मोठी स्क्रीन, दमदार प्रोसेसर आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल

सर्वात आधी सॅमसंग ने आपला गॅलेक्सी नोट 9 सादर केला होता त्यानंतर जगातील प्रमुख अॅप्पल ने गेल्या महिन्यात आयफोन 10एस, आयफोन 10एस मॅक्स आणि आयफोन 10आर लॉन्च केले. आता वेळ होती इंटरनेटच्या राजाची आणि जगातील नंबर एक मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयडच्या मालक गूगल ची. लोक पिक्सल फोनची आतुरतेने वाट बघत होते आणि आज कंपनी ने आपली फोन सीरीज सादर केली. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण कंपनी ने दोन मॉडेल सादर केले आहेत. गूगल ने पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल लॉन्च केले आहेत. मोठा डिस्प्ले, नवीन ओएस आणि दमदार प्रोसेसर सह या फोन मध्ये अनेक खास फीचर्स आहेत. खाली आम्ही गूगल पिक्सल 3 आणि गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फीचर्स बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डिस्प्ले
गूगल पिक्सल 3 मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.5-इंचाचा फुलएचडी+ एचडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. तसेच पिक्सल 3एक्सएल 18.5:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात 2960 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा क्यूएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले च्या प्रोटेक्शन साठी हा पण कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी साठी पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12.2-मेगापिक्सलचा डुअल पिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा आॅप्टिकल आणि इलेक्ट्रानिक ईमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलजीला सपोर्ट करतो. सेल्फी साठी गूगल चे नवीन फोन थोडे खास आहेत. फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. एक कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सल सह एफ/2.2 अपर्चर ला सपोर्ट करतो तर दुसरा सेंसर एफ/1.8 अपर्चर वाला आहे. फोनचा कॅमेरा एचडीआर+ ला सपोर्ट करतो. तसेच कंपनीचा दावा आहे की हा मानवी डोळ्या प्रमाणे सर्व गोष्टी बघू शकतो. या सोबत एआई इंटीग्रेशन पण मिळेल.

रॅम व स्टोरेज
प्रोसेसर च्या बाबतीत हा फोन खुप अपग्रेड झाला आहे पण रॅम आणि रोम मध्ये जास्त फरक दिसत नाही. गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे तर स्टोरेज साठी तुम्हाला 64जीबी आणि 128 जीबी इंटरनल मेमरी मिळेल. तुम्हाला तर माहितीच आहे की गूगल फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट नसतो आणि हे फोन पण तसेच आहेत.

प्रोसेसर
गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल दोन्ही फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट वर चालतात. कंपनी ने हे स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह सादर केले आहेत आणि यात 10 नॅनो मीटर वाला आॅक्टाकोर (4×2.5 गीगाहट्र्ज कोरयो 385 गोल्ड आणि 4×1.6 गीगाहट्र्ज कोरयो 385 सिल्वर) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रीनो 630 जीपीयू देण्यात आला आहे.

आॅपरेटिंग सिस्टम

गूगल चे फोन नेहमीच एंडरॉयड च्या सर्वात नवीन आॅपरेटिंग सिस्टम वर चालतात आणि हे फोन पण लेटेस्ट एंडरॉयड वर चालतात. दोन्ही फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आहेत आणि यात तुम्हाला अडॅप्टिव बॅटरी, अडॅप्टिव ब्राइटनेस अॅप अॅक्शन आणि टेक्स्ट क्लासिफायर सारखे आॅप्शन मिळतील. अडॅप्टिव बॅटरी फीचर्स सेंस करून स्वतःहून अॅप्स बंद करेल जे विनाकारण बॅटरी वापरत आहेत. तसेच अडॅप्टिव ब्राइटनेस जसा प्रकाश असेल तसा तुमचा डिस्प्ले एडजस्ट करेल. एंडरॉयड 9 पाई मध्ये मशीन लर्निंग आधारित फीचर्स आहेत जे चांगला यूजर एक्सपीरियंस देतात. वेळ आणि गरज पाहून स्वतःहून अॅप्स फोन वर हाईलाइट केले जातील. त्याचबरोबर टास्क क्विकर आणि डिसप्ले कट आउट सारखे इतर आॅप्शन पण तुम्हाला मिळतील.

बॅटरी
दोन्ही फोन मधील मुख्य फरक स्क्रीन आणि बॅटरीचा आहे. गूगल पिक्सल 3 मध्ये 2,915एमएएच ची बॅटरी आहे. तर पिक्सल 3 एक्सएल मध्ये 3,430एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. खास बाब ही की दोन्ही मॉडेल मध्ये वायरलेस चार्जिंग सोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

काही खास फीचर्स

गेल्या वर्षी गूगल पिक्सल सीरीज फोन आईपी67 रेटिंग सह उपलब्ध झाले होते. यावेळी कंपनी ने हे आईपी68 सर्टिफिकेशन सह सादर केले आहेत. अर्थात फोन धुळ व पाणी पासून वाचतात आणि हे 1.5मीटर पाणी मध्ये 30 मिनिटे राहू शकतात. याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला फ्रंट आॅडियो स्पीकर मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्स पॅक सोबत हेडफोन उपलब्ध आहेत. फोन मध्ये डेटा ट्रांसफर साठी यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.

किंमत आणि उपलब्धता

लॉन्च सोबतच कंपनी ने फोन च्या प्राइस आणि उपलब्धतेबद्दल माहिती दिली आहे. गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल भारतात 11 ऑक्टोबर पासून प्री आॅर्डर साठी उपलब्ध होतील. तसेच या फोन्सची विक्री 1 नोव्हेंबर पासून सुरू होईल. भारतात गूगल पिक्सल 3 च्या 64जीबी स्टोरेज मॉडेल ची किंमत 71,000 रुपये असेल. तर पिक्सल 3 च्या 128जीबी वाल्या वेरियंटची किंमत 80,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे गूगल पिक्सल 3एक्सएल च्या 64जीबी स्टोरेज वेरियंट साठी तुम्हाला 83,000 रुपये द्यावे लागतील तर 128जीबी वाला वेरियंट 92,000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here