गूगल ने लॉन्च केली पिक्सल स्लेट, ऍप्पल आयपॅड आणि सॅमसंग टॅबला मिळेल टक्कर

दीर्घप्रतिक्षेनंतर गूगल ने काल आपल्या पिक्सल सिरीज मध्ये दोन नवीन फोन पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन गूगल ने सादर केलेले आता पर्यंतचे सर्वात पावरफुल स्मार्टफोन आहेत. या फोन्स सोबत गूगल ने फॅन्सना सरप्राइज देत अजून एक शानदार डिवाईस ‘पिक्सल स्लेट’ पण सादर केला आहे. पिक्सल स्लेट एक टॅबलेट डिवाईस आहे जो थेट सॅमसंगच्या गॅलॅक्सी टॅब तसेच ऍप्पलच्या आयपॅड प्रो ला टक्कर देतो. पिक्सल स्लेट जगातील पहिला असा टॅबलेट आहे जो क्रोम आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो.

गूगल पिक्सल स्लेटचे स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनी ने यात 3,000 X 2,000 पिक्सल रेज्ल्यूशन वॉल 12.3-इंचाचा मोठा एलटीपीएस डिस्प्ले दिला आहे. या टॅबलेटची खासियत म्हणजे हा कोणत्याही की-बोर्ड सोबत अटॅच केला जाऊ शकतो. हा टॅबलेट तीन रॅम वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात 4जीबी, 8जीबी आणि 16जीबी चे आॅप्शन्स आहेत. पिक्सल स्लेट चे हे तिन्ही वेरिएंट 8 जेनरेशन कोर आई एम3, कोर आई5 आणि कोर आई7 सह सिलेरियॉन प्रोसेसर वर चालतील.

p

पिक्सल स्लेटचे तिन्ही रॅम वेरिएंट्स 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल मेमरी सह वेगवेगळ्या बाजारात लॉन्च केले जातील. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल तथा फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. पिक्सल स्मार्टफोन प्रमाणे पिक्सल स्लेट चा कॅमेरा पण पोर्टरेट मोड सह शानदार फोटो क्लिक करू शकतो.

गूगल पिक्सल स्लेट वाईफाई व एटीई सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे. या स्लेट मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटन पण देण्यात आले आहे. सॅमसंग एस पेन प्रमाणे गूगल ने पण पिक्सल स्लेट सोबत ‘डिजीटल पेन’ दिला आहे. पिक्सल स्लेट मध्ये डुअल स्पीकर्स आहे जो वीडियो बघताना चांगला साऊंड इफेक्ट देतो. पिक्सल स्लेट च्या पावर बटन वर कंपनी ने फिंगरप्रिंट सेंसर पण दिला आहे.

किंमत पाहता पिक्सल स्लेट टॅबलेट चा सिलेरियॉन प्रोसेसर वर चालणार 4जीबी/32जीबी वेरिएंट 599 डॉलर (जवळपास 44,300 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच याचा 8जीबी/64जीबी वेरिएंट 699 डॉलर (जवळपास 51,800 रुपये) मध्ये आला आहे. त्याचप्रमाणे कोर एम3 वर चालणार 8जीबी/64जीबी वेरिएंट 799 डॉलर (जवळपास 59,900 रुपये), कोर आई5 वर चालणार 8जीबी/128जीबी वेरिएंट 999 डॉलर (जवळपास 74,000 रुपये) तसेच कोर आई7 वर चालणार 16जीबी/256जीबी वेरिएंट 1599 डॉलर (जवळपास 1,18,600 रुपये) मध्ये गूगल ने लॉन्च केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here