हे आहे FaceApp चे कटू सत्य, हा शौक पडू शकतो महागात

भविष्याची चिंता प्रत्येकाला असते. भविष्यात काय होणार आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. आतापर्यंत आपले भविष्य जाणून घेण्यासाठी लोक ज्योतिषाकडे जात होते. पण सध्या भविष्य बघण्यासाठी लोक आपला हात कोणाला दाखवत नाहीत तर आपल्या हातात फोन घेत आहेत आणि वापरत आहेत FaceApp. गेल्या काही दिवसांपासून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर FaceApp ने धुमाकूळ घातला आहे. या ऍपचा शौक लोकांना असा लागला आहे कि भारतात काही दिवसांतच हा नंबर वन ऍप बनला आहे. पण FaceApp वापरणाऱ्या लोकांना कदाचित माहित नाही FaceApp चे हे कटू सत्य.

FaceApp गेल्या आठवड्यात इतका वेगाने वायरल झाला आहे कि एंडरॉयड प्ले स्टोर आणि एप्पल ऍप स्टोर वर हा ऍप नंबर वन पोजिशन वर पोचला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा ऍप 10 कोटींपेक्षा पण जास्त वेळा गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड केला गेला आहे. हा ऍप वायरल होण्याची सुरवात झाली होती एका चॅलेंज पासून ज्यात लोक FaceApp वर आपला फोटो म्हातारपणात रूपांतरित करून तो सोशल मीडिया वर पोस्ट करत आहेत.

FaceApp वर एडिट झालेले फोटोज आर्टिफिशियल इंटेलिजेंस द्वारे लोकांचे म्हातारपणातील फोटो बनवतात. आणि म्हातारपणातील हे फोटोज लोकांना इतके आवडले कि FaceApp काही दिवसांत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पसरला. एकमेकांचे बघून लोकांनी आपल्या फोन मध्ये पण हा ऍप डाउनलोड केला आणि आवडीने म्हातारे होऊ लागेल. पण या गंमतीजंमतीत लोकांनी सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले ती म्हणजे FaceApp च्या टर्म्स अँड कंडिशंस.

हे आहे कटू सत्य

FaceApp जेव्हा डाउनलोड केल्यावर तेव्हा टर्म्स अँड कंडिशंस सांगण्यात येतात ज्या एक्सेप्ट करून हा ऍप वापरला जातो. FaceApp च्या आवडीमुळे लोक या FaceApp टर्म्स अँड कंडिशंस कडे बिलकुल लक्ष देत नाहीत आणि सर्व अटी मान्य करतात. विशेष म्हणज या टर्म्स अँड कंडिशंस मध्ये पर्पिचुअल, इररिवोकेबल, रॉयलटी फ्री आणि वर्ल्डवाइड सारख्या टर्मसचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि FaceApp वर अपलोड केले गेलेलं फोटोज आता फेसऍप च्या मालकीचे झाले आहेत.

FaceApp च्या अटींनुसार तुम्ही जो फोटो अपलोड केले आहेत त्या फोटोचा हक्क FaceApp मिळाला आहे आणि या फोटोजचा वापर FaceApp आपल्या मर्जीने कुठेही करू शकते, कशासाठी पण, कुठेही, कोणत्याही कामात कधीही वापरू शकतात. म्हणजे तुमच्या फोटो वर तुमच्यापेक्षा जास्त हक्क FaceApp चा झाला आहे आणि कायदेशीररित्या तुमच्या फोटोचा वापर करण्याचा तुम्ही विरोध पण करू शकत नाही. FaceApp फक्त भारतातच नाही तर जगभरात तुमच्या फोटोचा वापर आपल्या मर्जीने करू शकतो.

15 कोटींपेक्षा जास्त फोटोज

हैराणीची बाब म्हणजे एका रिपोर्टनुसार FaceApp च्या सर्वर वर आतापर्यंत 15 कोटींपेक्षा जास्त लोकांचे फोटो सेव झाले आहेत. हे 15 कोटी फोटोज पूर्णपणे FaceApp च्या मालकीचे झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे यूजर्सनी आपला अकाउंट डिलीट जरी केला तरी त्यांचे फोटोज FaceApp च्या सर्वर वर राहतील.

FaceApp चे स्पष्टीकरण

स्वतःवरील आरोपांबाबत FaceApp ने पण स्पष्टीकरण दिले आहे. FaceApp म्हणते कि, ‘त्यांच्या ऍप वर जो फोटो अपलोड होतो तो त्यांच्या सर्वर मध्ये सेव होतो हे सत्य आहे. पण हे मर्यादित कालावधीसाठी होते. FaceApp सीईओ ने दावा केला आहे कि हे फोटोज फक्त 48 तास ऍपच्या सर्वर वर रहातात आणि 48 तास पूर्ण झाल्यानंतर आपोआप फोटो सर्वर वरून डिलीट केला जातो.’

विशेष म्हणजे FaceApp एक रशियन ऍप आहे ज्याची निर्मिती 2017 मध्ये झाली होती. दोन वर्षांपूर्वी बनलेला ऍप अचानक भारतात अशाप्रकारे वायरल होणे आश्चर्यकारक आहे. यातून भारतीयांची विचारसरणी आणि परिपक्वता दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here