Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती

Highlights

  • 50MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus लाँच
  • दोन्ही फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची पावर
  • 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले

Samsung चा Galaxy Unpacked 2023 इव्हेंट पार पडला आहे या इव्हेंटमधून Samsung Galaxy S23 ही कंपनीची फ्लॅगशिप सीरीज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 200MP चा कॅमेरा Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं Samsung Galaxy S23 5G आणि Galaxy S23 Plus 5G देखील सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा, 45W फास्ट चार्जिंग, 8GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोन्सचे बरेचशे स्पेक्स एकसारखे आहेत परंतु काही बदल आहेत ज्यांची माहिती पुढे दिली आहे.

Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 45W फास्ट चार्जिंग
  • 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • IP68 सर्टिफिकेशन
  • 8GB RAM आणि 512GB स्टोरेज

Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे तर Galaxy S23 Plus 6.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन एफएचडी+ एज अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचर सह देण्यात आला आहे. हे फोन्स अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आले आहेत. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे फोन्स अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतात. हेव्ही टास्क नंतर देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग मिळते.

हे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहावे म्हणून IP68 सर्टिफाइड करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटी फिचरमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault चा समावेश आहे. छोट्या Samsung Galaxy S23 मध्ये 3900mAh ची छोटी बॅटरी मिळते तर प्लस मॉडेल 4700mAh च्या बॅटरीसह येतो. दोन्ही फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये काहीही फरक नाही. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर, एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

Samsung Galaxy S23 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट बाजारात ज्यात 8GB रॅम मिळतो. याच्या 128GB स्टोरेजची किंमत 799 डॉलर्स (सुमारे 65,486 रुपये) ठेवण्यात आली आहे. 256GB स्टोरेज मॉडेल आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लवकरच समोर येईल. हे देखील वाचा: POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; तुमच्या बजेटमध्ये बसेल का? जाणून घ्या

Samsung Galaxy S23 Plus मध्ये 8GB रॅमसह दोन स्टोरेज ऑप्शन मिळतात. यातील 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 999 डॉलर्स (सुमारे 81,878 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत गुलदस्त्यात आहे. हे दोन्ही फोन भारतीय बाजारात देखील येणार आहेत, ज्यांची किंमत कंपनी उद्या घोषित करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here