Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस

COVID-19 म्हणजे कोरोना वायरसचा दंश सध्या संपूर्ण जग झेलत आहे. चीन मध्ये सुरु झालेल्या या महामारीने संपूर्ण जगासहित भारताला पण आपल्या विळख्यात घेतले आहे. Coronavirus चा सामना करण्याचे सरकार तर प्रयत्न करत आहे त्याचबरोबर इतर लोक पण आपले योगदान देत आहेत. टेक विश्वाबाबत बोलायचे झाले तर Xiaomi, OPPO, Vivo, Realme आणि Infinix व Tecno सारखे ब्रँडस पण आपापल्या परीने कोरोनामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करत आहेत. आता Samsung संबंधित बातमी येत आहे कि या कंपनीने दोन पाऊले पुढे जात quarantine मधील लोकांना मोफत स्मार्टफोन आणि एयर प्यूरिफायर वाटण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने स्टेटमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे कि कंपनी कोरोनाशी लढा देत असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी स्मार्टफोन, टॅबलेट आणि एयर प्यूरीफायर मोफत वाटेल. सीनेटच्या रिपोर्टनुसार Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या होम मार्केट मध्ये क्वॉरन्टीन मधील लोकांना मोफत स्मार्टफोन देईल. सॅमसंगचा प्रयत्न असा आहे कि मोबाईल फोन दिल्यामुळे घरापासून लांब असलेल्या लोकांना आपल्या परिवाराशी संपर्क साधता येईल आणि यामुळे त्यांचे स्वास्थ्य सुधारेल.

त्याचबरोबर Samsung शिक्षण संस्थांमध्ये मोफत टॅबलेट पण देणार आहे ज्याच्या मदतीने घर बसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंगने क्वॉरन्टीन सेंटर आणि हॉस्पिटल्स मध्ये पण ब्रँडचे एयर प्यूरीफायर आणि इतर ऍक्सेसरीज देत आहे. विशेष म्हणजे सॅमसंग 29 मिलियन डॉलरची मदत करत आहे जिच्या माध्यमातून फेस मास्क, हँड सॅनिटायजर आणि इतर गोष्टी उपलब्ध केल्या जात आहेत ज्या कोरोना विरोधातील युद्धात मदत करतील.

भारतात वाढला इंटरनेटचा वापर

रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here