cyber security - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Mar 2023 12:22:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/#respond Sun, 02 Apr 2023 03:30:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12403 भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया […]

The post ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून डिजिटल पेमेंट व ऑनलाईन शॉपिंग इत्यादी बाबतीत Cyber Crime च्या घटना समोर येत आहेत.

काही मिनिटांच्या फोन कॉल आणि एखादं अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानं लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरले जात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब आणि भोळे लोक अशा सायबर गुन्ह्यांना जास्त बळी पडतात. आज आम्ही आमच्या वाचकांना सायबर गुन्ह्याला बळी पडल्यावर त्याची तक्रार ऑनलाईन कशी करायची, याची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: तुमचा Xiaomi फोन बनावट तर नाही ना? फसवणूक होण्याआधी अशी करून घ्या खात्री

Cyber Crime ची ऑनलाइन तक्रार कशी करायची

1. सर्वप्रथम राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा, यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करा.

2. इथे पोर्टल संबंधित माहिती सोबतच युजरला विचारले जाईल की त्यांच्याद्वारे दिलेली सर्व माहिती योग्य आहे. ते मान्य करून पुढे जा.

3. इथे Report Cyber Crime Related to Women/Child आणि Report Other Cyber Crime चे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला जी तक्रार कार्याची आहे त्यावर क्लिक करा.

4. फसवणूक, फिशिंग, हॅकिंग व फ्रॉड सारख्या घटना ‘अदर सायबर क्राइम’ अंतगर्त येतात. त्यावर क्लिक केल्यावर मोबाइल नंबरसह अन्य माहिती द्यावी लागेल.

5. तर दुसरीकडे ‘सायबर क्राइम रिलेटेड टू विमेन/चिल्ड्रेन’ मध्ये पॉर्नोग्राफी, ऑनलाइन बुलिंग आणि Sexually Explicit कंटेंटचा समावेश आहे, ज्यांची तक्रार या सेग्मेंट अंतगर्त नोंदवता येईल.

6. इथे Report Anonymously आणि Report And Track दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात तुमची तुमची ओळख लपवून देखील सायबर क्राइमची तक्रार करता येते. गरजेनुसार युजर्स एका ऑप्शनची निवड करू शकतात. हे देखील वाचा: गोगल गायीच्या स्पिडनं चालू आहे का Jio चं इंटरनेट? ‘ही’ सेटिंग बदलताच मिळेल रॉकेट स्पीड

7. क्राइम कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आरोपीचं नाव, जागा आणि पूर्वे मागितले जातील. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नंतर तक्रार सबमिट करा.

8. सायबर क्राइम रिपोर्ट केल्यानंतर एका यूनिक नंबरच्या स्वरूपात कम्प्लेंट आयडी दिला जाईल. या नंबरच्या माध्यमातून नंतर तुमची तक्रार ट्रॅक करता येईल.

अशी करा तक्रार ट्रॅक

9. तक्रार नोंदवल्यानंतर तिचं स्टेटस चेक करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवर लॉग-इन करावं लागेल. त्यानंतर Report And Track बटनवर क्लिक करा.

10. इथे आधीचा कम्प्लेंट आयडी मागितला जाईल जो रिकाम्या जागी भरावा लागेल, त्यामुळे राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या कारवाईची माहिती समोर येईल.

हे पोर्टल थेट भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येतं. याचा उद्देश पोलीस स्टेशनला न जाता ऑनलाइन पद्धतीनं गुन्हे नोंदवणं आहे. इथे तुमची ओळख न सांगता देखील तक्रार करता येते. तसेच अन्य माहिती किंवा मदतीसाठी भारत सरकारच्या विभागाद्वारे जारी टोल फ्री नंबर ‘155260’ वर संपर्क देखील केला जाऊ शकतो.

The post ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/feed/ 0
हे आहे FaceApp चे कटू सत्य, हा शौक पडू शकतो महागात https://www.91mobiles.com/marathi/faceapp-photo-editor-app-viral-misuse-photo-term-conditions-privacy-issue-india/ https://www.91mobiles.com/marathi/faceapp-photo-editor-app-viral-misuse-photo-term-conditions-privacy-issue-india/#respond Mon, 22 Jul 2019 08:38:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4852 दोन वर्षांपूर्वी बनलेला ऍप अचानक भारतात अशाप्रकारे वायरल होणे आश्चर्यकारक आहे. यातून भारतीयांची विचारसरणी आणि परिपक्वता दिसून येते.

The post हे आहे FaceApp चे कटू सत्य, हा शौक पडू शकतो महागात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भविष्याची चिंता प्रत्येकाला असते. भविष्यात काय होणार आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. आतापर्यंत आपले भविष्य जाणून घेण्यासाठी लोक ज्योतिषाकडे जात होते. पण सध्या भविष्य बघण्यासाठी लोक आपला हात कोणाला दाखवत नाहीत तर आपल्या हातात फोन घेत आहेत आणि वापरत आहेत FaceApp. गेल्या काही दिवसांपासून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर FaceApp ने धुमाकूळ घातला आहे. या ऍपचा शौक लोकांना असा लागला आहे कि भारतात काही दिवसांतच हा नंबर वन ऍप बनला आहे. पण FaceApp वापरणाऱ्या लोकांना कदाचित माहित नाही FaceApp चे हे कटू सत्य.

FaceApp गेल्या आठवड्यात इतका वेगाने वायरल झाला आहे कि एंडरॉयड प्ले स्टोर आणि एप्पल ऍप स्टोर वर हा ऍप नंबर वन पोजिशन वर पोचला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा ऍप 10 कोटींपेक्षा पण जास्त वेळा गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड केला गेला आहे. हा ऍप वायरल होण्याची सुरवात झाली होती एका चॅलेंज पासून ज्यात लोक FaceApp वर आपला फोटो म्हातारपणात रूपांतरित करून तो सोशल मीडिया वर पोस्ट करत आहेत.

FaceApp वर एडिट झालेले फोटोज आर्टिफिशियल इंटेलिजेंस द्वारे लोकांचे म्हातारपणातील फोटो बनवतात. आणि म्हातारपणातील हे फोटोज लोकांना इतके आवडले कि FaceApp काही दिवसांत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पसरला. एकमेकांचे बघून लोकांनी आपल्या फोन मध्ये पण हा ऍप डाउनलोड केला आणि आवडीने म्हातारे होऊ लागेल. पण या गंमतीजंमतीत लोकांनी सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले ती म्हणजे FaceApp च्या टर्म्स अँड कंडिशंस.

हे आहे कटू सत्य

FaceApp जेव्हा डाउनलोड केल्यावर तेव्हा टर्म्स अँड कंडिशंस सांगण्यात येतात ज्या एक्सेप्ट करून हा ऍप वापरला जातो. FaceApp च्या आवडीमुळे लोक या FaceApp टर्म्स अँड कंडिशंस कडे बिलकुल लक्ष देत नाहीत आणि सर्व अटी मान्य करतात. विशेष म्हणज या टर्म्स अँड कंडिशंस मध्ये पर्पिचुअल, इररिवोकेबल, रॉयलटी फ्री आणि वर्ल्डवाइड सारख्या टर्मसचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि FaceApp वर अपलोड केले गेलेलं फोटोज आता फेसऍप च्या मालकीचे झाले आहेत.

FaceApp च्या अटींनुसार तुम्ही जो फोटो अपलोड केले आहेत त्या फोटोचा हक्क FaceApp मिळाला आहे आणि या फोटोजचा वापर FaceApp आपल्या मर्जीने कुठेही करू शकते, कशासाठी पण, कुठेही, कोणत्याही कामात कधीही वापरू शकतात. म्हणजे तुमच्या फोटो वर तुमच्यापेक्षा जास्त हक्क FaceApp चा झाला आहे आणि कायदेशीररित्या तुमच्या फोटोचा वापर करण्याचा तुम्ही विरोध पण करू शकत नाही. FaceApp फक्त भारतातच नाही तर जगभरात तुमच्या फोटोचा वापर आपल्या मर्जीने करू शकतो.

15 कोटींपेक्षा जास्त फोटोज

हैराणीची बाब म्हणजे एका रिपोर्टनुसार FaceApp च्या सर्वर वर आतापर्यंत 15 कोटींपेक्षा जास्त लोकांचे फोटो सेव झाले आहेत. हे 15 कोटी फोटोज पूर्णपणे FaceApp च्या मालकीचे झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे यूजर्सनी आपला अकाउंट डिलीट जरी केला तरी त्यांचे फोटोज FaceApp च्या सर्वर वर राहतील.

FaceApp चे स्पष्टीकरण

स्वतःवरील आरोपांबाबत FaceApp ने पण स्पष्टीकरण दिले आहे. FaceApp म्हणते कि, ‘त्यांच्या ऍप वर जो फोटो अपलोड होतो तो त्यांच्या सर्वर मध्ये सेव होतो हे सत्य आहे. पण हे मर्यादित कालावधीसाठी होते. FaceApp सीईओ ने दावा केला आहे कि हे फोटोज फक्त 48 तास ऍपच्या सर्वर वर रहातात आणि 48 तास पूर्ण झाल्यानंतर आपोआप फोटो सर्वर वरून डिलीट केला जातो.’

विशेष म्हणजे FaceApp एक रशियन ऍप आहे ज्याची निर्मिती 2017 मध्ये झाली होती. दोन वर्षांपूर्वी बनलेला ऍप अचानक भारतात अशाप्रकारे वायरल होणे आश्चर्यकारक आहे. यातून भारतीयांची विचारसरणी आणि परिपक्वता दिसून येते.

The post हे आहे FaceApp चे कटू सत्य, हा शौक पडू शकतो महागात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/faceapp-photo-editor-app-viral-misuse-photo-term-conditions-privacy-issue-india/feed/ 0