ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या

भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून डिजिटल पेमेंट व ऑनलाईन शॉपिंग इत्यादी बाबतीत Cyber Crime च्या घटना समोर येत आहेत.

काही मिनिटांच्या फोन कॉल आणि एखादं अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानं लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरले जात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब आणि भोळे लोक अशा सायबर गुन्ह्यांना जास्त बळी पडतात. आज आम्ही आमच्या वाचकांना सायबर गुन्ह्याला बळी पडल्यावर त्याची तक्रार ऑनलाईन कशी करायची, याची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: तुमचा Xiaomi फोन बनावट तर नाही ना? फसवणूक होण्याआधी अशी करून घ्या खात्री

Cyber Crime ची ऑनलाइन तक्रार कशी करायची

1. सर्वप्रथम राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा, यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करा.

2. इथे पोर्टल संबंधित माहिती सोबतच युजरला विचारले जाईल की त्यांच्याद्वारे दिलेली सर्व माहिती योग्य आहे. ते मान्य करून पुढे जा.

3. इथे Report Cyber Crime Related to Women/Child आणि Report Other Cyber Crime चे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला जी तक्रार कार्याची आहे त्यावर क्लिक करा.

4. फसवणूक, फिशिंग, हॅकिंग व फ्रॉड सारख्या घटना ‘अदर सायबर क्राइम’ अंतगर्त येतात. त्यावर क्लिक केल्यावर मोबाइल नंबरसह अन्य माहिती द्यावी लागेल.

5. तर दुसरीकडे ‘सायबर क्राइम रिलेटेड टू विमेन/चिल्ड्रेन’ मध्ये पॉर्नोग्राफी, ऑनलाइन बुलिंग आणि Sexually Explicit कंटेंटचा समावेश आहे, ज्यांची तक्रार या सेग्मेंट अंतगर्त नोंदवता येईल.

6. इथे Report Anonymously आणि Report And Track दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात तुमची तुमची ओळख लपवून देखील सायबर क्राइमची तक्रार करता येते. गरजेनुसार युजर्स एका ऑप्शनची निवड करू शकतात. हे देखील वाचा: गोगल गायीच्या स्पिडनं चालू आहे का Jio चं इंटरनेट? ‘ही’ सेटिंग बदलताच मिळेल रॉकेट स्पीड

7. क्राइम कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आरोपीचं नाव, जागा आणि पूर्वे मागितले जातील. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नंतर तक्रार सबमिट करा.

8. सायबर क्राइम रिपोर्ट केल्यानंतर एका यूनिक नंबरच्या स्वरूपात कम्प्लेंट आयडी दिला जाईल. या नंबरच्या माध्यमातून नंतर तुमची तक्रार ट्रॅक करता येईल.

अशी करा तक्रार ट्रॅक

9. तक्रार नोंदवल्यानंतर तिचं स्टेटस चेक करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवर लॉग-इन करावं लागेल. त्यानंतर Report And Track बटनवर क्लिक करा.

10. इथे आधीचा कम्प्लेंट आयडी मागितला जाईल जो रिकाम्या जागी भरावा लागेल, त्यामुळे राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या कारवाईची माहिती समोर येईल.

हे पोर्टल थेट भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येतं. याचा उद्देश पोलीस स्टेशनला न जाता ऑनलाइन पद्धतीनं गुन्हे नोंदवणं आहे. इथे तुमची ओळख न सांगता देखील तक्रार करता येते. तसेच अन्य माहिती किंवा मदतीसाठी भारत सरकारच्या विभागाद्वारे जारी टोल फ्री नंबर ‘155260’ वर संपर्क देखील केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here