Foldable Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:52:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Find N2 Flip झाला भारतात लाँच; फोनमध्ये 32एमपीचा सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-oppo-find-n2-flip-launched-globally-know-specifications-and-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-oppo-find-n2-flip-launched-globally-know-specifications-and-price-in-india/#respond Wed, 15 Feb 2023 15:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17849 ओप्पोचा फोल्डेबल फोन OPPO Find N2 Flip आज भारतात लाँच झाला आहे. हटके डिजाईन असलेला हा मोबाइल फोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. याची फक्त स्टाईल शानदार नाही तर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील जबरदस्त आहेत. यात 16GB रॅम, मीडियाटेक डिमेन्सिटी 9000+ प्रोसेसर आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो. अ‍ॅडव्हान्स फीचर असलेल्या ओप्पो फाइंड एन2 फ्लिप स्मार्टफोनच्या किंमत व […]

The post OPPO Find N2 Flip झाला भारतात लाँच; फोनमध्ये 32एमपीचा सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Find N2 Flip चा घडी करून छोटा करता येतो.
  • या फोनमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आला आहे. एक आत आणि एक बाहेर.
  • हा छोटा स्मार्टफोन 16GB RAM आणि 5Gला सपोर्ट करतो.

ओप्पोचा फोल्डेबल फोन OPPO Find N2 Flip आज भारतात लाँच झाला आहे. हटके डिजाईन असलेला हा मोबाइल फोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. याची फक्त स्टाईल शानदार नाही तर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील जबरदस्त आहेत. यात 16GB रॅम, मीडियाटेक डिमेन्सिटी 9000+ प्रोसेसर आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो. अ‍ॅडव्हान्स फीचर असलेल्या ओप्पो फाइंड एन2 फ्लिप स्मार्टफोनच्या किंमत व सेलची संपूर्ण माहिती पुढे वाचता येईल.

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8″ 120Hz Display
  • 60Hz Secondary Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000+
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 44W 4,300mAh Battery

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यातील प्रायमरी डिस्प्ले 6.8 इंचाचा असून फुलएचडी+ 2520 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच फोन घडी केल्यानंतर एक छोटी स्क्रीन बाहेर दिसते ज्यात 720 × 382 पिक्सल रिजोल्यूशन मिळते. या दोन्ही डिस्प्लेमध्ये कंपनीनं अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला आहे जो शानदार आणि शार्प व्हिज्युअल क्वॉलिटी देतो.

OPPO Find N2 Flip च्या प्रायमरी स्क्रीनवर 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो तसेच सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्ज रिफ्रेश रेट व 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. मेन स्क्रीन वर 1600निट्स ब्राइटनेस, 403पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. तसेच बाहेरील स्क्रीन देखील 900निट्स ब्राइटनेस व 250पीपीआयला सपोर्ट करते. ओप्पोनं आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट केला आहे.

हा ओप्पो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्ससह येतो. यातील एक 7पी आणि दुसरी 5जी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोन लेटेस्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.0 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4एनएम मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा ओप्पो मोबाइल एआरएम माली-जी710 एमसी10 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 16जीबी पर्यंतचा रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या स्टोरेज देण्यात आली आहे जे LPDDR5 RAM आणि UFS3.1 ROM टेक्नॉलॉजीवर काम करतात.

दिसायला स्लीक आणि स्लीम असलेल्या स्मार्टफोनमध्ये ओप्पोनं शक्तिशाली बॅटरी दिली आहे. ओप्पो फाइंड एन2 फ्लिप 4,300एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 44W SUPERVOOC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा ओप्पो मोबाइल ओटीजी रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे दुसरे डिवायस देखील चार्ज करता येतात.

OPPO Find N2 Flip Price

ओपो फाइंड एन2 फ्लिप 5जी फोनचा सिंगल व्हेरिएंट बाजारात आला आहे, ज्यात 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची ग्लोबल प्राइस 849 यूरो आहे जी भारतीय कंरसी नुसार 75,000 रुपयांच्या असपास आहे. कंपनीनं OPPO Find N2 Flip चं प्रोडक्ट पेज ओपो इंडिया ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह केलं आहे त्यामुळे भारतीय किंमत येताच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. ।

The post OPPO Find N2 Flip झाला भारतात लाँच; फोनमध्ये 32एमपीचा सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-oppo-find-n2-flip-launched-globally-know-specifications-and-price-in-india/feed/ 0
Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/#respond Fri, 10 Jan 2020 12:45:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6253 सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या Galaxy S20 4G आणि Galaxy S20+ 4G स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे.

The post Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्यात कंपनी आपली नवीन टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट्स जगासमोर सादर करेल. सॅमसंगने आपल्या या ईवेंटला ‘Galaxy UNPACKED‘ असे नाव दिले आहे. कंपनीने अजुनपर्यंत सांगितले नाही कि या दिवशी कोणते Samsung डिवाईस सादर केले जातील पण चर्चा अशी आहे कि कंपनी 11 फेब्रुवारीला आपल्या ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार करेल त्याचबरोबर ब्रँडचा नेक्स्ट फोल्डेबल फोन पण टेक जगासमोर आणेल. आता लॉन्चच्या आधी समोर आले आहे कि Samsung च्या या नवीन फोल्डेबल फोनचे नाव असेल Galaxy Bloom.

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगने आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचे नाव सांगितले आहे आणि कंपनीचा हा नवीन डिवाईस Samsung Galaxy Bloom नावाने टेक मार्केट मध्ये येईल. साउथ कोरियन पब्लिकेशनने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि कन्ज्यूमर इलेक्ट्रॉकि शो (CES) 2020 मध्ये काल सॅमसंगने एक मीटिंग घेतली होती, ज्यात Samsung Electronics CEO DJ Koh यांच्यसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणि या मीटिंग मध्ये सॅमसंगच्या आगामी फोल्डेबल फोनचा स्लाईड शो दाखवत कंपनीने खुलासा केला आहे कि हा स्मार्टफोन Galaxy Bloom नावाने लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy Bloom

कंपनी द्वारा आयोजित मीटिंग मधून गॅलेक्सी ब्लूमचा एक फोटो पण लीक झाला आहे ज्यात फोन दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Galaxy Bloom मध्ये 13.3 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो आतल्या बाजूस फोल्ड होईल. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप पण दिसत आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर असतील अशी शक्यता आहे. फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि Samsung Galaxy Bloom फोल्ड केल्यानंतर याच्या डिस्प्लेचा वरचा भाग थोडा बाहेर राहील आणि कदाचित यावर टाईम व अन्य नोटिफिकेशन्स दिसतील. Galaxy Bloom बद्दल अजूनही काही ठोस बोलणे कठीण आहे, यासाठी Samsung च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

Galaxy UNPACKED 2020

सॅमसंग द्वारा 11 फेब्रुवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या ईवेंट बद्दल बोलायचे तर कंपनी या दिवसही आपल्या एस सीरीजचा स्मार्टफोन Galaxy S11 किंवा Galaxy S20 नावाने लॉन्च करू शकते. Galaxy Bloom बद्दल बोलले जात आहे कि सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर असेल. तसेच डिवाइस मध्ये फ्रंट कॅमेरा 10-मेगापिक्सलचा असेल. याव्यतिरिक्त माहिती समोर आली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या Galaxy S20 4G आणि Galaxy S20+ 4G स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. याचा अर्थ असा आहे कि भारतीय मार्केट मध्ये Galaxy S20 सीरीजचा 5G वर्जन येणार नाही.

The post Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/feed/ 0
समोर आला LG चा फोल्डेबल फोन, खेचून मोठा करता येईल डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/lg-patent-an-expanding-foldable-display-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/lg-patent-an-expanding-foldable-display-smartphone/#respond Mon, 18 Nov 2019 12:39:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5800 कंपनी या फोन मध्ये फोल्डेबल नाही तर एक्सपांडेबल डिस्प्लेचा वापर करेल

The post समोर आला LG चा फोल्डेबल फोन, खेचून मोठा करता येईल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या जगभरातील स्मार्टफोन कंपन्या आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आणि हुवावेच्या Mate X नंतर नुकताच मोटोरोलाने पण Moto Razr 2019 सह फोल्डेबल स्मार्टफोनच्या मार्केट मध्ये पाऊल टाकले होते. तसेच यावर्षीच्या सुरवातीला LG ने पण आपल्या फोल्डेबल फोन LG G8X ThinQ सादर केला होता. आता असे वाटत आहे कि एलजी आपला दुसरा फोल्डेबल फोन सादर करण्याचा विचार करत आहे.

एलजी आता अजून एक फोल्डेबल फोन सादर करून या सेगमेंटवर पकड मजबूत करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एक नवीन फोल्डिंग स्मार्टफोन कॉन्सेप्ट पेटेंट केला आहे. एलजी ने फाइल केलेला पेटेंट फाटा हा फोन आता पर्यंत समोर आलेल्या फोल्डिंग फोन पेक्षा खूप वेगळा असेल. कंपनी या फोन मध्ये फोल्डेबल नाही तर एक्सपांडेबल डिस्प्लेचा वापर करेल. याचा अर्थ असा कि या फोनचा डिस्प्ले तुम्ही खेचून वाढवू शकता.

फोन दिसायला अगदी सामान्य स्मार्टफोन प्रमाणे असेल. पण गरज पडल्यास यूजर याला खेचून याचा आकार वाढवू शकतात. यामुळे डिस्प्ले अजून रुंद होईल. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो स्मार्टफोनपेक्षा जास्त ई-रीडर सारखा वाटतो. सध्यातरी हा फक्त डेव्हलपमेंट मध्ये आहे. त्यामुळे जास्त बोलणे चुकीचे ठरेल.

आशा आहे कि आगामी काळात एलजीच्या फोल्डेबल फोन बद्दल अजून पण अनेक खुलासे होतील. तसेच या पेटेंट मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पेटेंट मध्ये फक्त फोनची डिजाइन दाखवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे याआधी शाओमी ओप्पो आणि ऍप्पलच्या फोल्डेबल फोनचे पेटेंट समोर आले आहेत. ज्यामुळे अपेक्षा वाढल्यात कि कंपन्या आता फोल्डेबल स्मार्टफोनच्या मार्केट मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि एलजीने वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशन (WIPO) मध्ये मार्च 2018 मध्ये एक स्मार्टफोन डिजाईन पेटेंट साठी अर्ज केला होता आणि 11 मे 2019 ला नोंदवण्यात आला होता. या नवीन डिजाइन मध्ये पेंटा कॅमेरा सेटअप बॅक मध्ये दिसला होता. रियर कॅमेरा सेटअप पैकी तीन वर्टीकल शेप आणि दोन हॉरिजोंटल शेप मध्ये एलईडी फ्लॅश सह होते.

पेटेंट वरून समोर आले होते कि फोन मध्ये स्लिम बेजल फ्रंटला असतील. तसेच या ईयरपीस वर डुअल सेल्फी कॅमेरा असेल. तसेच फोनच्या मागे फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो जो सध्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स मध्ये दिसत नाही.

The post समोर आला LG चा फोल्डेबल फोन, खेचून मोठा करता येईल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-patent-an-expanding-foldable-display-smartphone/feed/ 0
सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आला फोल्डेबल Moto Razr, लवकरच येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/moto-razr-2019-will-come-to-india/ https://www.91mobiles.com/marathi/moto-razr-2019-will-come-to-india/#respond Thu, 14 Nov 2019 12:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5775 मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि ट्विटर वर अपडेट केले होते कि हा स्मार्टफोन भारतात पण येईल.

The post सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आला फोल्डेबल Moto Razr, लवकरच येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवोच्या मालकीच्या कंपनी मोटोरोलाने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Moto Razr लॉन्च केला आहे. लॉन्चच्या आधी स्मार्टफोन संबंधित लीक्स गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. आता हा फोन ग्लोबली लॉन्च केला गेला आहे. तसेच कंपनीने याच्या भारत लॉन्चची माहिती पण दिली होती.

किंमत

Moto Razr कंपनीने प्रीमियम सेगमेंट मध्ये सादर केला आहे. हा फोन कंपनीने $1,500 (जवळपास 108,000 रुपये) मध्ये यूएस मध्ये लॉन्च केला आहे. भारतातील याच्या किंमतीची माहिती मिळाली नाही. पण ग्लोबल लॉन्चच्या आधी मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि ट्विटर वर अपडेट केले होते कि हा स्मार्टफोन भारतात पण येईल. मोटोरोला इंडियाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडल्स वर या स्मार्टफोनचा एक फोटो शेयर करण्यात आला होता, ज्यात अनफोल्डेड डिवाइसचा साइड व्यू आहे.

डिजाइनच्या बाबतीती हा बऱ्याचअंशी Moto Razr V3i सारखा असेल. यात जाडी चिन आणि एक हिंज मिळेल. डिजाइन बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या फोटो मध्ये डिवाइसचे वॉल्यूम बटण आणि पावर बटण याच्या वरच्या भागावर आहेत. फोन मध्ये एक फोल्डिंग डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

नवीन Moto Razr बंद केल्यावर 2.7-इंचाचा gOLED डिस्प्ले मिळेल, ज्यात 600×800 पिक्सल रेजोल्यूशन आणि 4:3 आस्पेक्ट रेश्यो आहे. तसेच फोन उघडल्यावर 6.2-इंचाचा फोल्डेबल pOLED डिस्प्ले मिळेल, ज्यात 2142×876 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 21:9 आहे.

मोटोरोला रेजर 2019 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये 2150 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

फोटोग्राफी साठी फोनच्या बाहेर 16-मेगापिक्सल प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे जो सेल्फी आणि वीडियो कॉलिंगच्या कमी येतो. Moto Razr मध्ये तुम्हाला 3.5-mm हेडफोन जॅक मिळणार नाही. यात ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट ऑडियो साठी आहे.

The post सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आला फोल्डेबल Moto Razr, लवकरच येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-razr-2019-will-come-to-india/feed/ 0
सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-foldable-smartphone-new-official-video-teaser/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-foldable-smartphone-new-official-video-teaser/#respond Thu, 28 Mar 2019 10:52:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3953 शाओमीचा फोल्डेबल फोन 74,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो.

The post सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वीच शाओमीच्या फोल्डेबल फोनचा लीक वीडियो समोर आला होता. हा वीडियो इतर कोणी नव्हे तर शाओमीचे को-फाउंडर लिन बिन यांनी आपल्या ऑफिशियल वीबो अकाउंट वर शेयर केला होता. या विडियो मध्ये शाओमीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला होता, ज्यावरून निश्चित झाले कि कंपनी आपला फोल्डेबल फोन सादर करण्यासाठी तयारी करत आहे. आता या डिवाइसचा अजून एक वीडिया लीक झाला आहे. हा वीडियो समोर आल्यानंतर बोलले जात आहे कि कंपनी लवकरच हा डिवाइस सादर करू शकते.

पण आधीप्रमाणे या वीडियो मध्ये पण फक्त फोनची सुपर फ्लेक्सिबल स्क्रीन दाखवण्यात आली आहे. आणि डिवाइस बद्दल कोणतीही माहिती शेयर करण्यात आलेली नाही. यावेळी पण 10 सेकंदांचा हा वीडियो कंपनी ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबो वर स्वतः शेयर केला आहे.

10 सेकंदांच्या या वीडियो मध्ये सर्वात आधी एक मोठा टॅबलेट दिसतो, त्यानंतर वीडियो मध्ये फोन दोन्ही बाजूंनी फोल्ड करताना दाखवण्यात आला आहे. दिसायला हा सॅमसंगच्या फोल्डेबल फोन सारखा वाटत आहे. पण शाओमीच्या या फोल्डेबल फोनची स्क्रीन उजवीकडून आणि डावीकडून घडी होऊन मागे करता येते. घडी केल्यानंतर हा फोन कॉम्पॅक्ट दिसतो.

हे दिखील वाचा: चार रियर कॅमेरा आणि कोणत्याही बटण विना येईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 10

डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स
काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि शाओमी ने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि हा लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच एक बातमी अजून आली होती ज्यामुळे यूजर्सची एक्साइटमेंट वाढली होती ती अशी होती कि शाओमीचा फोल्डेबल फोन 74,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी फोल्डची किंमत जवळपास 1,40,000 रुपये आहे. तर एमडब्लूसी 2019 मध्ये सादर झालेल्या हुआवईच्या फोल्डेबल फोन मेट एक्स ची किंमत भारतात 1,85,000 रुपये असू शकते.

शाओमीच्या फोल्डेबल फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण बोलले जात आहे कि कंपनी यात स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट देऊ शकते. फोनचा डिस्प्ले विजनॉक्सने बनवला आहे.

हे दिखील वाचा: सॅमसंगला मागे टाकण्यासाठी आले हुआवई पी30 आणि पी30 प्रो, चार सेंसर सह प्रोफोशनल कॅमेऱ्या प्रमाणे क्लिक करता येतील फोटो

याआधीच्या एका पोस्ट मध्ये बिन यांनी लिहिले होते कि शाओमीचा डबल फोल्डिंग मोबाईल फोन येत आहे. बिन यांच्यानुसार हा जगातील पहिला दोन्ही बाजूंना घडी होणारा मोबाईल फोन असला पाहिजे. ते म्हणाले कि हा अजूनतरी एक इंजीनियरिंग मशीन आहे, जी सर्वांना बघता यावी म्हणून पाठवण्यात येत आहे. तसेच त्यांनी या वीडियो वर प्रतिक्रिया देण्यास सांगितले होते. ते म्हणले कि जर तुम्हाला हा आवडला तर आम्ही हा भविष्यात सादर करण्याचा विचार करू.

सोर्स

The post सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-foldable-smartphone-new-official-video-teaser/feed/ 0
सॅमसंग ने दाखवला आपला फोल्डेबल फोन, वीडियो केला जारी! बघा कशाप्रकारे चालेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-official-video-teaser-specifications-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-official-video-teaser-specifications-in-hindi/#respond Fri, 01 Feb 2019 17:48:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3522 किंमत भारतीय करंसी अनुसार 1 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल

The post सॅमसंग ने दाखवला आपला फोल्डेबल फोन, वीडियो केला जारी! बघा कशाप्रकारे चालेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये एक ईवेंट आयोजित करत आहे. बातमी अशी आहे कि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 लाइट आणि गॅलेक्सी एस10 प्लस सोबतच सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पण टेक मंचावर येईल. सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनचे अनेक लीक्स आलेले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आज सॅमसंगने एक ऑफिशियल वीडियो शेयर केला आहे ज्यात कंपनीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे.

सॅमसंगने एक ​वीडियो शेअर केला आहे ज्यात हा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. सॅमसंग ने हा वीडियो आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यासाठी सादर केला आहे ज्यात फोल्डेबल फोन सोबत कंपनीचे इतर डिवाईस पण आहेत. सॅमसंगचा हा वीडियो 1 मिनिटाचा आहे ज्यात दोन ठिकाणी फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. कंपनी ने हा ऑफिशियली सादर केला नाही किंवा फोल्डेबल फोनचे नाव पण सांगितलेले नाही.

सॅमसंगच्या वीडियो मध्ये फोल्डेबल फोन एका तरुणीच्या हातात दाखवण्यात आला आहे. तरुणी हा फोन पुस्तकाप्रमाणे उघडते. पुस्तकाच्या कवर प्रमाणे या फोल्डेबल फोनचा कवर मोबाईलच्या डिस्प्ले सारखा दिसला आहे ज्यावर शार्टकट मेनू आहे. हा कवर फोल्डेबल फोनची मुख्य स्क्रीन म्हणता येईल. या मेन डिस्प्ले वर बेजल लेस ​स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले वर कोणताही कॅमेरा सेंसर किंवा नॉच दिसत नाही. डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.

या वीडियो मध्ये फोन उघडल्यानंतर आतून प्रकाश आला आहे जो फोनचा सेकेंडरी डिस्प्ले असू शकतो. याच सेकेंडरी डिस्प्लेच्या उजवीकडे फुलव्यू स्क्रीन दिसत आहे तथा तिथेही कोणतीही नॉच किंवा कॅमेरा सेंसर देण्यात आलेला नाही. वीडियो बघून वाटले कि सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन उघल्यावर डावीकडील पॅनल जास्त पातळ आहे तर उजवीकडील पॅनलची जाडी थोडी जास्त आहे.

या फोल्डेबल फोनच्या बॅक पॅनल वर डिस्प्ले असेल कि नाही हे या वीडियो मध्ये स्पष्ट झाले नाही. या पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यामुळे सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये सेल्फी कशी घेता येईल हे स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग आपला फोल्डेबल फोन 7.3-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करू शकते जो घडी झाल्यानंतर 4-इंचाच्या सेकेंडरी डिस्प्ले मध्ये रूपांतरित होईल.

सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये 512जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच हा फोन क्वालकॉमच्या आगामी सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालेल. विशेष म्हणजे एक विदेशी मीडिया रिपोर्ट नुसार सॅमसंग आपला फोल्डेबल फोन 2 मिलियन वॉन मध्ये लॉन्च करेल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 1 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल. सध्यातरी सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनसाठी 20 फेब्रुवारीच्या वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग ने दाखवला आपला फोल्डेबल फोन, वीडियो केला जारी! बघा कशाप्रकारे चालेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-official-video-teaser-specifications-in-hindi/feed/ 0
एक नव्हे तर तीन बाजूला घडी होईल सॅमसंगचा अपकमिंग फोल्डेबल फोन, नवीन पेटेंट झाला फाइल https://www.91mobiles.com/marathi/samsung-patents-a-three-way-foldable-device-which-unfolds-into-a-tablet-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-patents-a-three-way-foldable-device-which-unfolds-into-a-tablet-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 13:00:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3506 मागील बाजू पण पेटेंट मध्ये स्पष्ट दिसत नाही.

The post एक नव्हे तर तीन बाजूला घडी होईल सॅमसंगचा अपकमिंग फोल्डेबल फोन, नवीन पेटेंट झाला फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग आपल्या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनमुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच रिपोर्ट आला होता कि कंपनी आपला फोल्डेबल फोन 5जी वेरिएंट मध्ये आणेल. पुढील महिन्यात म्हणजे 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड 2019 इवेंट मध्ये गॅलेक्सी ए10 सीरीज सोबत कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनची झलक दिसू शकते. तसेच आता कंपनी अजून एक फोल्डेबल फोनचे पेटेंट वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशनच्या वेबसाइट वर दिसले आहे.

सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल स्क्रीन पेटेंटला सॅमसंग डिस्प्ले सब्सिडरी ने 2017 डिसेंबर मध्ये फाइल केले होते आणि याला 29 जानेवारी 2019 ला मंजूरी मिळाली. स्केच मध्ये दिसत आहे कि डिवाइस एका सिंगल स्क्रीन सह येईल, जो एक किंवा दोन बाजूनी घडी होणार नाही तर तीन बाजूने घडी करता येईल. नव्या पेटेंटची खासियत म्हणजे यात देण्यात आलेला डी-पॅड आणि सहा फिजिकल होम बटण वर्टिकल स्ट्रिप मध्ये राइट साइडला आहेत.

स्केच नुसार फोल्डेबल मोड मध्ये डी-पॅड आणि इतर बटण गेमिंग मध्ये वापरता येतील. तसेच फिजिकल होम बटण उजविकडे दाखवण्यात आला आहे. तसेच पेटेंट मध्ये दुसरं कोणताही सेंसर दिसत नाही. तसेच मागील बाजू पण पेटेंट मध्ये स्पष्ट दिसत नाही.

सॅमसंग ने आपला फोल्डेबल फोन सर्वात आधी गेल्यावर्षी आयोजित डिवेलपर्स कॉन्फ्रेंस मध्ये सादर केला होता. बोलले जात आहे कि सॅमसंग आपले फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी एफ सीरीज नावाने लॉन्च करू शकते.

हा फोन लॉन्च होण्यास अजून वेळ आहे, पण या संबंधित माहिती आणि लीक्सनुसार गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये 4,400 mAh ची बॅटरी देण्यात येईल. ऑल अबाउट सॅमसंग वेबसाइट नुसार सॅमसंग च्या या अपकमिंग फोल्डेबल फोन मध्ये 2,200एमएएच च्या दोन बॅटऱ्या असतील.

The post एक नव्हे तर तीन बाजूला घडी होईल सॅमसंगचा अपकमिंग फोल्डेबल फोन, नवीन पेटेंट झाला फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-patents-a-three-way-foldable-device-which-unfolds-into-a-tablet-in-marathi/feed/ 0
सॅमसंगला उत्तर देण्यास तयार आहे शाओमी, बनवत आहे डायरी प्रमाणे घडी होणारा फोल्डेबल फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-making-foldable-phone-video-share-by-co-founder-lin-bin-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-making-foldable-phone-video-share-by-co-founder-lin-bin-in-marathi/#respond Wed, 23 Jan 2019 08:08:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3439 हा वीडियो 51 सेकंदाचा आहे, ज्यात डिवाइस घडी होताना दाखवण्यात आला आहे.

The post सॅमसंगला उत्तर देण्यास तयार आहे शाओमी, बनवत आहे डायरी प्रमाणे घडी होणारा फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच शाओमीच्या फोल्डेबल फोनचा एक लीक वीडियो समोर आला होता. आता अजून एक नवा विडियो समोर आला आहे. हा वीडयो इतर कोणी नव्हे तर शाओमीचे को-फाउंडर लिन बिन यांनी आपल्या ऑफिशियल वीबो अकाउंट वर शेयर केला आहे. या विडियो मध्ये शाओमीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. वीडियो मध्ये फक्त फंक्शनल सुपर फ्लेक्सिबल स्क्रीन दाखवण्यात आली आहे. पण डिवाइस बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

या पोस्ट मध्ये बिन यांनी म्हटले आहे कि शाओमीचा डबल फोल्डिंग मोबाईल फोन येत आहे. बिन यांच्यानुसार हा जगातील पहिला दोन्ही बाजूंना घडी होणारा मोबाईल फोन असावा. ते म्हणाले हि अजूनही एक इंजीनियरिंग मशीन आहे, जी सर्वांनी पाहावी म्हणून पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांनी या वीडियो वर आपले मत व्यक्त करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले जर तुम्हाला हा आवडला तर आम्ही भविष्यात हा सादर करण्याचा विचार करू.

तसेच बिन म्हणाले आम्ही या इंजीनियरिंग मशीनला नाव देऊ इच्छिते, तुम्हाला काय आवडेल? मी तुम्हाला दोन पर्याय देत आहे: शाओमी डुअल फ्लेक्स आणि शाओमी मिक्स फ्लेक्स. हा वीडियो 51 सेकंदाचा आहे, ज्यात डिवाइस घडी होताना दाखवण्यात आला आहे.

51 सेकंदाच्या या विडियो मध्ये सर्वात आधी एक मोठा टॅबलेट दिसतो, त्यांनतर बिन याला घडी करून फोन मध्ये रूपांतरित करतात. दिसायला हा सॅमसंगच्या फोल्डेबल फोन प्रमाणे दिसतो. पण शाओमीच्या या फोल्डेबल फोनची स्क्रीन उजव्या आणि डाव्या बाजूने घडी करता येते. घडी केल्यानंतर हा फोन कॉम्पॅक्ट दिसतो.

विशेष म्हणजे याआधी ट्विटर वर इवन ब्लास नावाच्या टिप्सटर ने एक वीडियो शेयर केला होता, ज्यात शाओमीची कथित फुली फंक्शनल सुपर फ्लेक्सिबल स्क्रीन दाखवण्यात आली होती. तेव्हा याची सत्यता पडताळण्यात आली नव्हती. विडियो मध्ये एका मॅपिंग ऍपचे वर्जन दाखवण्यात आले होते.

The post सॅमसंगला उत्तर देण्यास तयार आहे शाओमी, बनवत आहे डायरी प्रमाणे घडी होणारा फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-making-foldable-phone-video-share-by-co-founder-lin-bin-in-marathi/feed/ 0
सॅमसंगला मागे टाकण्यासाठी शाओमी आणत आहे फोल्डेबल फोन, लॉन्चच्या आधी वीडियो झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-might-be-making-a-foldable-tablet-device-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-might-be-making-a-foldable-tablet-device-in-marathi/#respond Fri, 04 Jan 2019 11:25:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3294 वीडियो मध्ये जो डिवाइस आहे तो पूर्णपणे घडी होताना दिसत आहे

The post सॅमसंगला मागे टाकण्यासाठी शाओमी आणत आहे फोल्डेबल फोन, लॉन्चच्या आधी वीडियो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आतापर्यंत अनेक बाबतीती टेक विश्वातील दिग्गजांना टक्कर देत आली आहे. यावेळी कंपनीचे प्लानिंग एक पाऊल पुढे जात फोल्डेबल फोन लॉन्च करण्याचे आहे. शाओमीच्या आगामी फोल्डेबल फोनचा एक वीडियो ट्विटर वर आला आहे. या वीडियो मध्ये टॅबलेट सहज घडी होताना दाखवण्यात आला आहे. याची माहिती प्रसिद्ध लीकस्टर इवन ब्लास ने आपल्या ट्विटर हॅण्डल वर दिली आहे.

इवन ब्लास ने ट्विटर वर एक 20 सेकंदाचा वीडियो शेअर केला आहे. या वीडियो मध्ये जो डिवाइस आहे तो पूर्णपणे घडी होताना दिसत आहे. ट्विट मध्ये इवन ने म्हटले आहे कि “या वीडियो किंवा डिवाइसच्या प्रामाणिकपणावर मी काहीच बोलू शकत नाही, पण हा शाओमी ने बनवलेला कथित स्मार्टफोन आहे. हा एक नवीन फोन आहे कि फेक आहे?”

शाओमीच्या आधी सॅमसंग, ओपो, एलजी व हुआवई ची पण बातमी समोर आली आहे कि या कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन वर काम करत आहेत. सॅमसंग बद्दल बोलले जात आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात सीईएस 2019 ईवेंट मध्ये आपला फोल्डेबल फोन अधिकृतपणे सादर करेल. पण या सर्व कंपन्यांचे फोन एकाच बाजूने उघडतील तसेच बंद होतील. तर ऍप्पलच्या पेटेंट मध्ये खुलासा झाला होता कि त्यांचा फोन इतका ऍडव्हान्स असेल जो दोन्ही बाजूने घडी करता येईल.

ऍप्पल ने दोन्ही बाजूने वाकणाऱ्या फोन साठी एक पेटेंट नोंदवले होते. ऍप्पल द्वारा फाइल केल्या गेलेल्या या पेटेंट मध्ये अश्या टेक्नॉलॉजीचा समावेश आहे जी फोल्डेबल फोन बनवेल. ऍप्पलची टेक्नॉलॉजी इतरांपेक्षा वेगळी असण्याचे कारण म्हणजे पेटेंट अनुसार कंपनीचा आईफोन एखादया कागदाप्रमाणे दोन्ही बाजूने घडी करता येईल.

The post सॅमसंगला मागे टाकण्यासाठी शाओमी आणत आहे फोल्डेबल फोन, लॉन्चच्या आधी वीडियो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-might-be-making-a-foldable-tablet-device-in-marathi/feed/ 0
सॅमसंग नंतर आता ओपो बनवत आहे फोल्डेबल फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-5g-foldable-phone-to-be-launched-in-mwc-2019-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-5g-foldable-phone-to-be-launched-in-mwc-2019-in-marathi/#respond Fri, 30 Nov 2018 08:26:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3032 कपनी ने रोटेटिंग कॅमेरा आणि पॉप आॅप कॅमेरा दाखवला होता. तसेच आता कंपनी फोल्डेबल फोन सेग्मेंट मध्ये पण येणार आहे.

The post सॅमसंग नंतर आता ओपो बनवत आहे फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी स्मार्टफोन मध्ये नॉच स्क्रीनचा खूप बोलबाला होता. मोठ्या नॉच पासून सुरु झालेल्या हा प्रवास आज एका डॉट वर आला आहे. तर आता असे वाटत आहे कि आगामी वर्षात फोल्डेबल स्मार्टफोनची चर्चा असेल. गेल्या महिन्यात सॅमसंग ने आपल्या फोल्डेबल फोनचे प्रदर्शन केले होते. तर जेडटीई ने याबद्दल आधीच घोषणा केली आहे. आता बातमी अशी आहे कि चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी ओपो आपला फोल्डेबल फोन लॉन्च करणार आहे. कंपनी या फोनचे प्रदर्शन पुढच्यावर्षी होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस 2019 मध्ये करू शकते.

ओपोच्या फोल्डेबल फोनची माहिती कोणत्याही लीक मधून आली नसून कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजर चुक वॉन्ग ने सांगितली आहे. त्यांनी सांगितले आहे कि पुढल्या वर्षी हा फोन सादर केला जाऊ शकतो आहे. वॉन्ग ने फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी ओपो ने फोल्डेबल फोन साठी पेटेंट सादर केले होते.

याआधी कंपनी ने अशी पण माहिती दिली होती कि आगामी वर्षात ओपोचा 5जी फोन तुमच्या समोर येऊ शकतो. पण कंपनीचे 5जी फोन मास प्रोडक्शन मध्ये 2020 पर्यंत जातील आणि तेव्हा फोल्डेबल फोन पण सेल साठी येऊ शकतो. हि बातमी सर्वात आधी ट्विकर्स डॉट नेट ने प्रकोशित केली आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत ओपो कडून अनेक नवीन इनोवेशन दिसत आहेत. कपनी ने रोटेटिंग कॅमेरा आणि पॉप आॅप कॅमेरा दाखवला होता. तसेच आता कंपनी फोल्डेबल फोन सेग्मेंट मध्ये पण येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी ओपो ने आर17 प्रो मॉडेल चीन मध्ये सादर केला होता. डिसेंबर 4 ला हा फोन भारतात येणार आहे. तीन कॅमेरा असलेल्या या फोन मध्ये इनडिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या आॅपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

The post सॅमसंग नंतर आता ओपो बनवत आहे फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-5g-foldable-phone-to-be-launched-in-mwc-2019-in-marathi/feed/ 0