Samsung घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12, भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट

Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 15 फेब्रुवारीला भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लॉन्च करणार आहे. हा फोन जगात सर्वप्रथम भारतातच लॉन्च होईल. गॅलेक्सी एफ62 व्यतिरिक्त अजून एक बातमी समोर येत आहे कि सॅमसंग भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A12 पण घेऊन येण्याची योजना बनवत आहे आणि हा स्मार्टफोन पण या महिन्यात भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर गॅलेक्सी ए12 चे सपोर्ट पेज पण लाईव झाले आहे.

Samsung Galaxy A12 च्या इंडिया लॉन्चची बातमी एमएसपी वेबसाइटने पब्लिश केली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार कोरियन कंपनी सॅमसंग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल. कंपनीने आतापर्यंत या फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही पण सॅमसंग गॅलेक्सी ए12 चे सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव करण्यात आले आहे. तर दुसरीकडे असे बोलले जात आहे कि Samsung Galaxy A12 स्मार्टफोन 15 फेब्रुवारीला Samsung Galaxy F62 सह लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A12

सॅमसंग गॅलेक्सी 12 नोव्हेंबर मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. आशा आहे कि गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतीय बाजारात मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह विकला जाईल. सॅमसंग इंडियावर फोनच्या सपोर्ट पेज वर 4 जीबी रॅम दाखवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन!

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोन साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन आगामी काही दिवसांत Black, Blue, White आणि Red कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here