Coca Cola phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:53:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-coca-cola-edition-design-leaked-confirmed-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-coca-cola-edition-design-leaked-confirmed-launch-date/#respond Thu, 02 Feb 2023 05:37:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17428 काही दिवसांपूर्वी लीक आलं होतं की लोकप्रिय कोल्ड्रिंक ब्रँड Coca-Cola स्मार्टफोन सेगमेंटमध्ये येणार असून लवकरच Coca-Cola Phone बाजारात येणार आहे. आता समोर आलं आहे की हा फोन एका Realme स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. रियलमीनं देखील पुष्टी केली आहे की त्यांनी कोका-कोला सोबत स्पेशल एडिशन लाँच करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. हा फोन गेल्यावर्षी भारतात आलेल्या […]

The post Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10 Pro चा स्पेशल एडिशन येत आहे बाजारात.
  • Realme 10 Pro 5G Coca-Cola edition मध्ये स्टँडर्ड एडिशन सारखे स्पेक्स असतील
  • स्मार्टफोनची फक्त डिजाइन बदलली जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वी लीक आलं होतं की लोकप्रिय कोल्ड्रिंक ब्रँड Coca-Cola स्मार्टफोन सेगमेंटमध्ये येणार असून लवकरच Coca-Cola Phone बाजारात येणार आहे. आता समोर आलं आहे की हा फोन एका Realme स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. रियलमीनं देखील पुष्टी केली आहे की त्यांनी कोका-कोला सोबत स्पेशल एडिशन लाँच करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. हा फोन गेल्यावर्षी भारतात आलेल्या Realme 10 Pro चा स्पेशल एडिशन असेल.

रियलमी Realme 10 Pro 5G चा स्पेशल एडिशन येत्या 10 फेब्रुवारीला लाँच करेल. सध्या कंपनी हा फोन टीज करत आहे. एका नव्या लीकमधून या स्मार्टफोनची डिजाइन देखील समोर आली आहे. त्यानुसार Realme 10 Pro 5G Coco-Cola Edition ड्युअल टोन डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलचा एक तृतीयांश भाग काळ्या रंगात आहे तर तर उर्वरित भागात कोका-कोलाचं ब्रँडिंग आहे. यात स्टँडर्ड व्हेरिएंट प्रमाणे स्पेसिफिकेशन मिळतील, फक्त डिजाइन बदलली जाऊ शकते. हे देखील वाचा: Samsung ने लाँच केले दोन दणकट स्मार्टफोन; Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus उडवणार वनप्लसची झोप

Realme 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोनची स्क्रीन 680निट्स ब्राइटनेस, 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 16.7एम कलर आणि 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

Realme 10 Pro अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो रॅम बूस्ट फिचरच्या मदतीनं 20जीबी रॅमची हेव्ही प्रोसेसिंग देतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: Airtel ग्राहकांना मोठा धक्का! बंद झाले कंपनीचे सर्वच स्वस्त रिचार्ज प्लॅन

Realme 10 Pro स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर मोठा व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

The post Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-coca-cola-edition-design-leaked-confirmed-launch-date/feed/ 0
Coca-Cola Phone येऊ शकतो बाजारात! रियलमी डिवाइसचा रीब्रँड असू शकतो हा फोन https://www.91mobiles.com/marathi/coca-cola-phone-to-launch-in-india-as-realme-10-4g/ https://www.91mobiles.com/marathi/coca-cola-phone-to-launch-in-india-as-realme-10-4g/#respond Thu, 26 Jan 2023 03:35:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17259 Coca-Cola तर कधी ना कधी सर्वच प्यायले असतील किंवा या ब्रँड बद्दल ऐकलं तर असेलच. आता हा ब्रँड स्मार्टफोन विश्वात पाऊल टाकत आहे. लवकरच Coca-Cola phone बाजारात येऊ शकतो. बातमी आली आहे की कोका-कोला कंपनीचा मोबाइल फोन देखील बाजारात येत आहे. या हटके फोनचा फोटो देखील लीकमधून समोर आला आहे, त्यामुळे डिजाईनचा खुलासा झाला आहे. […]

The post Coca-Cola Phone येऊ शकतो बाजारात! रियलमी डिवाइसचा रीब्रँड असू शकतो हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Coca-Cola phone लवकरच येऊ शकतो बाजारात.
  • या फोनचे फोटोज इंटरनेटवर लीक झाले आहेत.
  • फोनच्या रियर लुकचा खुलासा झाला आहे.

Coca-Cola तर कधी ना कधी सर्वच प्यायले असतील किंवा या ब्रँड बद्दल ऐकलं तर असेलच. आता हा ब्रँड स्मार्टफोन विश्वात पाऊल टाकत आहे. लवकरच Coca-Cola phone बाजारात येऊ शकतो. बातमी आली आहे की कोका-कोला कंपनीचा मोबाइल फोन देखील बाजारात येत आहे. या हटके फोनचा फोटो देखील लीकमधून समोर आला आहे, त्यामुळे डिजाईनचा खुलासा झाला आहे. चर्चा आहे की हा फोन बनवण्यासाठी Realme कंपनी सोबत भागेदारी केली जाईल.

Coca-Cola phone ची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. फोनचे फोटो शेयर करण्यासह मुकुलनं सांगितलं आहे की हा मोबाइल या तिमाहीत म्हणजे मार्चपूर्वीच भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. या फोनसाठी कोका-कोला स्मार्टफोन ब्रँड रियलमीसह भागेदारी करू शकतो. हा मोबाइल Realme 10 4G फोनचा रीब्रँडेड व्हर्जन असण्याची चर्चा आहे. फोटोमध्ये फोनचा ड्युअल रियर कॅमेरा दिसत आहे.

Realme 10 4G Specifications

  • 6.5″ FHD+ AMOLED 90Hz डिस्प्ले
  • 8GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Helio G99 चिपसेट
  • 50MP Dual Rear 16MP Selfie कॅमेरा
  • 33W 5,000mAh Battery

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Realme 10 4G price

Realme 10 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट कंपनीनं भारतीयांच्या भेटीला आणले आहेत. यातील बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत कंपनीनं 13,999 रुपये ठेवली आहे. स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मोठा मॉडेल 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन रश ब्लॅक आणि क्लॅश व्हाइट अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post Coca-Cola Phone येऊ शकतो बाजारात! रियलमी डिवाइसचा रीब्रँड असू शकतो हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coca-cola-phone-to-launch-in-india-as-realme-10-4g/feed/ 0