Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन

Highlights

  • Realme 10 Pro चा स्पेशल एडिशन येत आहे बाजारात.
  • Realme 10 Pro 5G Coca-Cola edition मध्ये स्टँडर्ड एडिशन सारखे स्पेक्स असतील
  • स्मार्टफोनची फक्त डिजाइन बदलली जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वी लीक आलं होतं की लोकप्रिय कोल्ड्रिंक ब्रँड Coca-Cola स्मार्टफोन सेगमेंटमध्ये येणार असून लवकरच Coca-Cola Phone बाजारात येणार आहे. आता समोर आलं आहे की हा फोन एका Realme स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. रियलमीनं देखील पुष्टी केली आहे की त्यांनी कोका-कोला सोबत स्पेशल एडिशन लाँच करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. हा फोन गेल्यावर्षी भारतात आलेल्या Realme 10 Pro चा स्पेशल एडिशन असेल.

रियलमी Realme 10 Pro 5G चा स्पेशल एडिशन येत्या 10 फेब्रुवारीला लाँच करेल. सध्या कंपनी हा फोन टीज करत आहे. एका नव्या लीकमधून या स्मार्टफोनची डिजाइन देखील समोर आली आहे. त्यानुसार Realme 10 Pro 5G Coco-Cola Edition ड्युअल टोन डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलचा एक तृतीयांश भाग काळ्या रंगात आहे तर तर उर्वरित भागात कोका-कोलाचं ब्रँडिंग आहे. यात स्टँडर्ड व्हेरिएंट प्रमाणे स्पेसिफिकेशन मिळतील, फक्त डिजाइन बदलली जाऊ शकते. हे देखील वाचा: Samsung ने लाँच केले दोन दणकट स्मार्टफोन; Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus उडवणार वनप्लसची झोप

Realme 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोनची स्क्रीन 680निट्स ब्राइटनेस, 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 16.7एम कलर आणि 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

Realme 10 Pro अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो रॅम बूस्ट फिचरच्या मदतीनं 20जीबी रॅमची हेव्ही प्रोसेसिंग देतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: Airtel ग्राहकांना मोठा धक्का! बंद झाले कंपनीचे सर्वच स्वस्त रिचार्ज प्लॅन

Realme 10 Pro स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर मोठा व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here