रिलायन्स जियोनं आपली 5G सेवा यंदा दिवाळीत सक्रिय होईल अशी घोषणा केली आहे. इतर कंपन्या देखील पुढील काही महिन्यांत भारतात 5G सर्व्हिस सादर करतील. ही सर्व्हिस वापरण्यासाठी तुमच्याकडे एक 5G फोन असणं आवश्यक आहे, त्यामुळे ग्राहक चांगल्या 5जी फोनचा शोध घेत आहेत. आता तर कमी रेंजमध्ये अनेक 5जी फोन आले आहेत परंतु आम्ही तुम्हाला अशा फोन्सची माहिती देणार आहोत जे दमदार आहेत. विशेष म्हणजे हे फोन्स 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. यात Oneplus पासून iQOO आणि Samsung च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे.
20,000 रुपयांच्या आत येणारे 5जी फोन
- iQOO Z5 5G
- OnePlus Nord CE 2 Lite 5G
- Realme 9 5G SE
- Samsung Galaxy M52 5G
- Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G
- POCO X4 Pro
- Moto G62 5G
iQOO Z5 5G
20,000 रुपयांच्या आत चांगल्या फोनच्या यादीत पाहिलं नाव iQOO Z5 5G आहे, जो 25 हजार रुपयांमध्ये लाँच होऊन आता 20 हजार रुपयांच्या आत उपलब्ध झाला आहे. हा फोन कंपनीनं Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह सादर केला आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. यावरून तुम्हाला फोनच्या ताकदीचा अंदाज आला असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तुम्हाला 64MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला 16MP चा सेन्सर आहे. हा फोन 6.67 इंचाच्या IPS LCD स्क्रीनसह येतो आणि यात 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. त्याचबरोबर 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
OnePlus Nord CE 2 Lite 5G
यादीत दुसरं नाव वनप्लसच्या फोनचं आहे. हा चांगली परफॉर्मन्स देतो आणि क्वॉलकॉमच्या लेटेस्ट 5G प्रोसेसर सह आला आहे. Oneplus Nord CE2 Lite 5G कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 6.59 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.
Realme 9 5G SE
मिड बजेटमध्ये 5G फोन म्हणून रियलमी 9 5जी एसई देखील चांगला ऑप्शन आहे. परफॉर्मन्ससह अनेक बाबतीत हा फोन वनप्लस नॉर्ड सीई2 लाइट पेक्षा चांगला आहे. कंपनीनं हा Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर सादर केला आहे आणि यात तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन 6.6 इंचाच्या स्क्रीनसह येतो जी 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
Samsung Galaxy M52 5G
एक वर्ष जुन्या फोनची किंमत वर्षभरात 11,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. प्राइस कटनंतर हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध झाला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता, Galaxy M52 5G मध्ये तुम्हाला 6.7 इंचाची सुपर अॅमोलेड स्क्रीन मिळेल जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. त्याचबरोबर 64MP + 12MP + 5MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. यात 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसरवर चालतो, जोडीला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते.
Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G
20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5जी फोन घ्यायचा झाल्यास Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G ची देखील निवड करता येईल. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात 6GB रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं हा फोन 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्लेसह सादर केला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 108MP च्या मेन सेन्सरसह 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16MP कॅमेरा मिळतो. या बजेटमध्ये 108MP कॅमेरा खूप खास म्हणता येईल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीनं हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.
POCO X4 Pro 5G
मिड सेगमेंटमध्ये चांगल्या 5जी फोन बाबत बोलायचं तर पोकोचा उल्लेख करावाच लागेल. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी POCO X4 Pro 5G मॉडेल सादर केला होता जो खूप पावरफुल आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचाची स्क्रीन मिळेल. विशेष म्हणजे कंपनीनं AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे आणि हा 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि मेन कॅमेरा 64MP चा आहे. त्याचबरोबर 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB मेमरी मिळते. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Moto G62 5G
मोटोरोलाचा देखील एक फोन आहे जो कमी बजेटमध्ये चांगला 5G फोन म्हणता येईल. हा फोन Xiaomi आणि Realme सारख्या फोन्सना चांगली टक्कर देऊ शकतो. Moto G62 चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाची स्क्रीन मिळेल जी 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आली आहे. तर फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो जो 5G प्रोसेसर आहे आणि या बजेटमध्ये चांगली परफॉर्मन्स देतो. तसेच यात 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते आणि पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आहे.