Feature Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Oct 2022 09:18:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चे 5 सर्वात स्वस्त Mobile Phone, फक्त 1400 रुपयांपासून सुरु होते किंमत! https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-samsung-mobile-phone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-samsung-mobile-phone-in-india/#respond Tue, 11 Oct 2022 09:18:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13874 Airtel आणि Reliance Jio नं भारतात 5G Service चा शुभारंभ केला आहे. त्यामुळे वेगवान डेटा स्पीडचा अनुभव काही लोक घेतील. परंतु अजूनही देशातील मोठी लोकसंख्या अशी आहे जी टचस्क्रीन Android Smartphone नव्हे तर Keypad असलेला 2G Mobile Phone वापरणं पसंत करतात. हे मोबाइल युजर आपल्या फोनवर जास्त पैसे उधळत नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रयत्न कमीत कमी […]

The post Samsung चे 5 सर्वात स्वस्त Mobile Phone, फक्त 1400 रुपयांपासून सुरु होते किंमत! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel आणि Reliance Jio नं भारतात 5G Service चा शुभारंभ केला आहे. त्यामुळे वेगवान डेटा स्पीडचा अनुभव काही लोक घेतील. परंतु अजूनही देशातील मोठी लोकसंख्या अशी आहे जी टचस्क्रीन Android Smartphone नव्हे तर Keypad असलेला 2G Mobile Phone वापरणं पसंत करतात. हे मोबाइल युजर आपल्या फोनवर जास्त पैसे उधळत नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रयत्न कमीत कमी खर्चात चांगला फोन खरेदी करण्याचा असतो. अशा 2जी युजर्ससाठी आज आम्ही Samsung च्या 5 स्वस्त कीपॅड मोबाइल फोनची लिस्ट घेऊन आलो आहोत जे फक्त 1,400 रुपयांपासून विकत घेता येतील. हे स्वस्त सॅमसंग मोबाइल फोन दीर्घकाळ टिकतात आणि युजरच्या गरजा पूर्ण करतात.

Basic Mobile Phone

जर तुमच्या घरात किंवा ओळखीत अशी व्यक्ती असेल जिला टच स्क्रीन मोबाइल वापरता येत नाही तसेच फोनमध्ये इंटरनेट वापरत नाही, तर अशा व्यक्तीसाठी हे कीपॅड फीचर फोन परफेक्ट ऑप्शन आहेत. हे बेसिक मोबाइल फोन घरातील वयोवृद्ध लोकांच्या कामी येतेय ज्यांना फोनवर बोलायला खूप आवडतं. तसेच जे लोक अत्यंत कमी किंमतीत मोबाइल घेऊ इच्छित आहेत किंवा स्मार्टफोनला बॅकअप म्हणून देखील फिचर फोन्सचा विचार करता येईल. हे फीचर फोन्स एखाद्या नजीकच्या मोबाइलच्या दुकानात किंवा रिटेल स्टोरवरून विकत घेता येतील.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

Samsung Basic Mobile

Samsung Guru FM Plus

नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा सॅमसंग मोबाइल फोन खासकरून म्यूजिकचा आनंद घेण्यासाठी बनवण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5एमएम स्टीरियो ईयरफोन वापरता येतात. तसेच एफएम रेडियो स्पिकरवर ऐकता येईल. फोनचा कलर डिस्प्ले इनरिच टेक्स्टसह येतो म्हणजे फोन स्क्रीनवरील प्रत्येक अक्षर स्पष्ट दिसतं.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

या सॅमसंग फीचर फोनमध्ये 800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी मायक्रो यूएसबीच्या माध्यमातून चार्ज करता येईल. सोबत मिळणारी चार्जिंग केबल फोनमध्ये गाणी इत्यादी लोड करण्याच्या कामी येते. पेटीएम मॉलवर हा फोन फक्त 1,400 रुपयांमध्ये मिळत आहे.

Samsung Guru 1215

हा कीपॅड असलेला सॅमसंग फोन 1,499 रुपयांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोबाइलमध्ये 1.50 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे जो टीएफटी पॅनलवर बनला आहे. हा सिंगल सिम फोन आहे ज्यात 4एमबी रॅम आहे. फोनमध्ये 800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

थक्क करणारी बाब म्हणजे फुल चार्जमध्ये हा मोबाइल फोन 720 तासांपर्यंत वापरता येतो. तुम्हाला हिशोब करण्याची गरज नाही, आम्ही सांगतो की 720 तास म्हणजे 30 दिवस! म्हणजे सॅमसंगचा हा फोन एकदा चार्ज केल्यावर संपूर्ण एक महिना चार्जींगविना चालतो.

Samsung Guru 1200

फक्त 1,500 रुपयांमध्ये यह सॅमसंग मोबाइल फोन मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. शानदार बिल्ड क्वॉलिटी सह या फोनमध्ये मजबूत कीपॅड देण्यात आला आहे, ज्याच्या मध्यभागी नेव्हिगेशन बटन देखील आहे. हा फोन 1.52 इंचाच्या कलर डिस्प्लेला सपोर्ट करतो जो टीएफटी पॅनलवर बनला आहे.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

या सॅमसंग मोबाइलमध्ये 4 एमबी रॅम आणि 8 एमबी मेमरी देण्यात आली आहे. हा फोन पावरफुल फ्लॅश लाइटला देखील सपोर्ट करतो. तसेच एकदा फुल चार्ज केल्यावर हा मोबाइल जवळपास 500 तास सतत ऑन राहू शकतो. हा Blue, Black, Gold आणि White कलरमध्ये विकत घेता येईल.

Guru Music 2

स्वस्त फोनमध्ये म्यूजिकची मजा घेण्यासाठी हा मोबाइल बेस्ट आहे जो फक्त 1,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या कीपॅड मोबाइल फोनमध्ये 2 इंचाची कलर स्क्रीन देण्यात आली आहे जीच्या खाली स्टाईलिश बटन पॅनल आहे. सॅमसंग गुरू म्यूजिक 2 मध्ये 3,000 गाणी सेव्ह करता येतील तसेच 16जीबी मेमरी कार्ड वापरता येईल.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

हेडफोन व लीड सोबतच म्यूजिकची मजा स्पिकरवर देखील घेता येईल जे खूप पावरफुल साउंड क्वॉलिटी देतात. गाणी प्ले आणि पॉज करण्यासाठी खास बटन देण्यात आले आहेत. हा ड्युअल सिम फोन आहे ज्यात एफएम रेडियो, एमपी3 आणि एमपी4 चा आनंद घेता येईल.

Samsung Metro 313

सॅमसंग मेट्रो 313 मोबाइल फोन 2,690 रुपयांमध्ये विकत घेता येईल जो Gold आणि Black दोन रांगांमध्ये येतो. या फोनमध्ये 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 2 इंचाचा क्यूक्यूवीजीए टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 65के कलर डेप्थला सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 2G GSM चा वापर करता येतो.

या फीचर फोनमध्ये 3.5एमएम जॅक आणि ब्लूटूथ देखील देण्यात आलं आहे जो एफएम रेडियो, एमपी3 आणि 3जीपी व्हिडीओला देखील सपोर्ट करतो. या फोनमध्ये 1,000एमएएचची मोठी बॅटरी आहे तसेच 16 जीबी पर्यंतचा मेमरी कार्डचा वापर करता येतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung चे 5 सर्वात स्वस्त Mobile Phone, फक्त 1400 रुपयांपासून सुरु होते किंमत! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-samsung-mobile-phone-in-india/feed/ 0
सर्वात स्वस्त कीपॅड असलेले फोन; किंमत 500 रुपयांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/keypad-phone-under-500/ https://www.91mobiles.com/marathi/keypad-phone-under-500/#respond Tue, 27 Sep 2022 07:40:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13472 भारतात 4G आल्यापासून स्मार्टफोन युजर्सची संख्या वेगानं वाढली आहे. प्रत्येकाच्या हातात टचस्क्रीन मोबाइल जरी दिसत असला तरी आजही लाखो लोक असे आहेत जे कीपॅड असलेल्या फोन्सना पसंती देतात. हे फोन्स वापरण्यास सोपे असतात आणि यांची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकते. घरातील वयोवृद्ध या फोन्सची मागणी करतात कारण यातील फिजिकल बटन्समुळे नंबर डायल करणं सोपं जातं. काही […]

The post सर्वात स्वस्त कीपॅड असलेले फोन; किंमत 500 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात 4G आल्यापासून स्मार्टफोन युजर्सची संख्या वेगानं वाढली आहे. प्रत्येकाच्या हातात टचस्क्रीन मोबाइल जरी दिसत असला तरी आजही लाखो लोक असे आहेत जे कीपॅड असलेल्या फोन्सना पसंती देतात. हे फोन्स वापरण्यास सोपे असतात आणि यांची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकते. घरातील वयोवृद्ध या फोन्सची मागणी करतात कारण यातील फिजिकल बटन्समुळे नंबर डायल करणं सोपं जातं. काही लोक सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी तर काही बॅकअप फोन म्हणून फीचर्स फोन्सचा वापर करत असतात.

कारण कोणतंही असू दे, परंतु जर तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी किंवा स्वतःसाठी एक स्वस्त कीपॅड असलेला फोन घेण्याचा विचार करत असलं तर पुढील यादी पाहा. पुढे दिलेल्या फिचर फोन्सच्या किंमती 500 रुपयांपेक्षा कमी आहेत. एक महत्वाची बाब म्हणजे मी या फोन्सच्या ऑनलाइन किंमती दिल्या आहेत, आणि हे फोन्स तुम्ही ऑफलाइन देखील करू शकता, फक्त किंमती थोड्या बदलू शकतात.

Keypad Phone under 500

1. I Kall K74

सर्वात स्वस्त कीपॅड फोन्सबद्दल बोलायचं झाला तर हा फोन फक्त 378 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. मी आय कॉल के74 बद्दल बोलत आहे जो 2जीवर चालणारा सिंगल सिम फीचर फोन आहे. हा मोठ्याप्रमाणावर Nokia सारखा दिसतो आणि याचे Blue, Red आणि Yellow कलर व्हेरिएंट उपलब्ध आहेत. हा मोबाइल फोन एफएम रेडियोसह येतो, जे ऐकण्यासाठी बॅक पॅनलवर स्पिकर देखील देण्यात आला आहे.

Keypad Phone Under 500

I Kall K74 मध्ये 128 x 128 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 1.44 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 126पीपीआयला सपोर्ट करती आहे. या कीपॅड मोबाइल फोनमध्ये 800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी दीर्घ बॅकअप देऊ शकते. या स्वस्त मोबाइलमध्ये रिंगटोन, कॅल्क्युलेटर, स्टॉपवॉच, कॅलेंडर आणि अलॉर्म सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या

2. Rocktel R6

मोठा आवाज करून गाणी ऐकण्यासाठी रॉकटेल आर6 उपयुक्त ठरेल. या कीपॅड असलेल्या मोबाइलची प्राइस फक्त 449 रुपये आहे जो Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 1.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन आणि 114पीपीआयवर चालतो.

Keypad Phone Under 500

Rocktel R6 मध्ये 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी 1,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Calculator, Stopwatch, Calendar आणि Alarm सोबतच 3GP, MP4 आणि MP3 सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो 2जीवर चालतो.

3. Rocktel W8

स्टायलिश कीपॅड असलेला फोन हवा असेल तर रॉकटेल डब्ल्यू8 तुम्हाला नक्कीच आवडेल. या फोनचा बॅक पॅनल रिमूव्हेबल आहे ज्यात डबल शेड मिळते. कव्हर ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये येतो त्याखाली बॉडी पार्ट ऑरेंज कलरमध्ये देण्यात आले आहेत. हा मोबाइल फोन पण 449 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे ज्यात 1,050एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Keypad Phone Under 500

कीपॅड मोबाइल फोन Rocktel W8 मध्ये 1.8 इंचाचा डिस्प्ले आहे जो 114पीपीआयवर चालतो. या फोनच्या बॅक पॅनलवर 0.3एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशसह येतो. या फोनमध्ये पण 8जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल तसेच यात एमपी3, एमपी4 आणि 3जीपी सारखे इंटरटेनमेंट ऑप्शन मिळतात.

4. Rocktel R3

रॉकटेल आर3 मोबाइल फोनमध्ये 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 1.8 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 114पीपीआयला सपोर्ट करती आहे. हा कीपॅड मोबाइल फोन फक्त 449 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे जो Black, Blue, Green आणि White कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये युजरला Calculator, Stopwatch, Calendar आणि Alarm असे फिचर मिळतात.

Keypad Phone Under 500

हा ड्युअल सिम फोन 2जी वर काम करती आहे तसेच मनोरंजनासाठी रॉकटेल आर3 एमपी3, एमपी4 आणि 3जीपीला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 8जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी आणि व्हिडीओ बनवण्यासाठी या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच दीर्घ बॅकअप देण्यासाठी या मोबाइल फोनमध्ये 1,000एमएएच बॅटरी आहे.

5. Rocktel W7

जर सिंगल चार्जमध्ये अनेक आठवड्यांचा बॅकअप हवा असेल तर रॉकटेल डब्ल्यू7 एक परफेक्ट ऑप्शन आहे. या फोनमध्ये 1,200एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी एकदा फुल चार्ज केल्यास बराच काळ टिकते. हा कीपॅड मोबाइल 449 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे जो Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Airtel युजर्ससाठी खुशखबर! 5GB डेटा मिळतोय अगदी FREE; रिचार्ज करण्याची देखील गरज नाही

Keypad Phone Under 500

Rocktel W7 मध्ये 240 x 320 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2.4 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 167पीपीआयला सपोर्ट करती आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो 2जी वर चालतो. फोनमध्ये एमपी3 आणि 3जीपी मिळतात तसेच 8जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो.

The post सर्वात स्वस्त कीपॅड असलेले फोन; किंमत 500 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/keypad-phone-under-500/feed/ 0