सॅमसंगला उत्तर देण्यास तयार आहे शाओमी, बनवत आहे डायरी प्रमाणे घडी होणारा फोल्डेबल फोन

अलीकडेच शाओमीच्या फोल्डेबल फोनचा एक लीक वीडियो समोर आला होता. आता अजून एक नवा विडियो समोर आला आहे. हा वीडयो इतर कोणी नव्हे तर शाओमीचे को-फाउंडर लिन बिन यांनी आपल्या ऑफिशियल वीबो अकाउंट वर शेयर केला आहे. या विडियो मध्ये शाओमीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. वीडियो मध्ये फक्त फंक्शनल सुपर फ्लेक्सिबल स्क्रीन दाखवण्यात आली आहे. पण डिवाइस बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

या पोस्ट मध्ये बिन यांनी म्हटले आहे कि शाओमीचा डबल फोल्डिंग मोबाईल फोन येत आहे. बिन यांच्यानुसार हा जगातील पहिला दोन्ही बाजूंना घडी होणारा मोबाईल फोन असावा. ते म्हणाले हि अजूनही एक इंजीनियरिंग मशीन आहे, जी सर्वांनी पाहावी म्हणून पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांनी या वीडियो वर आपले मत व्यक्त करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले जर तुम्हाला हा आवडला तर आम्ही भविष्यात हा सादर करण्याचा विचार करू.

तसेच बिन म्हणाले आम्ही या इंजीनियरिंग मशीनला नाव देऊ इच्छिते, तुम्हाला काय आवडेल? मी तुम्हाला दोन पर्याय देत आहे: शाओमी डुअल फ्लेक्स आणि शाओमी मिक्स फ्लेक्स. हा वीडियो 51 सेकंदाचा आहे, ज्यात डिवाइस घडी होताना दाखवण्यात आला आहे.

51 सेकंदाच्या या विडियो मध्ये सर्वात आधी एक मोठा टॅबलेट दिसतो, त्यांनतर बिन याला घडी करून फोन मध्ये रूपांतरित करतात. दिसायला हा सॅमसंगच्या फोल्डेबल फोन प्रमाणे दिसतो. पण शाओमीच्या या फोल्डेबल फोनची स्क्रीन उजव्या आणि डाव्या बाजूने घडी करता येते. घडी केल्यानंतर हा फोन कॉम्पॅक्ट दिसतो.

विशेष म्हणजे याआधी ट्विटर वर इवन ब्लास नावाच्या टिप्सटर ने एक वीडियो शेयर केला होता, ज्यात शाओमीची कथित फुली फंक्शनल सुपर फ्लेक्सिबल स्क्रीन दाखवण्यात आली होती. तेव्हा याची सत्यता पडताळण्यात आली नव्हती. विडियो मध्ये एका मॅपिंग ऍपचे वर्जन दाखवण्यात आले होते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here