Best 5G Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Oct 2022 12:48:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या https://www.91mobiles.com/marathi/new-5g-smartphone-guide-dont-miss-these-7-impotent-things/ https://www.91mobiles.com/marathi/new-5g-smartphone-guide-dont-miss-these-7-impotent-things/#respond Mon, 10 Oct 2022 12:48:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13850 New 5G Smartphone Guide: भारतात 5G ची प्रतीक्षा संपली असून दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क सादर केलं आहे. Airtel नं सर्वप्रथम 1 ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, नागपुर, बेंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तर रिलायन्स जियोनं मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G ची सुरुवात केली […]

The post New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
New 5G Smartphone Guide: भारतात 5G ची प्रतीक्षा संपली असून दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क सादर केलं आहे. Airtel नं सर्वप्रथम 1 ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, नागपुर, बेंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तर रिलायन्स जियोनं मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G ची सुरुवात केली आहे. पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतात 5G सेवेचा विस्तार होईल. परंतु 5G नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. म्हणून घाईत 5G स्मार्टफोन खरेदी करून पुढील 7 चुका करू नका.

New 5G Smartphone Guide: Dont Miss These 7 Impotent Things

सर्व 5G स्मार्टफोन सारखेच नसतात

5G चिपसेट असलेले स्मार्टफोन युजर्सना एक सारखा 5G इंटरनेट स्पीड देत नाहीत. त्यामुळे 5G स्मार्टफोन विकत घेताना थोडा रिसर्च करा. चांगला 5G स्मार्टफोन विकत घेण्याआधी प्रोसेसर, mmWave आणि sub-6GHz नक्की चेक करा. mmWave 5G बँडवर चांगला 5G स्पीड मिळणं अवलंबून आहे. तर sub-6GHz बँड देखील 4G पेक्षा चांगला स्पीड ऑफर देऊ शकतो, परंतु ह्याचा मुख्य वापर कव्हरेजसाठी होतो. हे देखील वाचा: मिस करू नका ही संधी! 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 6GB रॅम असलेला Realme चा दमदार 5G स्मार्टफोन

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

5G बँडला सपोर्टची माहिती घ्या

सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन 5G फोन किती बँड्सना सपोर्ट करतो, ते पाहा. टेक्नीकल बाब सोडली तर फोनमध्ये जितके जास्त 5G बँड सपोर्टेड असतील तितके चांगले. भारतात 5G स्मार्टफोनमध्ये 11 5G बँड किंवा त्यापेक्षा जास्त बँड देखील मिळतात.

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

लेटेस्ट तेच बेस्ट

भारतात गेल्या दोन वर्षांपासून 5G स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर लेटेस्ट लाँच झालेला 5G स्मार्टफोन घेणं केव्हाही चांगलं. लेटेस्ट लाँच फोनमध्ये जुन्या फोनच्या तुलनेत चांगला प्रोसेसर, सुधारित 5G स्पीड आणि कव्हरेज मिळेल. जुना 5G स्मार्टफोन कमी किंमतीत मिळेल परंतु 5G सर्व्हिस तेवढी चांगली देणार नाही.

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

बॅटरी देखील महत्वाची

5G स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्पीड खूप जास्त मिळतो, परंतु फोनमध्ये पावर कंज्मशन वाढतं. त्यामुळे स्मार्टफोन विकत घेताना जास्त बॅटरी कपॅसिटी असलेला ऑप्शन बघा. जर तुम्ही 6.5 इंच किंवा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले असलेला हँडसेट घेत असाल तर 5000mAh पेक्षा जास्त मोठी बॅटरी असणं आवश्यक आहे.

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

बजेट 5G स्मार्टफोनला कमी समजू नका

सुरुवातीला 5G सपोर्टसह महागडे आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन उपलब्ध झाले होते. परंतु आता 5G सपोर्टसह बजेट स्मार्टफोन देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सध्या बाजारात 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये शानदार डिस्प्ले रिजोल्यूशन, कॅमेरा सेन्सर आणि 5G स्पीड मिळतो. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

रेग्युलर अपडेट देखील आवश्यक

5G सध्या खूप नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे यात स्टेबिलिटी आणि कनेक्टिव्हिटीसाठी सॉफ्टवेयर अपडेट मिळू शकतात. त्यामुळे नवीन 5G स्मार्टफोन विकत घेताना अशा ब्रँडची निवड करा जिथे रेग्युलर आणि वेळेवर सॉफ्टवेयर अपडेट मिळतात. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

5G मुळे तुमच्या गरजा विसरू नका

5G स्मार्टफोन विकत घेताना तुमच्या गरजा देखील लक्षात ठेवा. फक्त 5G आहे म्हणून महागडा स्मार्टफोन घेऊ नका, त्यातील बॅटरी, कॅमेरा आणि डिस्प्ले क्वॉलिटीकडे देखील लक्ष असू देत. काही बजेट फोन देखील 5G सह चांगले स्पेसिफिकेशन्स देतात, त्यांची माहिती घ्या.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-5g-smartphone-guide-dont-miss-these-7-impotent-things/feed/ 0
20 हजारांच्या आत मिळणारे हे आहेत बेस्ट 5G फोन; दिवाळीत येणारं 5G Network वापरण्यासाठी व्हा सज्ज https://www.91mobiles.com/marathi/5g-launch-in-india-best-5g-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/5g-launch-in-india-best-5g-phone-under-rs-20000/#respond Tue, 30 Aug 2022 06:38:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12609 रिलायन्स जियोनं आपली 5G सेवा यंदा दिवाळीत सक्रिय होईल अशी घोषणा केली आहे. इतर कंपन्या देखील पुढील काही महिन्यांत भारतात 5G सर्व्हिस सादर करतील. ही सर्व्हिस वापरण्यासाठी तुमच्याकडे एक 5G फोन असणं आवश्यक आहे, त्यामुळे ग्राहक चांगल्या 5जी फोनचा शोध घेत आहेत. आता तर कमी रेंजमध्ये अनेक 5जी फोन आले आहेत परंतु आम्ही तुम्हाला अशा […]

The post 20 हजारांच्या आत मिळणारे हे आहेत बेस्ट 5G फोन; दिवाळीत येणारं 5G Network वापरण्यासाठी व्हा सज्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायन्स जियोनं आपली 5G सेवा यंदा दिवाळीत सक्रिय होईल अशी घोषणा केली आहे. इतर कंपन्या देखील पुढील काही महिन्यांत भारतात 5G सर्व्हिस सादर करतील. ही सर्व्हिस वापरण्यासाठी तुमच्याकडे एक 5G फोन असणं आवश्यक आहे, त्यामुळे ग्राहक चांगल्या 5जी फोनचा शोध घेत आहेत. आता तर कमी रेंजमध्ये अनेक 5जी फोन आले आहेत परंतु आम्ही तुम्हाला अशा फोन्सची माहिती देणार आहोत जे दमदार आहेत. विशेष म्हणजे हे फोन्स 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. यात Oneplus पासून iQOO आणि Samsung च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे.

20,000 रुपयांच्या आत येणारे 5जी फोन

  • iQOO Z5 5G
  • OnePlus Nord CE 2 Lite 5G
  • Realme 9 5G SE
  • Samsung Galaxy M52 5G
  • Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G
  • POCO X4 Pro
  • Moto G62 5G

iQOO Z5 5G

20,000 रुपयांच्या आत चांगल्या फोनच्या यादीत पाहिलं नाव iQOO Z5 5G आहे, जो 25 हजार रुपयांमध्ये लाँच होऊन आता 20 हजार रुपयांच्या आत उपलब्ध झाला आहे. हा फोन कंपनीनं Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह सादर केला आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. यावरून तुम्हाला फोनच्या ताकदीचा अंदाज आला असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तुम्हाला 64MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला 16MP चा सेन्सर आहे. हा फोन 6.67 इंचाच्या IPS LCD स्क्रीनसह येतो आणि यात 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. त्याचबरोबर 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

यादीत दुसरं नाव वनप्लसच्या फोनचं आहे. हा चांगली परफॉर्मन्स देतो आणि क्वॉलकॉमच्या लेटेस्ट 5G प्रोसेसर सह आला आहे. Oneplus Nord CE2 Lite 5G कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 6.59 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.

Realme 9 5G SE

मिड बजेटमध्ये 5G फोन म्हणून रियलमी 9 5जी एसई देखील चांगला ऑप्शन आहे. परफॉर्मन्ससह अनेक बाबतीत हा फोन वनप्लस नॉर्ड सीई2 लाइट पेक्षा चांगला आहे. कंपनीनं हा Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर सादर केला आहे आणि यात तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन 6.6 इंचाच्या स्क्रीनसह येतो जी 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.

Samsung Galaxy M52 5G

एक वर्ष जुन्या फोनची किंमत वर्षभरात 11,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. प्राइस कटनंतर हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध झाला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता, Galaxy M52 5G मध्ये तुम्हाला 6.7 इंचाची सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन मिळेल जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. त्याचबरोबर 64MP + 12MP + 5MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. यात 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसरवर चालतो, जोडीला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते.

Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G

20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5जी फोन घ्यायचा झाल्यास Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G ची देखील निवड करता येईल. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात 6GB रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं हा फोन 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्लेसह सादर केला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 108MP च्या मेन सेन्सरसह 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16MP कॅमेरा मिळतो. या बजेटमध्ये 108MP कॅमेरा खूप खास म्हणता येईल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीनं हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.

POCO X4 Pro 5G

मिड सेगमेंटमध्ये चांगल्या 5जी फोन बाबत बोलायचं तर पोकोचा उल्लेख करावाच लागेल. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी POCO X4 Pro 5G मॉडेल सादर केला होता जो खूप पावरफुल आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचाची स्क्रीन मिळेल. विशेष म्हणजे कंपनीनं AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे आणि हा 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि मेन कॅमेरा 64MP चा आहे. त्याचबरोबर 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB मेमरी मिळते. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G62 5G

मोटोरोलाचा देखील एक फोन आहे जो कमी बजेटमध्ये चांगला 5G फोन म्हणता येईल. हा फोन Xiaomi आणि Realme सारख्या फोन्सना चांगली टक्कर देऊ शकतो. Moto G62 चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाची स्क्रीन मिळेल जी 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आली आहे. तर फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो जो 5G प्रोसेसर आहे आणि या बजेटमध्ये चांगली परफॉर्मन्स देतो. तसेच यात 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते आणि पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आहे.

The post 20 हजारांच्या आत मिळणारे हे आहेत बेस्ट 5G फोन; दिवाळीत येणारं 5G Network वापरण्यासाठी व्हा सज्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-launch-in-india-best-5g-phone-under-rs-20000/feed/ 0
हे आहेत जगातील टॉप 10 5G स्मार्टफोन, Samsung चे नाव आहे सर्वात वर पण 10 पैकी 7 चीनी ब्रँड https://www.91mobiles.com/marathi/top-10-5g-smartphone-globally-report/ https://www.91mobiles.com/marathi/top-10-5g-smartphone-globally-report/#respond Fri, 20 Nov 2020 12:55:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9021 टॉप 10 सेलिंग 5जी स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव कोरियन कंपनी सॅमसंगच्या Samsung Galaxy Note 20 Ultra 5G स्मार्टफोनचे आहे.

The post हे आहेत जगातील टॉप 10 5G स्मार्टफोन, Samsung चे नाव आहे सर्वात वर पण 10 पैकी 7 चीनी ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G टेक्नॉलॉजी जगभरात जोर धरत आहे. पुढल्या वर्षी भारतात पण 5G नेटवर्क सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. Reliance Jio ने तर घोषणा पण कर केली आहे कि कंपनी Google सह भागेदारी करून आपला 5जी फोन सादर करेल. देशात 5जी नेटवर्क येण्याआधी टेक कंपन्या व मोबाईल ब्रँड्स आपले 5G स्मार्टफोन लॉन्च करू लागले आहेत. क्वॉलकॉम, मीडियाटेक व एक्सनॉस सारखे दिग्गज ब्रँड्स 5जी बॅंड वर काम करणारे प्रोसेसर व चिपसेट बाजारात आले आहेत आणि त्यांची टेक्नॉलॉजी पण सतत ऍडव्हान्स होत आहे. प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटने 5जी स्मार्टफोन्सचे वाढते वेढ पाहता एक रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्यात टॉप 5जी स्मार्टफोनची लिस्ट बनवण्यात आली आहे जे सर्वात जास्त विकत घेतले जात आहेत.

काउंटरप्वाइंटची हि लिस्ट ग्लोबल मार्केट वरून तयार करण्यात आली आहे ज्यात जगातील सर्वात जास्त विकले जाणारे आणि आवडलेल्या 5जी स्मार्टफोनची नावे नोंदवण्यात आली आहेत. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि हा रिपोर्ट सप्टेंबर पर्यंतच्या आकड्यांवर आधारित आहे त्यामुळे त्यानंतर लॉन्च झालेल्या 5G स्मार्टफोन्सचा लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला नाही. लक्षात असू द्या कि Apple ने आपली iPhone 12 सीरीज ऑक्टोबर मध्ये सादर केली होती जिला या यादीत स्थान मिळाले नाही. आयफोन 12 सीरीजच्या लॉन्च नंतर या लिस्ट मध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

सर्वात पुढे Samsung

टॉप 10 सेलिंग 5जी स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव कोरियन कंपनी सॅमसंगच्या Samsung Galaxy Note 20 Ultra 5G स्मार्टफोनचे आहे. रिपोर्टनुसार सप्टेंबर 2020 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा कडे 5 टक्के 5जी मोबाईल मार्केट शेयर होता. या महिन्यात सॅमसंगने ऑगस्ट महिन्याच्या बेस्ट सेलिंग 5जी स्मार्टफोन Huawei P40 Pro 5G ला मागे टाकले होते, त्यानंतर हुआवईचा हा फोन दुसऱ्या स्थानावर गेला होता.

या लिस्ट मध्ये टॉप 5 पॉजिशन सॅमसंग आणि हुआवई दोन्ही ब्रँड्सना मिळाली आहे. यादीत तिसरे स्थान Huawei Nova 7 5G चे आहे ज्याने 4.3 टक्के मार्केट शेयर वर कब्जा केला आहे. चौथ्या नंबर वर 4.0 टक्के मार्केट सह Samsung Galaxy S20 Plus 5G आला आहे तसेच यानंतर पाचव्या नंबर वर Huawei P40 5G फोन आहे ज्याच्याकडे 3.8 टक्के मार्केट शेयर आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 7 5G, जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स मध्ये झाला सामील

10 पैकी 7 चायनीज ब्रँड

टॉप 10 च्या लिस्ट मध्ये दहा पैकी सात नावे चीनी ब्रँड्सची आहेत. यादीत सहाव्या नंबर वर 3.6 टक्के मार्केट शेयर सह Vivo Y70s 5G चे नाव आले आहे. सातव्या नंबर वर OPPO Reno 4 5G आहे ज्याच्याकडे 3.1 टक्के शेयर आहे. तसेच 2.9 टक्के मार्केट शेयर सह Samsung Galaxy Note 20 5G आठव्या, 2.8 टक्के मार्केट शेयर सह Honor 30s 5G नवव्या आणि 2.7 टक्के मार्केट शेयर सह OPPO A72 5G टॉप 10 5जी स्मार्टफोन्स मध्ये आला आहे.

The post हे आहेत जगातील टॉप 10 5G स्मार्टफोन, Samsung चे नाव आहे सर्वात वर पण 10 पैकी 7 चीनी ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-10-5g-smartphone-globally-report/feed/ 0