Bharti Airtel आपल्या ग्राहकांना एक मोठा बडा धक्का देत तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स बंद केले आहेत. कंपनीनं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवरून Airtel smart recharge मध्ये येणारे 99 रुपये, 109 रुपये आणि 111 रुपये प्लॅन हटवले आहेत. किंवा असं देखील म्हणता येईल की कंपनीनं आपल्या साइटवरून एयरटेल स्मार्ट रिचार्ज कॅटेगरी हटवली आहे. तिन्ही रिचार्ज त्या ग्राहकांसाठी बेस्ट होते जे सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी एखादा स्वस्त प्लॅन शोधत होते.
Airtel smart recharge
Rs 99 Airtel smart recharge plan – 99 रुपयांच्या पॅकमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 200MB डेटा आणि 99 रुपयांचा टॉकटाइम मिळत होता.
Rs 109 Airtel smart recharge plan – 99 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणारे फायदे यात देखील मिळतात, ज्यात 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटाचा समावेश आहे. फक्त या प्लॅनमध्ये 10 रुपये जास्त देऊन ग्राहकांना 2 दिवसांची वैधता जास्त मिळते. म्हणजे 109 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या ऐवजी 30 दिवसांची वैधता मिळत होती. हे देखील वाचा: एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra
Rs 111 Airtel smart recharge plan – या रिचार्जमध्ये देखील एक महिन्याची वैधता मिळत होती. म्हणजे जर महिना 28 दिवसांचा असेल तर हा प्लॅन 28 दिवस पुरणार आणि महिना 30 किंवा 31 दिवस असेल तर हा प्लॅन देखील तेवढाच वेळ चालणार. यामुळे तुमची रिचार्ज डेट बदलत नाही. तसेच 111 रुपयांच्या प्लॅनचे बेनिफिट्स पाहता या रिचार्जमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळत होता.
नोट- मीडिया रिपोर्ट्सनुसार एयरटेलनं हे 7 सर्कल्समध्ये बंद केले आहेत ज्यात मुंबई आणि दिल्लीचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये हे प्लॅन्स उपलब्ध आहेत की नाही हे चेक करता आलेलं नाही. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा एयरटेल थँक्स अॅपवरून तुमच्या नंबरवर हे प्लॅन्स उपलब्श आहेत का ते चेक करू शकता. हे देखील वाचा: Samsung ने लाँच केले दोन दणकट स्मार्टफोन; Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus उडवणार वनप्लसची झोप
एयरटेलचा नवीन सर्वात स्वस्त रिचार्ज
कंपनीनं केलेल्या या बदलांमुळे Airtel च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ग्राहकांना आता 99 रुपयांच्या ऐवजी 155 रुपये द्यावे लागतील. Airtel च्या 155 रुपयांचा प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते, ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये 28 दिवसाची वैधता आणि 1GB डेटा व 300 SMS मिळतात.