सॅमसंग 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये एक ईवेंट आयोजित करत आहे. बातमी अशी आहे कि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 लाइट आणि गॅलेक्सी एस10 प्लस सोबतच सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पण टेक मंचावर येईल. सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनचे अनेक लीक्स आलेले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आज सॅमसंगने एक ऑफिशियल वीडियो शेयर केला आहे ज्यात कंपनीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे.
सॅमसंगने एक वीडियो शेअर केला आहे ज्यात हा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. सॅमसंग ने हा वीडियो आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यासाठी सादर केला आहे ज्यात फोल्डेबल फोन सोबत कंपनीचे इतर डिवाईस पण आहेत. सॅमसंगचा हा वीडियो 1 मिनिटाचा आहे ज्यात दोन ठिकाणी फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. कंपनी ने हा ऑफिशियली सादर केला नाही किंवा फोल्डेबल फोनचे नाव पण सांगितलेले नाही.
सॅमसंगच्या वीडियो मध्ये फोल्डेबल फोन एका तरुणीच्या हातात दाखवण्यात आला आहे. तरुणी हा फोन पुस्तकाप्रमाणे उघडते. पुस्तकाच्या कवर प्रमाणे या फोल्डेबल फोनचा कवर मोबाईलच्या डिस्प्ले सारखा दिसला आहे ज्यावर शार्टकट मेनू आहे. हा कवर फोल्डेबल फोनची मुख्य स्क्रीन म्हणता येईल. या मेन डिस्प्ले वर बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले वर कोणताही कॅमेरा सेंसर किंवा नॉच दिसत नाही. डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.
या वीडियो मध्ये फोन उघडल्यानंतर आतून प्रकाश आला आहे जो फोनचा सेकेंडरी डिस्प्ले असू शकतो. याच सेकेंडरी डिस्प्लेच्या उजवीकडे फुलव्यू स्क्रीन दिसत आहे तथा तिथेही कोणतीही नॉच किंवा कॅमेरा सेंसर देण्यात आलेला नाही. वीडियो बघून वाटले कि सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन उघल्यावर डावीकडील पॅनल जास्त पातळ आहे तर उजवीकडील पॅनलची जाडी थोडी जास्त आहे.
या फोल्डेबल फोनच्या बॅक पॅनल वर डिस्प्ले असेल कि नाही हे या वीडियो मध्ये स्पष्ट झाले नाही. या पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यामुळे सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये सेल्फी कशी घेता येईल हे स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग आपला फोल्डेबल फोन 7.3-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करू शकते जो घडी झाल्यानंतर 4-इंचाच्या सेकेंडरी डिस्प्ले मध्ये रूपांतरित होईल.
सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये 512जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच हा फोन क्वालकॉमच्या आगामी सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालेल. विशेष म्हणजे एक विदेशी मीडिया रिपोर्ट नुसार सॅमसंग आपला फोल्डेबल फोन 2 मिलियन वॉन मध्ये लॉन्च करेल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 1 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल. सध्यातरी सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनसाठी 20 फेब्रुवारीच्या वाट बघितली जात आहे.















