Battlegrounds Mobile India ची लॉन्च डेट आली समोर, बघा कधी करता येईल तुमच्या फोनमध्ये Download

BattleGround Mobile India चा टीजर

PUBG ची वाट जितकी भारतीयांनी बघितली असेल तेवढी कदाचित इतर कोणीही केली नसेल. गेम निर्माता कंपनी KRAFTON ने जेव्हा घोषणा केली होती कि PUBG Mobile एक नवीन रंग रुपासह भारतात लॉन्च होणार आहे तेव्हा मोबाईल युजर्सचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा गेम BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने भारतात पुन्हा येत आहे आणि याचे स्वागत पण मोबाईल गेमर्सने मोठ्या उत्सहाने केले आहे. गेल्या 18 मेला हा गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया देशात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला होता. तसेच आता या गेमची लॉन्च डेट म्हणजे रिलीज तारीख पण समोर आली आहे. (battlegrounds mobile india launch date)

BattleGrounds Mobile India गेम भारतात 18 मेपासून प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स गुगल प्ले स्टोरवर जाऊन रजिस्टर करता येईल. काही दिवसातच हजारो मोबाईल युजरनी या गेमसाठी नोंदणी केली आहे. प्री-रजिस्ट्रेशन नंतर आता या गेमचीची लॉन्च डेट पण समोर येत आहे. KRAFTON कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे गेमची रिलीज डेट सांगितली नाही परंतु मीडिया रिपोर्टमध्ये समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 18 जूनपासून भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.

18 जूनला BattleGrounds Mobile India गेम भारतात लॉन्च होईल आणि त्यादिवसापासून स्मार्टफोन युजर त्यांच्या मोबाईल फोनमध्ये हा गेम डाउनलोड करू शकतील. हि माहिती आईजीएन इंडियाच्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे जो वेबसाइटने इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे. कंपनीने आतापर्यंत कोणत्याही लॉन्च डेटची अधिकृत माहिती दिली नाही परंतु इतर लीकमध्ये असे पण समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 10 जूनला पण कंपनीद्वारे डाउनलोड व इंस्टालसाठी सादर केला जाऊ शकतो. 91मोबाईल्स अजूनतरी कोणत्याही तारखेला दुजोरा दिला नाही.

अश्याप्रकारे करा BattleGrounds Mobile India साठी प्री-रजिस्टर

PUBG Mobile भारतात BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने पुन्हा येत आहे, ज्याचे प्री-रजिस्ट्रेशन 18 मेपासून सुरु झाले आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी यावर तुमचे अकाउंट बनवता येईल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. तुमच्या Android SmartPhone मध्ये Google Play Store ओपन करा.

2. गुगल प्ले स्टोरमध्ये BATTLEGROUNDS MOBILE INDIA सर्च करा, किंवा (या लिंकवर ) क्लिक करा.

3. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम उघडल्यानंतर तिथे “Pre-Register” चे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. तिथे युजरचे नाव, वय, ईमेल आयडी आणि डिवायस कम्पॅटबिलटी चेक केली जाईल.

5. आवश्यक डिटेल सबमिट केल्यानंतर मोबाईल गेम मध्ये युजरचे अकाउंट तयार होईल.

सांगू इच्छितो कि BATTLEGROUNDS MOBILE INDIA साठी प्री-रजिस्टर केल्यावर गेम निर्माता कंपनीकडून युजर्सना काही स्पेशल रिवॉर्ड्स पण दिले जातील जे गेममध्ये वापरता येतील. रजिस्टर झाल्यावर जेव्हा गेम लॉन्च होईल आणि फोनमध्ये डाउनलोड करून रन केला जाईल, तेव्हा हे स्पेशल रिवॉर्ड तुमच्या युजरच्या गेम अकाउंटवर क्रेडिट केले जातील. या रिवॉर्ड्समध्ये गेम स्कीन, प्लेयर ड्रेस, एक्स्ट्रा पॉईंट्स व गन इत्यादींचा समावेश होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here