Corona Lockdown - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Apr 2020 13:08:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा https://www.91mobiles.com/marathi/top-online-dating-apps-during-corona-lockdown-in-india-facebook-tuned-tinder-happn-trulymadly-okcupid/ https://www.91mobiles.com/marathi/top-online-dating-apps-during-corona-lockdown-in-india-facebook-tuned-tinder-happn-trulymadly-okcupid/#respond Wed, 08 Apr 2020 13:08:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7038 तरुणाईसाठी आज आम्ही डेटिंग ऍप्सची एक यादी बनवली आहे ज्यांच्या माध्यमातून तरुणाईला वेळ घालवता येईल

The post कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना वायरसच्या प्रभावाने जगाला घरात कैद केले आहे. भारतात पण 21 दिवसांचा लॉकडाउन चालू आहे जो 14 एप्रिल पर्यंत चालू राहील. पण त्यानंतर सर्वकाही नेहमीसारखे सुरु होईल कि पुन्हा लॉकडाउन वाढवला जाईल याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. Corona Lockdown मुळे लोकांना घरातून बाहेर जाता येत नाही. टीव्ही, मोबाईल व गेम्स सोबतच खाणे आणि झोपणे हे करून दिवस घालवावे लागत आहेत. पण तरुणाईला घरात राहणे जरा कठीण जात आहे. तरुण व तरुणी सध्या जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर घालवत आहेत. अश्या तरुणाईसाठी आज आम्ही डेटिंग ऍप्सची एक यादी बनवली आहे ज्यांच्या माध्यमातून तरुणाईला वेळ घालवता येईलच आणि कदाचित कोरोना वायरसचा हा लॉकडाउन त्यांना नवीन गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळवण्यास मदत करू शकतो.

Facebook Tuned

हे नाव तुमच्यासाठी नवीन असेल. फेसबुकने पण संधी ओळखून आपल्या तरुण युवा यूजर्ससाठी चांगली सुरवात केली आहे. कंपनीने नवीन चॅटिंग ऍप लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे Tuned. हे ऍप खासकरून कपल्ससाठी तयार करण्यात आले आहे जी एक प्राइवेट स्पेस आहे. इथे तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असूनही संपर्कात राहू शकता. सर्व खाजगी गप्पा तसेच खास क्षण, फोटो, लव नोट्स आणि वॉयस सोबतच म्यूजिक पण शेयर करू शकता. या ऍप मध्ये Spotify लिंक करून तुम्ही तुमच्या जोडीदाराची आवडती गाणी पण प्ले करू शकता. लक्षात असू दे हा ऍप याच आठवड्यात यूएस आणि कॅनडा मध्ये लॉन्च झाला आहे, भारतातात येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

Tinder

तरुणाई कधी पहिल्या नजरेत पसंत करते किंवा कधी वेळ घेऊन समजून घेते. ज्या लोकांना समोरच्याला आपण आवडू कि नाही याची भीती असते त्यांची भीती हा ऍप काही अंशी दूर करतो हा ऍप आहे टिंडर. या ऍप मध्ये तुम्ही फेसबुकने साइन इन करू शकता. त्यानंतर हे तुमच्या माहिती तसेच आवडीनुसार तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याची संधी देते. हा वापरण्यास खूप सोप्पा आहे. समोर आलेल्या यादीतील कोणी आवडले तर तुम्ही उजवीकडे स्वाईप करू शकता आणि नाही आवडले तर डावीकडे. आणि जर कोणी तुम्हाला लाईक बॅक केले तर समजून जा कि लॉकडाउन मध्ये तुम्हाला आता कंटाळा येणार नाही.

Happn

‘मेरे समोर वाली खिड़की मध्ये एक चॉंद सा मुखड़ा रहता आहे…’ हे फक्त गाणे राहणार नाही जर तुम्ही हॅप्पन वापरू लागलात तर. हॅप्पन ऍप फक्त एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांची भेट घडवून देत नाही तर तुम्ही जिथे जिथे जाता तिथल्या यूजर्सशी भेट घडवतो. कोरोना लॉकडाउन मध्ये तुम्ही तुमच्या घरात अडकले आहेत पण कदाचित तुमच्याच सोसायटी किंवा कॉलोनी मध्ये अजून एक तुमच्यासारखे मन असेल. फक्त हॅप्पन त्याच व्यक्तीला तुमच्या जवळ घेऊन येईल. हा ऍप तुमच्या आजूबाजूला असलेल्या हॅप्पन यूजर्सची माहिती देतो. याचा सर्वात जास्त फायदा तुम्ही जिथून जात आहेत तिथून कोण कोण गेले आहे हे जाणून घेण्यासाठी होतो.

TrulyMadly

डेटिंग साठी ट्रूलीमॅड्ली सर्वात सुरक्षित आणि रियाबल ऍप पैकी एक आहे. हा फक्त तुम्हाला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शोधण्यास मदत करत नाही तर त्यांना जाणून घेण्याची संधी पण देतो. ऍप मधील स्पार्क फिचर तुम्हाला गर्दीतील वेगळी माणसे ओळखण्याची संधी देतो. ऍप मधील स्टीकर्स तुमच्या मेसेज मधून तुमच्या मनातले मनापर्यंत पोहचवतील. तसेच ऍप मधील क्वीज गेम्स् तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला एकमेकांना समजून घेण्यास मदत करतील. ट्रूलीमॅड्ली वापरणे म्हणजे या लॉकडाउन मध्ये तुमच्या मनाचे दरवाजे उघडणे.

OkCupid

जर तुम्हाला वाटत असेल कि तुमची प्रेम भावना इन्टेन्स आणि पॅशिनेट आहे आणि त्यामुळे तुम्ही आतापर्यंत सिंगल असाल तर अशी इच्छा ठेवणारे पण अनेक लोक आहेत. ओके क्यूपिड तुमची हीच इच्छा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल. या ऍप मधील बॉडी टाईप, सेक्सुअल प्रेफरन्स सारखे ऑप्शन्स तुमच्या प्रोफाईल मध्ये लोकांची आवड वाढवतात. जास्त दिवस राहिले नाहीत, लवकरच तयार व्हा. कदाचित तुमच्या भावी पार्टनरने आमचा हा लेख वाचून यातील एखादा ऍप डाउनलोड केला असेल आणि तुम्हाला शोधात पण असेल.

हीच ती वेळ तुमच्या कंटाळवाण्या लॉकडाउन मध्ये जीव ओतण्याची. कोरोना लॉकडाउनचे पालन करा आणि तुमच्या टाईमपासची जबाबदारी या ऍप्स वर टाकून द्या.

The post कोरोना लॉकडाउनचा आता येणार नाही कंटाळा, हे टॉप ऑनलाईन डेटिंग ऍप्स दूर करतील तुमचा एकटेपणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-online-dating-apps-during-corona-lockdown-in-india-facebook-tuned-tinder-happn-trulymadly-okcupid/feed/ 0
Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस https://www.91mobiles.com/marathi/samsung-donates-free-smartphones-to-quarantined-coronavirus-patients-tablet-device/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-donates-free-smartphones-to-quarantined-coronavirus-patients-tablet-device/#respond Thu, 02 Apr 2020 13:48:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6983 Samsung शिक्षण संस्थांमध्ये मोफत टॅबलेट पण देणार आहे ज्याच्या मदतीने घर बसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल.

The post Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
COVID-19 म्हणजे कोरोना वायरसचा दंश सध्या संपूर्ण जग झेलत आहे. चीन मध्ये सुरु झालेल्या या महामारीने संपूर्ण जगासहित भारताला पण आपल्या विळख्यात घेतले आहे. Coronavirus चा सामना करण्याचे सरकार तर प्रयत्न करत आहे त्याचबरोबर इतर लोक पण आपले योगदान देत आहेत. टेक विश्वाबाबत बोलायचे झाले तर Xiaomi, OPPO, Vivo, Realme आणि Infinix व Tecno सारखे ब्रँडस पण आपापल्या परीने कोरोनामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करत आहेत. आता Samsung संबंधित बातमी येत आहे कि या कंपनीने दोन पाऊले पुढे जात quarantine मधील लोकांना मोफत स्मार्टफोन आणि एयर प्यूरिफायर वाटण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने स्टेटमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे कि कंपनी कोरोनाशी लढा देत असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी स्मार्टफोन, टॅबलेट आणि एयर प्यूरीफायर मोफत वाटेल. सीनेटच्या रिपोर्टनुसार Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या होम मार्केट मध्ये क्वॉरन्टीन मधील लोकांना मोफत स्मार्टफोन देईल. सॅमसंगचा प्रयत्न असा आहे कि मोबाईल फोन दिल्यामुळे घरापासून लांब असलेल्या लोकांना आपल्या परिवाराशी संपर्क साधता येईल आणि यामुळे त्यांचे स्वास्थ्य सुधारेल.

त्याचबरोबर Samsung शिक्षण संस्थांमध्ये मोफत टॅबलेट पण देणार आहे ज्याच्या मदतीने घर बसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंगने क्वॉरन्टीन सेंटर आणि हॉस्पिटल्स मध्ये पण ब्रँडचे एयर प्यूरीफायर आणि इतर ऍक्सेसरीज देत आहे. विशेष म्हणजे सॅमसंग 29 मिलियन डॉलरची मदत करत आहे जिच्या माध्यमातून फेस मास्क, हँड सॅनिटायजर आणि इतर गोष्टी उपलब्ध केल्या जात आहेत ज्या कोरोना विरोधातील युद्धात मदत करतील.

भारतात वाढला इंटरनेटचा वापर

रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

The post Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-donates-free-smartphones-to-quarantined-coronavirus-patients-tablet-device/feed/ 0
Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/#respond Wed, 01 Apr 2020 12:46:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6962 कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेलीकॉम कंपनी Vodafone Idea ने पण कोरोनोचा प्रभाव पाहून आपल्या प्रीपेड यूजर्सची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या आधी BSNL, Jio आणि Airtel ने अशीच घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या मते ते कमी इनकम असलेल्या यूजर्ससाठी आपल्या प्लानची वैधता वाढवत आहेत.

कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे. तसेच अश्या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण दिला जाईल.

या घोषणेच्या मागे कंपनीचा उद्देश कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये कमी उतपणे असलेल्या ग्राहकांना कॉल करताना कोणतीही अडचण येऊ न देणे हा आहे. याआधी टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने सोमवारी घोषणा केली होती कि कंपनी आपल्या 8 कोटी प्रीपेड ग्राहकांची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंत वाढवत आहे. त्याचबरोबर या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण देण्यात आला आहे. तसेच जियोफोनच्या ग्राहकांना 17 एप्रिल 2020 पर्यंत कॉलिंगसाठी 100 मिनिट्स आणि 100 SMS फ्री मिळतील.

सरकारी टेलिकॉम कंपन्या BSNL आणि MTNL ने पण आपल्या प्रीपेड मोबाईल सेवेची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली होती. पण सरकारी टेलीकॉम कंपन्या 20 एप्रिल पर्यंतसाठी BSNL आणि MTNL यूजर्सच्या नंबरची वैधता वाढवत आहेत. सोबतच ग्राहकांना 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/feed/ 0
लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/ https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/#respond Mon, 30 Mar 2020 13:20:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6937 बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

The post लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने भारताला जणू थांबवले आहे. संपूर्ण देश लॉकडाउन आहे आणि सर्व नागरिक आपला काम धंदा सोडून घरी बसले आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही हे जाणले होते आणि घरी बसल्यावर लोक इंटरनेटच्या मदतीने लोक टाईमपास करत आहेत. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि इंडियन यूजर्स कशाप्रकारे आपला इंटरनेट डेटा वाचवू शकतात आणि बराच काळ चालू शकता. आता देशातील इंटरनेटचा वेगाने वाढत असलेल्या वापराचे आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि गेल्या आठवड्यातच देशात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे.

ईटी च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

अनावश्यक मीडिया फाइल्स करू नका शेयर

इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यामुळे कमी होत असलेला स्पीड लक्षात घेता इंटरनेट यूजर्सने विनंती केली जात आहे व्हाट्सऍप किंवा इतर सोशल मीडिया व मेसेंजिंग ऍप्स वर अनावश्यक मीडिया फाइल्स शेयर करणे टाळा. डेटा कंजक्शन पासून वाचण्याचा सल्ला दिला जात आहे कि खासकरून वीडियोजची देवाण घेवाण कमी केली पाहिजे ज्यामुळे विनाकारण इंटरनेट स्पेक्ट्रम व नेटवर्क वर भार पडतो.

रिपोर्टनुसार भारतात सध्या 68.76 कोटींच्या आसपास इंटरनेट यूजर आहेत आणि यातील जवळपास 66.5 कोटी यूजर वायरलेस पद्धतीने इंटरनेट वापरतात. यात स्मार्टफोन आणि डॉन्गल आणि वाईफाई चा समावेश आहे. लॉकडाउन नंतर आमच्यासारख्या अनेक लोकांना घरातून ऑफिसचे काम करावे लागत आहे. फक्त वर्क फ्रॉम होम नाही तर अनेक प्रकारच्या मूलभूत गरजा व सर्विसेज पण ऑनलाईन वापरल्या जात आहेत. त्यामुळे 91मोबाईल्स पण विंनती करत आहे कि विनाकारण इंटरनेट नेटवर्क वर बोझा पडू देऊ नका जेणेकरून बिनदिक्कत सर्वांना डेटा नेटवर्क मिळू शकेल.

The post लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/feed/ 0
कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/#respond Fri, 27 Mar 2020 16:17:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6929 आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने संपूर्ण भारताला थांबवले आहे. किंवा महामारीमुळे संपूर्ण भारत देश 21 दिवसांचा Lockdown सहन करत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्सची पण अपील आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनचा प्रभाव वाढू देऊ नका. आम्ही समजू शकतो कि पूर्ण दिवस घरी राहिल्यावर फक्त एक इंटरनेटच आहे जो तुमची सर्वात जास्त साथ देतो. इंटरनेटमुळे लोकांचा टाईमपास होत आहे. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्रीपर्यंत संपतो. काही कंपन्या आपल्या प्लान्स मध्ये एफयूपी लिमिट पण देत आहेत, पण त्यात पण डेटा स्पीड खूप कमी होतो. तुमची हि समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा त्यात गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडीच्या माध्यमातून सेटअप होतो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. बऱ्याचदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यावर नोटिफिकेशन्स येते. जर तुम्ही मेलचा जास्त वापर करत जरी नसला तरी पण बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकमुळे फोनचा इंटरनेट डेटा पण सतत वापरला जातो. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यावर डेटाचा वापर कमी होईल.

2) WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड करा ऑफ

आज देशात व्हाट्सऍपचा वापर सर्वात जास्त होतो. घरातील प्रत्येकाच्या फोन मध्ये हा मेसेंजिंग ऍप आहे. इतके ग्रुप असतात कि सारखी फोनची घंटी वाजत असते. बऱ्याचदा लोक WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड ऑन ठेवतात. त्यामुळे एखादी नवीन ईमेज किंवा वीडियो फाईल व्हाट्सऍप वर आल्यावर आपोआप डाउनलोड होऊन फोन गॅलरी मध्ये सेव होतात. काही फाईल छोट्या तर काही मोठ्या असतात. सध्या तर Corona चे मेसेज धडाधड येत आहेत आणि ते डाउनलोड झाल्यावर डेटाचा वापर पण होतो. त्यामुळे जर व्हाट्सऍप वर मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ केले तर इंटरनेट डेटा वाचेल.

3) ऍप करा बंद

फोन मध्ये गेम खेळात असताना काम आल्यावर होम बटण दाबून किंवा फोन लॉक करके तुम्ही तुम्ही काम करू लागता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेऱ्याच्या वापरानंतर पण अनेक लोक होम बटण दाबून ते बंद करतात. पण फक्त होम बटण दाबल्याने हे फंक्शन पूर्णपणे बंद होत नाहीत उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहतात आणि सतत बॅटरीचा वापर करतात. त्यामुळे कोणत्याही ऍप किंवा फीचरचा वापर केल्यावर ते बंद करा.

4) डेटा सेवर मोड येईल कामी

जवळपास सर्व ब्रँडसच्या स्मार्टफोन्स मध्ये डेटा सेवरचा ऑप्शन दिला जातो. फोन मधील ऍप्स द्वारा वापरला जाणारा डेटा कन्सम्प्शन मर्यादित करता यावा म्हणून हे फिचर दिलेले असते. हा मोड ऑन करून यूजर फोन मध्ये इंस्टाल्ड ऍपचा इंटरनेट वापर कमी करू शकतात. काही स्मार्टफोन्स मध्ये ‘लिमिट बॅकंग्राउंड डेटा यूज’ चा ऑप्शन पण असेल. हा ऑन केल्यावर ऍप्स द्वारे वापरला जाणारा इंटरनेट डेटा नियंत्रित केला जाऊ शकतो.

5) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्यांना लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक असे ऍप्स असतात जे सतत लोकेशन ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे इंटरनेटचा पण सतत वापर होत असतो. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यकता नसल्यास लोकेशन सर्विसच बंद करा. काही प्रमाणात इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

6) ऑनलाईन कंटेंट ‘लो’ क्वॉलिटी वर वापरा

आधी गाणी ऐकण्यासाठी फोनच्या मेमरी मध्ये शेकडो गाणी सेव केली जात होती. पण सध्या गाणी ऐकण्यासाठी किंवा वीडियो बघण्यासाठी थेट Youtube उघडतात. त्यामुळे फक्त ऑडियो ऐकायचा असेल तर यूट्यूब मध्ये वीडियो क्वॉलिटी सर्वात कमी रेज्ल्यूशन वर ठेवा. त्याचप्रमाणे जर एखादी ऑडियो स्ट्रीमिंग ऍप वापरत असाल तर तुमची आवडती गाणी किंवा जी तुम्ही रोज ऐकता ती ऑफलाईन गॅलरी मध्ये सेव करण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

7) फ्लाइट मोडची मदत घ्या

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये एखादा असा गेम खेळत असाल जो ऑनलाईन नेटवर्क वर चालत नाही किंवा फोन मध्ये डाउनलोडेड एखादा वीडियो बघत असाल आणि अश्यावेळी एखादा महत्वाचा कॉल किंवा मेसेज येणार नसेल तर तुम्ही काही काळासाठी फोन फ्लाइट मोड वर ठेवू शकता. या स्थितीत जीपीएस वर खर्च होणारा इंटरनेट डेटा पण वाचेल. विशेष म्हणजे फोन फ्लाइट मोड वर टाकल्यावर फोनची बॅटरी पण जास्त टिकेल.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/feed/ 0