Huawei Nova 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 03 Jan 2019 11:56:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/#respond Thu, 03 Jan 2019 11:56:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3279 आम्ही 5 अशा स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे या महिन्यात भारतात येतील.

The post जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 सुरु झाला आहे. नवीन वर्षासोबतच टेक्नॉलॉजी मार्केट पण नवीन प्रोडक्ट्स व स्मार्टफोन्स सह तयार आहे. स्मार्टफोन यूजर्सना अशा आहे कि नवीन वर्षात त्यांच्या आवडीच्या कंपन्या आणि ब्रँड काही वेगळे व शानदार स्मार्टफोन लॉन्च करतील. जानेवारी मधेच लास वेगास मध्ये सीईएस 2019 चे महा आयोजन होणार आहे. या मंचावर अनेक टेक कंपन्या आपली टेक्नॉलॉजी व प्रोडक्ट सादर करतील. तर दुसरीकडे जानेवारी मध्ये भारतीय बाजार पण अनेक शानदार स्मार्टफोन्सच्या लॉन्च साठी तयार आहे. पुढे आम्ही 5 अशा स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे या महिन्यात भारतात येतील.

सॅमसंग गॅलेक्सी एम20

सॅमसंग गॅलेक्सी जे आणि गॅलेक्सी ए सीरीज हटवून आपल्या नवीन एम सीरीजची सुरवात करणार आहे. या फोन संबंधित आता पर्यंत भरपूर माहिती आली आहे. आता पर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार जानेवारीच्या सुरवातीला हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम20 कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात वाटर ड्रॉप नॉच मिळेल. सोबतच फोन मध्ये डुअल कॅमेरा आणि 5,000 एमएएच ची बॅटरी पण असेल. फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी असण्याची शक्यता आहे.

हुआवई नोवा 4

हुआवई नोवा 4 डिसेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च झाला होता जो या महिन्यात भारतात येईल. या फोन मध्ये 6.41-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह पंच होल नॉच देण्यात आली आहे.हा फोन 8जीबी रॅम सह हाईसिलिकॉन कीरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हुआवई नोवा 4 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48-एमपी+16-एमपी+2-एमपी चे कॅमेरा सेंसर आहेत. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 48-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 25-एमपी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुआवई नोवा 4 फास्ट चार्जिंग सह 3,750 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. चीन मध्ये या फोनची किंमत 3,099 युआन (जवळपास 30,000 रुपये) पासून सुरु आहे.

ऑनर व्यू 20

ऑनर व्यू20 जानेवारी मधेच येऊ शकतो. हा फोन वी20 नावाने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. आता हाच फोन लवकरच जगभरात लॉन्च होणार आहे. ऑनर व्यू20 मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हुआवई च्या किरीन 980 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. सोबत 6जीबी रॅम व 8जीबी रॅमआणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी आणि 48-मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील पॅनल वर टीओएस 3डी सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी ऑनर ने या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी ए1

रियलमी निवडक स्मार्टफोन्सच्या जोरावर भारतात मजबूत फॅनबेस बनवत आहे. तसेच आता कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. हा फोन याच महिन्यात भारतात रियलमी ए1 नावाने येईल. आता समोर आलेल्या माहितीनुसार रियलमी ए1 मीडियाटेक हेलियो पी 70 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. कंपनी यात 2जीबी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देऊ शकते. लीक रिपोर्ट्स अनुसार डिवाइस मध्ये पावर बॅकअप साठी 4,200एमएएच ची बॅटरी असेल. फोटोग्राफी साठी 13-एमपी+2-एमपी चा डुअल रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

हुआवई वाय 9 (2019)

हुआवई वाय 9 (2019) अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला आहे आणि येत्या काही दिवसांत बाजारात पण येईल. या फोन मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. एंडरॉयड ओरियो सह हा फोन हुआवई किरीन 710 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी यात 16-एमपी व 2-एमपी चा डुअल रियर कॅमेरा तसेच 13-एमपी व 2-एमपी चा डुअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. अशा आहे कि भारतात हुआवई वाय 9 (2019) चा बेस वेरिएंट 15,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीती लॉन्च होईल.

The post जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/feed/ 0
48एमपी कॅमेरा, पंच होल डिस्प्ले आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला हुआवई नोवो 4, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-launched-with-48mp-camera-and-punch-hole-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-launched-with-48mp-camera-and-punch-hole-display-in-marathi/#respond Tue, 18 Dec 2018 09:02:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3173 चीन मध्ये याची किंमत 3,099 यूआन पासून सुरु होत आहे जी भारतातील 30,000 रुपयांएवढी आहे.

The post 48एमपी कॅमेरा, पंच होल डिस्प्ले आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला हुआवई नोवो 4, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने यावर्षी नोवा 3 आणि नोवा 3 लाइट मॉडेल भारतात सादर केले होते. तर आता कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन नोवा 4 सादर केले आहेत. हा फोन सध्या ​चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे पण आशा आहे की लवकरच भारतात पण हा उपलब्ध होईल. कंपनी हा फोन दोन मॉडेल मध्ये सादर केला आहे. दोन्ही मॉडेल मध्ये मुख्य फरक कॅमेऱ्याचा आहे. नोवा 4 जगातील पहिला फोन आहे ज्यात 48—मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच या फोन मध्ये तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी ए8एस प्रमाणे पंच होल नॉच मिळेल.

हुआवई नोवा 4 चे स्पेसिफिकेशन
हुआवई नोवा 4 च्या दोन्ही मॉडेलच्या रियर पॅनल मध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आला. एक मॉडेल 48—मेगापिक्स्ल + 16—मेगापिक्सल + 2—मेगापिक्सल सेटअप सह येतो. यात मुख्य सेंसर 1.8 अपर्चर सह येतो जो ऑटोफोकसचे काम करतो. तर दुसरा सेंसर एफ/2.2 अपर्चर वाला आहे जो वाइड एंगलचे काम करतो. तर तिसरा सेंसर एफ/2.4 अपर्चर वाला आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे.

दूसरे मॉडेल मध्ये पण ट्रिपल कॅमेरा सेंसर आहे पण त्याचा प्राइमरी सेंसर 20—मेगापिक्सलचा आहे. इतर दोन 16एमपी आणि 2एपमी चे आहेत. फोन मध्ये हुआवईचा स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस सपोर्ट आहे. तसेच फोन मध्ये एचडीआर5 सोबत कपंनी ने यात 10एक्स पर्यंतच्या झूमचा सपोर्ट दिला आहे. फोन मध्ये सेल्फीसाठी 25—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर स्पेसिफिकेशन पाहता फोन मध्ये 6.41—इंचाचा 1,080 x 2,310 पिक्सल रेजल्यूशन असलेला फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हुआवई च्या हाईसिलिकॉन कीरीन 970 चिपसेट वर चालतो आहे आणि फोन मध्ये 2.4गीगाहट्र्ज असेलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर माली—जी72 जीपीयू देण्यात आला आहे.

कंपनी ने फोन मध्ये 8जीबी रॅम दिला आहे. सोबत 128जीबी ची मेमरी मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट नाही. सॉफ्टवेयर पाहता हा फोन इमोशन यूआई 9.0 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई आधारित आहे.

हुआवई नोवा 4 कंपनी ने 3,750 एमएएच ची बॅटरी सह सादर केला आहे आणि फोन मध्ये 18 वॉट चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सोबत वाईफाई, ब्लूटूथ आणि जीपीएस पण मिळेल. चीन मध्ये याची किंमत 3,099 यूआन पासून सुरु होत आहे जी भारतातील 30,000 रुपयांएवढी आहे.

The post 48एमपी कॅमेरा, पंच होल डिस्प्ले आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला हुआवई नोवो 4, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-launched-with-48mp-camera-and-punch-hole-display-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-with-48mp-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-with-48mp-rear-camera-in-marathi/#respond Wed, 12 Dec 2018 14:57:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3138 हुआवई ने या फोनचे स्पेसिफिकेशन सांगितले नाहीत पण चीनी सोशल नेटवर्किंग साइट वर संपूर्ण स्पेसिफिकेशन आले आहेत.

The post 8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने आधीच घोषणा केली आहे की कंपनी 17 डिसेंबरला नोवा सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करणार आहे. कंपनी नोवा 4 नावाने फोन लॉन्च करणार आहे आणि याचा पोस्टर पण शेयर केला आहे. या पोस्टर मध्ये फोनचा लुक स्पष्ट दिसत आहे. फुल व्यू डिस्प्ले सोबत फोन मध्ये होल पंच नॉच देण्यात आली आहे जशी आपण सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये बघितली आहे. हुआवई ने या फोनचे स्पेसिफिकेशन सांगितले नाहीत पण चीनी सोशल नेटवर्किंग साइट वर संपूर्ण स्पेसिफिकेशन आले आहेत.

या लीक मध्ये हुआवई नोवा 4 च्या रॅम, प्रोसेसर आणि मेमरी बद्दल स्पष्ट माहिती घेता येईल. माहिती देण्यात आली आहे की हा फोन दोन वेरियंट मध्ये लॉन्च होईल. हाई आणि लो वेरियंट मध्ये मुख्य अंतर सेल्फी कॅमेर्‍याच्या आहे. हाइयर वेरियंट मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पण रॅम आणि रोम मध्ये कोणताही फरक नाही.

हुआवई नोवा 4 मध्ये 6.4-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे जी 2310 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाली एचडी+ स्क्रीन 19.25:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. तर हा फोन हुआवई किरीन 970 वर चालतो जो​ खूप चांगला प्रोसेसर आहे.

हा फोन 8जीबी रॅम मेमेरी सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या सोबत पावर बॅकअप साठी 3,750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी हुआवई नोवा 4 मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्टँडर्ड वर्जन मध्ये 20एमपी + 16एपमी + 2एमपी चा कॅमेरा आहे तर हाईयर वेरियंट मध्ये 20 च्या ऐवजी 48एमपी चा कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-with-48mp-rear-camera-in-marathi/feed/ 0
17 डिसेंबरला लॉन्च होईल जगातील पहिला असा स्मार्टफोन ज्याच्या डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-on-17-december-in-display-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-on-17-december-in-display-selfie-camera-in-marathi/#respond Mon, 03 Dec 2018 13:46:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3049 हुआवई पहिली बाजी मारत आपल्या नोवा 4 ने जगातील पहिला इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनचा खिताब आपल्या नावे करण्यात यशस्वी होईल.

The post 17 डिसेंबरला लॉन्च होईल जगातील पहिला असा स्मार्टफोन ज्याच्या डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई बद्दल गेल्या आठवड्यात एक लीक समोर आला होता ज्यात कंपनीने एका अशा फोनचा फोटो दाखवला होता ज्याच्या फ्रंट पॅनल वरील सेल्फी कॅमेरा नॉच किंवा बेजल वर नसून डिस्प्ले वरील एका छोट्याश्या ‘होल’ मध्ये होता. या लीक मध्ये एवढे समजले की हुआवईचा हा फोन डिसेंबर मध्ये समोर येईल पण फोनच्या नावाची व लॉन्च डेटची माहिती नव्हती. तर आता हुआइर्वने अधिकृतपणे सांगितले आहे की या इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव हुआवई नोवा 4 असेल आणि हा 17 डिसेंबरला टेक मंचावर येईल.

हुआवई ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव व लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. हुआवई ने सांगितले आहे की कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन नोवा 4 नावाने 17 डिसेंबरला टेक मंचावर येईल. 17 डिसेंबरला हा स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला जाईल जो नंतर जगातील इतर बाजारांत येईल. हुआवई नोवा 4 मध्ये इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असेल जो फोन बॉडी व नॉच पासून लांब फोनच्या डिस्प्लेच्या आतमध्ये असेल. या कॅमेऱ्याच्या चारही बाजूला फोनची स्क्रीन असेल.

फोनचा हा सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या आत दिला जाईल. म्हणजे फोनच्या डिस्प्लेच्या आत एक छोटेशे छिद्र असेल आणि आणि या छिद्रात फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या फ्रंट पॅनलवरून नसून ​फोनच्या स्क्रीन खाली असेल. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी ए8एस पण असाच सेल्फी कॅमेरा असेल. पण हुआवई पहिली बाजी मारत आपल्या नोवा 4 ने जगातील पहिला इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनचा खिताब आपल्या नावे करण्यात यशस्वी होईल.

हुआवई नोवा 4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6जीबी तसेच 4जीबी च्या दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड पाई आधारित असेल तसेच प्रोसेसिंग साठी यात कपंनीचा सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट किरीन 980 दिला जाऊ शकतो. कंपनी ने हुआवई नोवा 4 संबंधित इतर माहिती अजून आॅफिशियल केली नाही. त्यामुळे फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 17 डिसेंबरची वाट बघणेच योग्य.

The post 17 डिसेंबरला लॉन्च होईल जगातील पहिला असा स्मार्टफोन ज्याच्या डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-on-17-december-in-display-selfie-camera-in-marathi/feed/ 0
इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर नंतर येत आहे इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा, डिसेंबर मध्ये लॉन्च होईल हुआवईचा हा अनोखा फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-in-display-selfie-camera-phone-infinity-o-display-to-launch-in-december-nova-3s-nova-4-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-in-display-selfie-camera-phone-infinity-o-display-to-launch-in-december-nova-3s-nova-4-in-marathi/#respond Mon, 26 Nov 2018 08:51:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2977 हुआवई ने फोनचा फोटो शेयर करताना डिसेंबर महिन्याचा उल्लेख केला आहे. कंपनी ने अजून फोनचे सांगितले नाव सांगितले नाही

The post इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर नंतर येत आहे इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा, डिसेंबर मध्ये लॉन्च होईल हुआवईचा हा अनोखा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई बद्दल गेल्याच आठवड्यात एक लीक समोर आला होता ज्यात ब्रँड च्या एका फोनचा फोटो लीक झाला होता. लीक झालेल्या या फोनचे नाव पी स्मार्ट 2019 असे सांगण्यात आले आहे या फोन मध्ये ‘ओ’ शेप नॉच दिसली होती. तर आज पुन्हा हुआवई च्या अजून एका स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. लीक झालेला फोन फक्त हुआवई चा नव्हे तर टेक विश्वा साठी खुप खास आहे, कारण या फोन मध्ये इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा असेल. म्हणजे फ्रंट कॅमेरा फोनच्या डिस्प्ले च्या खाली असेल.

हुआवई ने आपल्या आॅफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेईबो वर नवीन फोनचा फोटो शेयर केला आहे. या फोटो मध्ये फोन नॉच व बेजल विना दाखवण्यात आला आहे, म्हणजे हा फोन पूर्णपणे बेजल लेस असेल आणि त्याच्या वरच्या बाजूला कोणतीही नॉच दिली जाणार नाही. नॉच नसल्यामुळे फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा किंवा कोणताही सेंसर नसेल. हुआवई द्वारा शेयर करण्यात आलेल्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या कोपर्‍यात एक लाईट दाखवण्यात आली आहे. बोलले जात आहे की तिथेच फोनचा सेल्फी कॅमेरा असेल.

फोनचा हा सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या आत दिला जाईल. म्हणजे फोनच्या डिस्प्ले च्या आत एका छोट्याश्या छिद्रचे स्थान असेल आणि याच छिद्रात फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या फ्रंट पॅनल वर नसुन ​फोनच्या स्क्रीनच्या खाली असेल. विशेष म्हणजे हुआवईचा हा फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा असेल. आता पर्यंत सेल्फी कॅमेरा फोनच्या बॉडी पार्ट, नॉच किंवा मग स्लाईडर पॅनल वर आला आहे.

हुआवई ने फोनचा फोटो शेयर करताना डिसेंबर महिन्याचा उल्लेख केला आहे. कंपनी ने अजून फोनचे सांगितले नाव सांगितले नाही पण या इमेज पोस्ट मध्ये हुआवई ने हिंट दिली आहे की कपंनी चा इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन डिसेंबर मध्ये येईल. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या फोनचे नाव हुआवई नोवा 4 सांगितले जात आहे तर काही लीक्स हा फोन नोवा 3एस आहे असे सांगत आहेत.

हुआवई चा हा आगामी स्मार्टफोन कोणत्या नावाने बाजारात येईल हे आता सांगता येत नाही. तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो काय असेल तसेच फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याची प्लेटमेंट कशी असेल या सर्व माहिती साठी हुआवई च्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर नंतर येत आहे इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा, डिसेंबर मध्ये लॉन्च होईल हुआवईचा हा अनोखा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-in-display-selfie-camera-phone-infinity-o-display-to-launch-in-december-nova-3s-nova-4-in-marathi/feed/ 0