12GB रॅम आणि सर्वात ताकदवान प्रोसेसरसह येत आहे Black Shark 4 Pro, गुगलवर झाला लिस्ट

गेमर्ससाठी खासकरून स्मार्टफोन बनवणारी पॉप्युलर कंपनी Black Shark लवकरच आपल्या गेमिंग फोन सीरीजचा विस्तार करत लेटेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलजी असलेली Black Shark 4 Pro लॉन्च करणार आहे. तसेच, आता हा डिवाइस गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर “penrose” नावाने दिसला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी Google Play Console वर कोडनेम “kaiser” असलेला (मॉडेल नंबर KSR-AO) स्पॉट केला गेला होता. बोलले जात आहे कि “kaiser” कोडनेम फोन Black Shark 4 असेल.

Black Shark 4 Pro

Google Play Console लिस्टिंगनुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असेल. हा प्रोसेसरसह फोन आधीच्या गेमिंग फोन मध्ये दिसला होता. लिस्टिंगनुसार Black Shark 4 Pro मध्ये 12GB रॅम आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल. तसेच या लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या रेंडर्सनुसार Black Shark 4 Pro पंच-होल कटआउट डिस्प्ले फोनच्या टॉप-सेंटर मध्ये असेल. तसेच लिस्टिंग मध्ये फोनचा आकार आणि इतर गोष्टींचा खुलासा झाला नाही. हालांकि, लिस्टिंग मध्ये समजले कि फोन मध्ये Black Shark 4 Pro फुल एचडी+ रिजोल्यूशन 1080 x2400 पिक्सल आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह येईल.

हे देखील वाचा : 5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन!

लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटोवरून समजले आहे कि ब्लॅक शार्क 4 प्रो मध्ये डाव्या चेसिसवर वॉल्यूम रॉकर बटन असेल. फोनच्या डावीकडे गेमिंग मोडला ट्रिगर करण्यासाठी एका बटनची सुविधा असेल. आशा आहे कि आगामी काळात फोन बाबत अजून नवीन माहिती समोर येईल. त्याचबरोबर डिवाइसच्या लॉन्च डेट बद्दल पण खुलासा होऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12, भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट

Black Shark 4

काही दिवसांपूर्वी ब्लॅक शार्क 4 स्मार्टफोनबाबत माहिती ऑनलाइन समोर आली होती. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हँडसेट 4,500mAh च्या बॅटरीसह येईल. विशेष म्हणजे हा ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल जो 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाईल. कंपनीचा दावा आहे कि फोन 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात चार्ज केला जाऊ शकतो. ब्लॅक शार्क 4 प्रो प्रमाणेच या फोनची आगामी काळात जास्त माहिती येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here