Black Shark 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Black Shark 4, Black Shark 4 Pro गेमिंग फोन झाला लॉन्च, यामध्ये आहे 12GB रॅम आणि 144Hz डिस्प्लेसह अनेक वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/black-shark-4-black-shark-4-pro-with-144hz-display-snapdragon-888-soc-12gb-ramlaunched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/black-shark-4-black-shark-4-pro-with-144hz-display-snapdragon-888-soc-12gb-ramlaunched-price-specifications/#respond Wed, 24 Mar 2021 10:16:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10384 ब्लॅक शार्क 4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ऑपरेटिंग सिस्टम, डिस्प्ले आणि बॅटरीच्या बाबतीत अगदी ब्लॅक शार्क 4 प्रो वेरिएंट सारखाच आहे. फक्त ब्लॅक शार्क 4 फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला आहे

The post Black Shark 4, Black Shark 4 Pro गेमिंग फोन झाला लॉन्च, यामध्ये आहे 12GB रॅम आणि 144Hz डिस्प्लेसह अनेक वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि मोबाईल गेमिंग स्मार्टफोन बनवणारी कंपनी Black Shark लवकरच आपला नवीन गेमिंग फोन टेक मंचावर सादर करू शकते. त्यानुसार आता कंपनीने आपल्या गृह मार्केट चीनमध्ये दोन नवीन फोन Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Black Shark 3 आणि Black Shark 3 Pro चा अपग्रेडेड वर्जन म्हणुन बाजारात आला आहे. इतकेच नव्हे तर Black Shark ने गेमिंग स्मार्टफोन्स सोबत काही एक्सेसरीज पण लॉन्च केली आहेत, ज्यात Black Shark 3.5mm इन इयर गेमिंग इयरफोन्स (Standard Edition), Special Ring Iron Edition आणि Black Shark Cooling Back Clip 2 Pro यांचा समावेश आहे.

डिजाइन
डिजाइन बद्दल बोलायचे तर दोन्ही फोन कंपनीने पंच-होल डिस्प्लेसह सादर केले आहेत जे फोन्सच्या वरच्या बाजूला मध्यभागी आहेत. डिवाइसच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट मिळेल. फोनच्या मागे लँडस्केप पोजीशनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर गेमिंग फोनचा अनुभव देण्यासाठी एक शानदार डिजाइन आणि लाइटिंग इफेक्ट आहे. फोनमध्ये एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि उजवीकडे गेमिंगसाठी डेडिकेटेड गेमिंग ट्रिगर बटण आहेत.

Black Shark 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी+ Samsung E4 डिस्प्ले वापरण्यात आला जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 720 हर्ट्ज टच-सॅम्पलिंग रेट सपोर्टसह येतो. तसेच फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह 16 जीबी LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी ब्लॅक शार्क 4 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात f/1.79 लेंससह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, f/2.2 अल्ट्रा-वाइड लेंससह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि f/2.4 मॅक्रो लेंससह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी f/2.45 लेंससह 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. ज्यामुळे फोन 15 मिनिटांत फुल चार्ज होतो. याव्यतिरिक्त, फोन मध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि डुअल स्पीकर देण्यात आला आहे. ब्लॅक शार्क 4 प्रो फोन एंड्रॉयड 11 आधारित JoyUI 12.5 वर चालतो.

Black Shark 4 चे स्पेसिफिकेशन्स
ब्लॅक शार्क 4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ऑपरेटिंग सिस्टम, डिस्प्ले आणि बॅटरीच्या बाबतीत अगदी ब्लॅक शार्क 4 प्रो वेरिएंट सारखाच आहे. फक्त ब्लॅक शार्क 4 फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याच्या सोबत 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी ब्लॅक शार्क 4 मध्ये पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ब्लॅक शार्क 4 प्रो सारखा आहे. पण या फोनचा प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. बाकी कॅमेरा स्पेसिफिकेशन दोन्ही फोन्सचे एकसारखे आहेत.

किंमत
Black Shark 4 Pro च्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,999 (जवळपास 44,400 रुपये), 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट CNY 4,499 (लगभग 50,000 रुपये) आणि 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 5,299 (जवळपास 58,800 रुपये) आहे.

दुसरीकडे Black Shark 4 च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,499 (जवळपास 27,700 रुपये), 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,699 (जवळपास 30,000 रुपये), 12 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,999 (जवळपास 33,300 रुपये) आणि 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,299 (जवळपास 36,600 रुपये) आहे. दोन्ही फोन्स 25 मार्चपासून विकत घेता येतील.

The post Black Shark 4, Black Shark 4 Pro गेमिंग फोन झाला लॉन्च, यामध्ये आहे 12GB रॅम आणि 144Hz डिस्प्लेसह अनेक वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/black-shark-4-black-shark-4-pro-with-144hz-display-snapdragon-888-soc-12gb-ramlaunched-price-specifications/feed/ 0
12GB रॅम आणि सर्वात ताकदवान प्रोसेसरसह येत आहे Black Shark 4 Pro, गुगलवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/black-shark-phone-4-pro-appears-on-google-play-console-with-fullhd-screen-and-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/black-shark-phone-4-pro-appears-on-google-play-console-with-fullhd-screen-and-12gb-ram/#respond Mon, 08 Feb 2021 14:08:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9943 Google Play Console लिस्टिंगनुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असेल. हा प्रोसेसरसह फोन आधीच्या गेमिंग फोन मध्ये दिसला होता. लिस्टिंगनुसार Black Shark 4 Pro मध्ये 12GB रॅम आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

The post 12GB रॅम आणि सर्वात ताकदवान प्रोसेसरसह येत आहे Black Shark 4 Pro, गुगलवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमर्ससाठी खासकरून स्मार्टफोन बनवणारी पॉप्युलर कंपनी Black Shark लवकरच आपल्या गेमिंग फोन सीरीजचा विस्तार करत लेटेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलजी असलेली Black Shark 4 Pro लॉन्च करणार आहे. तसेच, आता हा डिवाइस गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर “penrose” नावाने दिसला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी Google Play Console वर कोडनेम “kaiser” असलेला (मॉडेल नंबर KSR-AO) स्पॉट केला गेला होता. बोलले जात आहे कि “kaiser” कोडनेम फोन Black Shark 4 असेल.

Black Shark 4 Pro

Google Play Console लिस्टिंगनुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असेल. हा प्रोसेसरसह फोन आधीच्या गेमिंग फोन मध्ये दिसला होता. लिस्टिंगनुसार Black Shark 4 Pro मध्ये 12GB रॅम आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल. तसेच या लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या रेंडर्सनुसार Black Shark 4 Pro पंच-होल कटआउट डिस्प्ले फोनच्या टॉप-सेंटर मध्ये असेल. तसेच लिस्टिंग मध्ये फोनचा आकार आणि इतर गोष्टींचा खुलासा झाला नाही. हालांकि, लिस्टिंग मध्ये समजले कि फोन मध्ये Black Shark 4 Pro फुल एचडी+ रिजोल्यूशन 1080 x2400 पिक्सल आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह येईल.

हे देखील वाचा : 5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन!

लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटोवरून समजले आहे कि ब्लॅक शार्क 4 प्रो मध्ये डाव्या चेसिसवर वॉल्यूम रॉकर बटन असेल. फोनच्या डावीकडे गेमिंग मोडला ट्रिगर करण्यासाठी एका बटनची सुविधा असेल. आशा आहे कि आगामी काळात फोन बाबत अजून नवीन माहिती समोर येईल. त्याचबरोबर डिवाइसच्या लॉन्च डेट बद्दल पण खुलासा होऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12, भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट

Black Shark 4

काही दिवसांपूर्वी ब्लॅक शार्क 4 स्मार्टफोनबाबत माहिती ऑनलाइन समोर आली होती. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हँडसेट 4,500mAh च्या बॅटरीसह येईल. विशेष म्हणजे हा ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल जो 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाईल. कंपनीचा दावा आहे कि फोन 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात चार्ज केला जाऊ शकतो. ब्लॅक शार्क 4 प्रो प्रमाणेच या फोनची आगामी काळात जास्त माहिती येऊ शकते.

The post 12GB रॅम आणि सर्वात ताकदवान प्रोसेसरसह येत आहे Black Shark 4 Pro, गुगलवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/black-shark-phone-4-pro-appears-on-google-play-console-with-fullhd-screen-and-12gb-ram/feed/ 0