Airtel युजर्ससाठी खुशखबर! 5GB डेटा मिळतोय अगदी FREE; रिचार्ज करण्याची देखील गरज नाही

Airtel Offer Free 5GB Data Prepaid Customers Know How To Avail

Airtel Free Data Offer: जर तुम्ही देखील Airtel Users असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. Airtel आपल्या ग्राहकांना मोफत 5 जीबी डेटा (Airtel Free 5GB Data Offer) देत आहे. हा Free Data मिळवण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. जर तुम्हाला देखील या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला Airtel थँक्स अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल. चला जाणून घेऊया हा डेटा क्लेम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Airtel Free Data Offer

टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टमध्ये Airtel च्या या फ्री डेटा ऑफरची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की Airtel चा यह 5GB फ्री डेटा त्याचा ग्राहकांना मिळेल जे Airtel Thanks अ‍ॅप डाउनलोड करतील आणि त्यांच्या एयरटेल नंबरनं लॉगिन करतील. त्यामुळे जर तुम्हाला हा डेटा हवा असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून एयरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. एयरटेल थँक्स अ‍ॅपच्या माध्यमातून रिचार्जसह पेमेंट सारख्या अनेक सुविधा मिळतात. हे देखील वाचा: Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series

Airtel Offer Free 5GB Data Prepaid Customers Know How To Avail

अशाप्रकारे मिळवा फ्री डेटा

Airtel Thanks अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यात तुमच्या एयरटेल नंबरचा वापर करून लॉगिन करा. त्यांनतर अ‍ॅपच्या My Coupons सेक्शनमध्ये जाऊन फ्री डेटा कुपन क्लेम करता येईल. एयरटेलकडून मिळणारा हा फ्री 5GB डेटा एकाच वेळी ग्राहकांना मिळणार नाही. तर Airtel Thanks अ‍ॅपमध्ये 1-1 जीबीचे 5 कुपन युजरच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट केले जातील, ज्यांचा वापर युजर्स करू शकतील.

प्रीपेड युजर्सना मिळेल फ्री डेटा

महत्वाची बाब म्हणजे कंपनीची ही ऑफर फक्त प्रीपेड युजर्ससाठी आहे. जर तुम्ही पोस्टपेड ग्राहक असाल तर या ऑफरचा लाभ घेता येणार नाही आणि डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन एयरटेल कनेक्शन घ्यावं लागेल. हे देखील वाचा: Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series

Airtel Offer Free 5GB Data Prepaid Customers Know How To Avail

Airtel 5जी लाँच डेट

एयरटेल 5जीची वाट ग्राहक पाहत आहेत, 5G ची चाहूल लागल्यापासून कंपनीच्या ग्राहक संख्येत देखील वाढ झाली आहे. कंपनीचे CEO Gopal Vittal यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी लवकरच देशात 5जी सर्व्हिस लाँच करू शकते. कंपनीची योजना अशी आहे की देशातील मोठी शहरं जसे की मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई इत्यादी शहरांमध्ये 5जी सर्व्हिस डिसेंबर 2022 पर्यंत लाँच केली जाईल. त्यानंतर या सर्व्हिसचा विस्तार संपूर्ण देशात वेगानं केला जाईल. कंपनीला आशा आहे की साल 2023 च्या अखेरपर्यंत देशातील प्रत्येक शहरी भागात 5जी सर्व्हिस लाँच होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार एयरटेलचं 5G पुढील महिन्यात सक्रिय होऊ शकतं, परंतु अचूक तारीख मात्र अजूनही समजली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here