5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन!

Credit: David Imel / Android Authority

टेक कंपनी Motorola बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार कंपनी सध्या Moto G आणि Moto E सीरीजच्या अनेक हँडसेटवर काम करत आहे. पण कंपनीने आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेयर केली नाही. पण अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी G सीरीज अंतगर्त तीन फोन घेऊन येऊ शकते, ज्यात Moto G10, Moto G30 आणि Moto G40 चा समावेश असेल. आता टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून माहिती दिली आहे कि कंपनी भारतात आपले नवीन 5G फोन घेऊन येण्यासाठी तयार आहे आणि हे डिवाइस या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये सादर केले जातील.

मुकुल शर्माच्या माहितीनुसार अपकमिंग 5G फोनचे Motorola Ibiza (कोडनेम) असू शकते. या बजेट हँडसेट मध्ये 90 हर्ट्ज आयपीएस एलसीडी डिस्प्ले फीचर केला जाऊ शकतो. दुसरीकडे बोलले जात आहे कि मोटो जी40 चे कोडनेम Motorola Ibiza आहे, त्याच्याबाबत माहिती मिळाली आहे कि हा भारतात 5जी सपोर्टसह फेब्रुवारी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अलीकडेच जर्मन टेक ब्लॉगर TecknikNews ने अशी माहिती दिली होती कि Motorola Ibiza अधिकृतपणे Moto G40 नावाने सादर केला जाईल.

Motorola Ibiza उर्फ Moto G40 बद्दल बोलले जात आहे कि हा 5जी असलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 400 सीरीजसह सादर केला जाईल. इतकेच नव्हे तर यात अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 5000एमएएचची बॅटरी असेल.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

Moto G10, Moto G30 आणि Moto E7

दुसरीकडे जी सीरीजच्या अपकमिंग Moto G10, Moto G30 आणि कंपनीच्या ई-सीरीजच्या Moto E7 Power चे स्पेसिफिकेशन व रेंडर्स लीक झाले आहेत. हि माहिती TechnikNews चे Nils Ahrensmeier यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन बजेट कॅटेगरी मध्ये सादर केले जाणार आहेत.

मोटो जी10

Moto G10 च्या लीक रेंडरवरून मिळालेल्या माहितीनुसार फोन मध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉच, 3.5mm ऑडियो जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच, बॅक पॅनलवर टेक्सचर फिनिश असेल. बोलले जात आहे कि या फोनचे कोडनेम Motorola Capri असेल, ज्यात 6.5-इंचाच्या डिस्प्लेसह 60 हर्ट्ज रिफ्रेश, स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर, 4 जीबी/ 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी मोटो जी10 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर आणि दोन अतिरिक्त 2 मेगापिक्सलचे मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा असतील. तर, फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाईल. किंमत EUR 149.99 (जवळपास 13,100 रुपये) असेल.

हे देखील वाचा : भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी

मोटो जी30

Moto G30 चे कोडनेम Motorola Capri Plus असेल. यात 90 हर्ट्ज रिफ्रेश असलेला 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच यात स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असू शकते. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सल डेप्थ आणि मॅक्रो सेंसर असू शकतो. सोबतच फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. फोन मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनची किंमत पाहता हा EUR 179.99 (जवळपास 15,700 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

मोटो ई7 पावर

Moto E7 Power बद्दल बोलायचे झाले तर याचे कोडनेम ‘Malta Lite’ असेल. यात मीडियाटेक पी22 प्रोसेसर आणि 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोन मध्ये 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर दिला जाईल. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here