Google Pixel 3 XL वर मिळत आहे 28,000 रुपयांची सूट, अशाप्रकारे घेता येईल या डीलचा फायदा

जर तुम्ही एक फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकॉर्ट वर गेल्यावर्षी लॉन्च झालेला Google Pixel 3XL भरपूर डिस्काउंट सह विकत घेता येईल. कंपनी हँडसेट वर 28,000 रुपयांचा बंपर डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट नंतर हा फोन 54,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा डिस्काउंट स्टॉक संपेपर्यंत असेल.

अशी असेल डिस्काउंट नंतर किंमत
स्मार्टफोनच्या 4जीबी/64जीबी वेरिएंटची खरी किंमत 82,999 रुपये आहे. पण, डिस्काउंट नंतर फोनची किंमत 54,999 रुपये आहे. तर 4जीबी/128जीबी वेरिएंटची खरी किंमत 91,999 रुपये आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 65,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच प्रोडक्ट एक्सचेंज वर पण 21,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

स्पेसिफिकेशन्स
गूगल Pixel 3XL स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात जास्तीत जास्त फीचर पिक्सल 3 स्मार्टफोन सारखे आहेत. दोन्ही फोन मध्ये साइज आणि बॅटरीचा मोठा फरक आहे. Pixel 3 XL मध्ये 6.3-इंचाचा QHD+ (2960×1440 पिक्सल्स) फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:5:9 आहे. या फोन सोबत कंपनीने पिक्लस 3 स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. गूगल पिक्सल 3 अँन्ड्रॉईडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9.0 Pie वर चालतो. कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यानंतर हा 7 तास 15 मिनिटे चालेल. भारतात हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता.

गूगल यावर्षी आपल्या पिक्सल सीरीजचे फोर्थ जनरेशन हँडसेट लॉन्च करेल. पिक्सल सीरीज मध्ये यावर्षी कंपनी Pixel 4 आणि Pixel 4XL सादर करू शकते. याआधी Pixel 4 चा एक फोटो लीक झाला होता, ज्यावरून फोनच्या डिजाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. माहितीनुसार गूगल पिक्सल 4 मध्ये फ्रंटला पण डुअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये पंचहोल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

पंचहोल डिस्प्ले आतापर्यंत हॉनर आणि सॅमसंगच्या फोन मध्ये दिसला आहे. लीक इमेज मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. अशाआहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फोन फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. याआधी हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. गीकबेंच वर गूगल पिक्सल 4 ने सिंगल कोर टेस्ट मध्ये 744 आणि मल्टिकोर टेस्ट मध्ये 3201 प्वाइंट्स स्कोर मिळवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here