल. जर तुम्ही पण या नवीन पबजीबद्दल उत्साहित असाल तर आम्ही तुम्हाला या गेमसंबंधित पाच मोठ्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमचा उत्साह अजून वाढवतील.

Battleground Mobile India चे प्री-रजिस्ट्रेशन

Battleground Mobile India देशात कधी लॉन्च केला जाईल याचा अधिकृत खुलासा अजूनतरी झाला नाही. क्राफ्टनने गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन लिंक 18 मेपासून ओपन केली आहे. अँड्रॉइड युजर प्ले स्टोरवर जाऊन या गेमसाठी प्री-रजिस्टर करू शकतात. पण, अजून आयओएस युजर्ससाठी गेमचे प्री-रजिस्ट्रेशन सुरु झाले नाही.

Battlegrounds Mobile India

जाणून घ्या Battlegrounds Mobile India संबंधित 5 मोठ्या गोष्टी

नवीन असेल प्रायव्हसी पॉलिसी

क्राफ्टॉनने सांगितले आहे कि गेममध्ये यावेळी नवीन प्राइवेसी पॉलिसी असेल. नवीन पॉलिसीनुसार, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या प्लेयर्सना गेम खेळण्यासाठी आपल्या खेलनेसाठी असहमती घ्यावी लागेल. पालकांना, ज्यांना वाटते कि त्यांच्या पाल्याने त्यांच्या परवानगीविना खाजगी माहिती दिली आहे, ते डेवलपरकडे संपर्क करू शकतात आणि सिस्टमवरून माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकतात. पबजी प्रमाणेच या गेममध्ये खेळण्याची वेळ मर्यादित केली जाऊ शकते. कंपनीने याची पुष्टी केली नाही, परंतु PUBG Mobile मध्ये पण प्लेयर्सना गेम खेळण्यापासून रोखण्यासाठी गेमप्ले टाइम मर्यादित करण्यात आला होता. असंच काहीसं बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये पण मिळू शकते.

नवीन नावासह येतील जुने मॅप

Battleground Mobile India द्वारे अलीकडेच आलेल्या टीजरवरून समजले होते कि या गेममध्ये PUBG Mobile प्रमाणे ERANGEL मॅप पण असेल, पण टीजरमध्ये मॅपच्या नावाची शेवटची अक्षरे बदलण्यात आली आहेत. या मॅपचे नाव ERANGEL च्या ऐवजी ERANGLE लिहण्यात आले आहे. याआधी डेवलपर्सनी Sanhok मॅपचे एक ठिकाण पण टीज केला आहे, त्यामुळे अंदाज लावला जात आहे कि गेममध्ये Sanhok मॅप पण असेल. परंतु याचे नाव काय असेल, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. जर गेममध्ये दोन मॅप्स असतील तर Miramar किंवा Karakin मॅपचा पण समावेश होण्याची शक्यता आहे. डेवलपर्सनी याबाबत माहिती दिली नाही परंतु, येत्या काही दिवसांत आपल्याला मॅप्सबद्दल अजून काही टीजर्सची अपेक्षा आहे. असे पण असू शकते कि हे मॅप्स Krafton नवीन नावांसह सादर करू शकते. तसेच Google Play Store वरील लिस्टिंगमधील स्क्रीनशॉटमध्ये एक नवीन लोकेशन दिसत आहे. कदाचित नवीन गेममध्ये एक नवीन मॅप मिळेल.

battlegrounds mobile india sanhok map featured

इन-गेम फीचर्स असतील

Krafton नुसार या गेममध्ये खास भारतासाठी इन-गेम फीचर्स असतील, जसे कि आउटफिट आणि स्किन. तसेच, भारतीय प्लेयर्ससाठी एक्सक्लूसिव ई-स्पोर्टस इकोसिस्टम पण बनवण्यात येईल, ज्यात स्पेशल टूर्नामेंट आणि लीगचा समावेश असेल. गेममध्ये ग्लाइडर (Glider) पण टाकण्यात आला आहे, जो ग्लोबल PUBG Mobile मध्ये पण आला आहे. कंपनीच्या पोस्टरमध्ये नवीन कॅरेक्टर पण दिसत आहेत.

रक्ताचा रंग असेल हिरवा

PUBG Mobile बॅन करण्यामागे भारत सरकारने हिंसा आणि व्यसन हि कारणे सांगितली होती, त्यामुळे Battlegrounds Mobile India मधील हिंसेत पण काही बदल दिसू शकतात. चीनमध्ये Game for Peace वर्जन प्रमाणेच या वर्जनमध्ये पण रक्ताचा लाल इफेक्ट हिरव्या रंगाने बदलला जाऊ शकतो. गेम खेळताना वेळ मर्यादित केली जाऊ शकते.

स्क्वाडसोबतच वन-ऑन-वन गेम प्ले असेल

गुगल प्ले स्टोरच्या लिस्टिंगमध्ये असलेल्या माहितीवरून समजले आहे कि यात स्क्वाड मोडसोबत वन-ऑन-वन गेमप्लेचा पर्याय असेल. गेम Unreal Engine 4 मध्ये बनलेला आहे आणि 3D साउंडला सपोर्ट करतो. लॉन्चपूर्वी आठवड्यात लॉन्च वीक इवेंट्स आयोजित केले जातील आणि प्लेयर्सकडे एक्सक्लूसिव आउटफिट्स जिंकण्याची संधी असेल. विशेष म्हणजे गेमचे प्री-रजिस्ट्रेशन पण सुरु आहे आणि जे प्लेयर्स गेमसाठी प्री-रजिस्टर करतील त्यांना काही एक्सक्लूसिव रिवॉर्ड पण मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here