Google Pixel 3 XL - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 Jul 2019 03:56:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google Pixel 3 XL वर मिळत आहे 28,000 रुपयांची सूट, अशाप्रकारे घेता येईल या डीलचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-gets-massive-rs-28000-price-cut-in-india-offer-is-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-gets-massive-rs-28000-price-cut-in-india-offer-is-on-flipkart/#respond Mon, 27 May 2019 10:35:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4412 प्रोडक्ट एक्सचेंज वर पण 21,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

The post Google Pixel 3 XL वर मिळत आहे 28,000 रुपयांची सूट, अशाप्रकारे घेता येईल या डीलचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही एक फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकॉर्ट वर गेल्यावर्षी लॉन्च झालेला Google Pixel 3XL भरपूर डिस्काउंट सह विकत घेता येईल. कंपनी हँडसेट वर 28,000 रुपयांचा बंपर डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट नंतर हा फोन 54,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा डिस्काउंट स्टॉक संपेपर्यंत असेल.

अशी असेल डिस्काउंट नंतर किंमत
स्मार्टफोनच्या 4जीबी/64जीबी वेरिएंटची खरी किंमत 82,999 रुपये आहे. पण, डिस्काउंट नंतर फोनची किंमत 54,999 रुपये आहे. तर 4जीबी/128जीबी वेरिएंटची खरी किंमत 91,999 रुपये आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 65,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच प्रोडक्ट एक्सचेंज वर पण 21,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

स्पेसिफिकेशन्स
गूगल Pixel 3XL स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात जास्तीत जास्त फीचर पिक्सल 3 स्मार्टफोन सारखे आहेत. दोन्ही फोन मध्ये साइज आणि बॅटरीचा मोठा फरक आहे. Pixel 3 XL मध्ये 6.3-इंचाचा QHD+ (2960×1440 पिक्सल्स) फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:5:9 आहे. या फोन सोबत कंपनीने पिक्लस 3 स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. गूगल पिक्सल 3 अँन्ड्रॉईडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9.0 Pie वर चालतो. कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यानंतर हा 7 तास 15 मिनिटे चालेल. भारतात हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता.

गूगल यावर्षी आपल्या पिक्सल सीरीजचे फोर्थ जनरेशन हँडसेट लॉन्च करेल. पिक्सल सीरीज मध्ये यावर्षी कंपनी Pixel 4 आणि Pixel 4XL सादर करू शकते. याआधी Pixel 4 चा एक फोटो लीक झाला होता, ज्यावरून फोनच्या डिजाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. माहितीनुसार गूगल पिक्सल 4 मध्ये फ्रंटला पण डुअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये पंचहोल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

पंचहोल डिस्प्ले आतापर्यंत हॉनर आणि सॅमसंगच्या फोन मध्ये दिसला आहे. लीक इमेज मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. अशाआहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फोन फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. याआधी हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. गीकबेंच वर गूगल पिक्सल 4 ने सिंगल कोर टेस्ट मध्ये 744 आणि मल्टिकोर टेस्ट मध्ये 3201 प्वाइंट्स स्कोर मिळवला होता.

The post Google Pixel 3 XL वर मिळत आहे 28,000 रुपयांची सूट, अशाप्रकारे घेता येईल या डीलचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-gets-massive-rs-28000-price-cut-in-india-offer-is-on-flipkart/feed/ 0
गूगल ने लॉन्च केली पिक्सल स्लेट, ऍप्पल आयपॅड आणि सॅमसंग टॅबला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-slate-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-slate-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 10 Oct 2018 12:37:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2437 पिक्सल स्लेटचे तिन्ही रॅम वेरिएंट्स 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल मेमरी सह वेगवेगळ्या बाजारात लॉन्च केले जातील.

The post गूगल ने लॉन्च केली पिक्सल स्लेट, ऍप्पल आयपॅड आणि सॅमसंग टॅबला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दीर्घप्रतिक्षेनंतर गूगल ने काल आपल्या पिक्सल सिरीज मध्ये दोन नवीन फोन पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन गूगल ने सादर केलेले आता पर्यंतचे सर्वात पावरफुल स्मार्टफोन आहेत. या फोन्स सोबत गूगल ने फॅन्सना सरप्राइज देत अजून एक शानदार डिवाईस ‘पिक्सल स्लेट’ पण सादर केला आहे. पिक्सल स्लेट एक टॅबलेट डिवाईस आहे जो थेट सॅमसंगच्या गॅलॅक्सी टॅब तसेच ऍप्पलच्या आयपॅड प्रो ला टक्कर देतो. पिक्सल स्लेट जगातील पहिला असा टॅबलेट आहे जो क्रोम आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो.

गूगल पिक्सल स्लेटचे स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनी ने यात 3,000 X 2,000 पिक्सल रेज्ल्यूशन वॉल 12.3-इंचाचा मोठा एलटीपीएस डिस्प्ले दिला आहे. या टॅबलेटची खासियत म्हणजे हा कोणत्याही की-बोर्ड सोबत अटॅच केला जाऊ शकतो. हा टॅबलेट तीन रॅम वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात 4जीबी, 8जीबी आणि 16जीबी चे आॅप्शन्स आहेत. पिक्सल स्लेट चे हे तिन्ही वेरिएंट 8 जेनरेशन कोर आई एम3, कोर आई5 आणि कोर आई7 सह सिलेरियॉन प्रोसेसर वर चालतील.

p

पिक्सल स्लेटचे तिन्ही रॅम वेरिएंट्स 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल मेमरी सह वेगवेगळ्या बाजारात लॉन्च केले जातील. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल तथा फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. पिक्सल स्मार्टफोन प्रमाणे पिक्सल स्लेट चा कॅमेरा पण पोर्टरेट मोड सह शानदार फोटो क्लिक करू शकतो.

गूगल पिक्सल स्लेट वाईफाई व एटीई सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे. या स्लेट मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटन पण देण्यात आले आहे. सॅमसंग एस पेन प्रमाणे गूगल ने पण पिक्सल स्लेट सोबत ‘डिजीटल पेन’ दिला आहे. पिक्सल स्लेट मध्ये डुअल स्पीकर्स आहे जो वीडियो बघताना चांगला साऊंड इफेक्ट देतो. पिक्सल स्लेट च्या पावर बटन वर कंपनी ने फिंगरप्रिंट सेंसर पण दिला आहे.

किंमत पाहता पिक्सल स्लेट टॅबलेट चा सिलेरियॉन प्रोसेसर वर चालणार 4जीबी/32जीबी वेरिएंट 599 डॉलर (जवळपास 44,300 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच याचा 8जीबी/64जीबी वेरिएंट 699 डॉलर (जवळपास 51,800 रुपये) मध्ये आला आहे. त्याचप्रमाणे कोर एम3 वर चालणार 8जीबी/64जीबी वेरिएंट 799 डॉलर (जवळपास 59,900 रुपये), कोर आई5 वर चालणार 8जीबी/128जीबी वेरिएंट 999 डॉलर (जवळपास 74,000 रुपये) तसेच कोर आई7 वर चालणार 16जीबी/256जीबी वेरिएंट 1599 डॉलर (जवळपास 1,18,600 रुपये) मध्ये गूगल ने लॉन्च केला आहे.

The post गूगल ने लॉन्च केली पिक्सल स्लेट, ऍप्पल आयपॅड आणि सॅमसंग टॅबला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-slate-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
मोठी स्क्रीन, दमदार प्रोसेसर आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-and-pixel-3-xl-launched-price-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-and-pixel-3-xl-launched-price-specifications-and-features-in-marathi/#respond Wed, 10 Oct 2018 06:59:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2424 गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल भारतात 11 ऑक्टोबर पासून प्री आॅर्डर साठी उपलब्ध होतील. तसेच या फोन्सची विक्री 1 नोव्हेंबर पासून सुरू होईल.

The post मोठी स्क्रीन, दमदार प्रोसेसर आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सर्वात आधी सॅमसंग ने आपला गॅलेक्सी नोट 9 सादर केला होता त्यानंतर जगातील प्रमुख अॅप्पल ने गेल्या महिन्यात आयफोन 10एस, आयफोन 10एस मॅक्स आणि आयफोन 10आर लॉन्च केले. आता वेळ होती इंटरनेटच्या राजाची आणि जगातील नंबर एक मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयडच्या मालक गूगल ची. लोक पिक्सल फोनची आतुरतेने वाट बघत होते आणि आज कंपनी ने आपली फोन सीरीज सादर केली. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण कंपनी ने दोन मॉडेल सादर केले आहेत. गूगल ने पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल लॉन्च केले आहेत. मोठा डिस्प्ले, नवीन ओएस आणि दमदार प्रोसेसर सह या फोन मध्ये अनेक खास फीचर्स आहेत. खाली आम्ही गूगल पिक्सल 3 आणि गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फीचर्स बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डिस्प्ले
गूगल पिक्सल 3 मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.5-इंचाचा फुलएचडी+ एचडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. तसेच पिक्सल 3एक्सएल 18.5:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात 2960 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा क्यूएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले च्या प्रोटेक्शन साठी हा पण कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी साठी पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12.2-मेगापिक्सलचा डुअल पिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा आॅप्टिकल आणि इलेक्ट्रानिक ईमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलजीला सपोर्ट करतो. सेल्फी साठी गूगल चे नवीन फोन थोडे खास आहेत. फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. एक कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सल सह एफ/2.2 अपर्चर ला सपोर्ट करतो तर दुसरा सेंसर एफ/1.8 अपर्चर वाला आहे. फोनचा कॅमेरा एचडीआर+ ला सपोर्ट करतो. तसेच कंपनीचा दावा आहे की हा मानवी डोळ्या प्रमाणे सर्व गोष्टी बघू शकतो. या सोबत एआई इंटीग्रेशन पण मिळेल.

रॅम व स्टोरेज
प्रोसेसर च्या बाबतीत हा फोन खुप अपग्रेड झाला आहे पण रॅम आणि रोम मध्ये जास्त फरक दिसत नाही. गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे तर स्टोरेज साठी तुम्हाला 64जीबी आणि 128 जीबी इंटरनल मेमरी मिळेल. तुम्हाला तर माहितीच आहे की गूगल फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट नसतो आणि हे फोन पण तसेच आहेत.

प्रोसेसर
गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल दोन्ही फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट वर चालतात. कंपनी ने हे स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह सादर केले आहेत आणि यात 10 नॅनो मीटर वाला आॅक्टाकोर (4×2.5 गीगाहट्र्ज कोरयो 385 गोल्ड आणि 4×1.6 गीगाहट्र्ज कोरयो 385 सिल्वर) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रीनो 630 जीपीयू देण्यात आला आहे.

आॅपरेटिंग सिस्टम

गूगल चे फोन नेहमीच एंडरॉयड च्या सर्वात नवीन आॅपरेटिंग सिस्टम वर चालतात आणि हे फोन पण लेटेस्ट एंडरॉयड वर चालतात. दोन्ही फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आहेत आणि यात तुम्हाला अडॅप्टिव बॅटरी, अडॅप्टिव ब्राइटनेस अॅप अॅक्शन आणि टेक्स्ट क्लासिफायर सारखे आॅप्शन मिळतील. अडॅप्टिव बॅटरी फीचर्स सेंस करून स्वतःहून अॅप्स बंद करेल जे विनाकारण बॅटरी वापरत आहेत. तसेच अडॅप्टिव ब्राइटनेस जसा प्रकाश असेल तसा तुमचा डिस्प्ले एडजस्ट करेल. एंडरॉयड 9 पाई मध्ये मशीन लर्निंग आधारित फीचर्स आहेत जे चांगला यूजर एक्सपीरियंस देतात. वेळ आणि गरज पाहून स्वतःहून अॅप्स फोन वर हाईलाइट केले जातील. त्याचबरोबर टास्क क्विकर आणि डिसप्ले कट आउट सारखे इतर आॅप्शन पण तुम्हाला मिळतील.

बॅटरी
दोन्ही फोन मधील मुख्य फरक स्क्रीन आणि बॅटरीचा आहे. गूगल पिक्सल 3 मध्ये 2,915एमएएच ची बॅटरी आहे. तर पिक्सल 3 एक्सएल मध्ये 3,430एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. खास बाब ही की दोन्ही मॉडेल मध्ये वायरलेस चार्जिंग सोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

काही खास फीचर्स

गेल्या वर्षी गूगल पिक्सल सीरीज फोन आईपी67 रेटिंग सह उपलब्ध झाले होते. यावेळी कंपनी ने हे आईपी68 सर्टिफिकेशन सह सादर केले आहेत. अर्थात फोन धुळ व पाणी पासून वाचतात आणि हे 1.5मीटर पाणी मध्ये 30 मिनिटे राहू शकतात. याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला फ्रंट आॅडियो स्पीकर मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्स पॅक सोबत हेडफोन उपलब्ध आहेत. फोन मध्ये डेटा ट्रांसफर साठी यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.

किंमत आणि उपलब्धता

लॉन्च सोबतच कंपनी ने फोन च्या प्राइस आणि उपलब्धतेबद्दल माहिती दिली आहे. गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल भारतात 11 ऑक्टोबर पासून प्री आॅर्डर साठी उपलब्ध होतील. तसेच या फोन्सची विक्री 1 नोव्हेंबर पासून सुरू होईल. भारतात गूगल पिक्सल 3 च्या 64जीबी स्टोरेज मॉडेल ची किंमत 71,000 रुपये असेल. तर पिक्सल 3 च्या 128जीबी वाल्या वेरियंटची किंमत 80,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे गूगल पिक्सल 3एक्सएल च्या 64जीबी स्टोरेज वेरियंट साठी तुम्हाला 83,000 रुपये द्यावे लागतील तर 128जीबी वाला वेरियंट 92,000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

The post मोठी स्क्रीन, दमदार प्रोसेसर आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-and-pixel-3-xl-launched-price-specifications-and-features-in-marathi/feed/ 0
गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अन​बाक्सिंग वीडियो झाला लीक, फोनच्या डिजाईन व लुकची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-unboxing-video-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-unboxing-video-leak-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 09:45:54 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1645 पिक्सल 3 एक्सएल चे हे फोटोज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे की गूगल चा हा आगामी स्मार्टफोन दिसायला कसा असेल.

The post गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अन​बाक्सिंग वीडियो झाला लीक, फोनच्या डिजाईन व लुकची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगलच्या पिक्सल सीरीज च्या आगामी स्मार्टफोन पिक्सल 3 एक्सएल बद्दल काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की हा 4 ऑक्टोबरला टेक बाजारात येईल. फोनची लॉन्च डेट नोकिया कॅनडा च्या आॅफिशियल वेबसाइट वर झालेल्या लिस्टिंग वरून समोर आली होती. तर आज एक मोठया लीक मधून पिक्सल 3 एक्सएल चा अनबॉक्सिंग वीडियो पण समोर आला आहे. या वीडियो मध्ये गूगल पिक्सल 3 एक्सएल चा बॉक्स फोन व सर्व एक्सेसरीज सह दाखविण्यात आला आहे. अनबॉक्सिंग वीडियो मधून पिक्सल 3 एक्सएल च्या लुक, डिजाईन व फीचर्स ची माहिती मिळाली आहे.

रेडिट वेबसाइट वर गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अनबॉक्सिंग ​वीडियो शेयर करण्यात आला आहे. या वीडियो मध्ये फोन को बॉक्स मधून बाहेर काढून बॉक्स मधील सर्व एक्सेसरीज दाखविण्यात आल्या आहेत तसेच पिक्सल 3 एक्सएल फोन च्या डिजाईन सोबतच याच्या सेटिंग मेन्यू मधील स्पेसिफिकेशन्स पण दिसले आहेत. सर्वात आधी बॉक्स बद्दल बोलुया, पिक्सल फॅन्स हे वाचून आनंद होईल की या फोन मध्ये आॅडियो जॅक पण देण्यात आला आहे. कारण पिक्सल 2 एक्सएल मध्ये आॅडिया जॅक नव्हता.

फोन बॉक्स मध्ये सर्वात वर गूगल चा आगामी हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन ठेवण्यात आला आहे. गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या बॉक्स मध्ये ईयरफोन देण्यात आले आहेत ज्याची वायर यूएसबी टाईप-सी ची आहे. बॉक्स मध्ये यूएसबी टाईप-सी आणि 3.5एमएम जॅक चा कनेक्टर पण देण्यात आला आहे जो फोन मध्ये 3.5एमएम वाले इतर हेडफोन अटॅच करण्याची सुविधा देतो. बॉक्स मध्ये ओटीजी कनेक्टर पण ठेवण्यात आला आहे.

गूगल पिक्सल 3 एक्सएल जाड बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन च्या सेटिंग्स वरून समजले की हा फोन 1440+ पिक्सल ला सपोर्ट करतो. बॉक्स मधील फोन पिक्सल 3 एक्सएल चा 4जीबी रॅम वेरिएंट आहे. फोन मध्ये एंडरॉयड चा लेटेस्ट ओएस वर्जन एंडरॉयड 9 पाई देण्यात आला आहे तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आहे.

गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या फोटो मध्ये फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे.

पिक्सल 3 एक्सएल चे हे फोटोज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे की गूगल चा हा आगामी स्मार्टफोन दिसायला कसा असेल. फोनचा लुक आणि डिजाईन या लीक मधून स्पष्ट झाली आहे. पण कंपनी आपल्या या फोन मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स देईल आणि फोन ची लॉन्च डेट 4 ऑक्टोबर असेल की नाही यासाठी गूगल च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post गूगल पिक्सल 3 एक्सएल चा अन​बाक्सिंग वीडियो झाला लीक, फोनच्या डिजाईन व लुकची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3-xl-unboxing-video-leak-in-marathi/feed/ 0