जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

पुढील महिन्यात भारतात 5G Service येणार असल्याची माहिती केंद्रीय दूर संचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे. दिवाळीपासून भारतीय मोबाइल युजर आपल्या स्मार्टफोन्समध्ये 5G Network चा वापर करू शकतील आणि सुपर फास्ट 5G Internet चा आनंद घेऊ शकतील. रिलायन्स जियो सर्वप्रथम 5जी सर्व्हिस सुरु करू शकते. Jio 5G रोलआउट होण्याआधीच आता Jio 5G Phone Price देखील समोर आली आहे. जियो 5जी स्मार्टफोनची किंमत 8,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

Jio 5G Phone Price

जियो फोन 5जीची किंमत काउंटरपॉईंटच्या रिपोर्ट मधून समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8,000 रुपये ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. ही प्राइस रेंज पाहता असा अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Airtel युजर्ससाठी खुशखबर! 5GB डेटा मिळतोय अगदी FREE; रिचार्ज करण्याची देखील गरज नाही

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

रिलायन्स जियो 5जी स्मार्टफोन लाँच करण्याआधी कंपनी आपल्या 4जी ग्राहकांना 5जी नेटवर्कवर आणण्याचे काम करेल आणि मोठा 5जी युजर बेस बनवल्यानंतर आपला 5जी फोन बाजारात सादर करेल. विशेष म्हणजे Reliance AGM 2022 मध्ये Mukesh Ambani यांनी आधीच घोषणा केली आहे की कंपनी Google सोबत मिळून ultra-affordable 5G phone लाँच करेल.

Jio 5G Smartphone

रिपोर्टनुसार साल 2024 पर्यंत रिलायन्स जियो कमी किंमत असलेला affordable 5G mmWave + sub-6GHz smartphone पण लाँच करू शकते. हा मोबाइल फोन भारतातील लो बजेट 5जी स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त चांगल्या 5जी बँड्सना सपोर्ट करेल तसेच लो लेटन्सी आणि स्मूद 5जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देऊ शकेल. परंतु याला बाजारात येण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल.

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Jio Phone 5G Specifications

लीक्स नुसार Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर असेल. फोनमध्ये 60हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो तसेच स्क्रीनला ग्लास प्रोटेक्शन देखील दिलं जाऊ शकतं. लीक्स नुसार जियोफोन 5जी चा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईल सह येईल. Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनमध्ये इंटरनल मेमरी कमी असेल परंतु यात एक्स्ट्रनल मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल आणि फोनमध्ये स्टोरेज वाढवता येईल.

जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो जो आपण याआधी जियोफोन नेक्स्ट lमध्ये दिसला आहे. या ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे ज्यात भारतीय भाषांचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: एकच नंबर! 10 हजारांच्या रेंजमध्ये 8GB RAM; 50MP कॅमेऱ्यासह स्वस्त मोबाइल OPPO A17 लाँच

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here