हुआवई बद्दल गेल्याच आठवड्यात एक लीक समोर आला होता ज्यात ब्रँड च्या एका फोनचा फोटो लीक झाला होता. लीक झालेल्या या फोनचे नाव पी स्मार्ट 2019 असे सांगण्यात आले आहे या फोन मध्ये ‘ओ’ शेप नॉच दिसली होती. तर आज पुन्हा हुआवई च्या अजून एका स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. लीक झालेला फोन फक्त हुआवई चा नव्हे तर टेक विश्वा साठी खुप खास आहे, कारण या फोन मध्ये इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा असेल. म्हणजे फ्रंट कॅमेरा फोनच्या डिस्प्ले च्या खाली असेल.
हुआवई ने आपल्या आॅफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेईबो वर नवीन फोनचा फोटो शेयर केला आहे. या फोटो मध्ये फोन नॉच व बेजल विना दाखवण्यात आला आहे, म्हणजे हा फोन पूर्णपणे बेजल लेस असेल आणि त्याच्या वरच्या बाजूला कोणतीही नॉच दिली जाणार नाही. नॉच नसल्यामुळे फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा किंवा कोणताही सेंसर नसेल. हुआवई द्वारा शेयर करण्यात आलेल्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या कोपर्यात एक लाईट दाखवण्यात आली आहे. बोलले जात आहे की तिथेच फोनचा सेल्फी कॅमेरा असेल.
फोनचा हा सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या आत दिला जाईल. म्हणजे फोनच्या डिस्प्ले च्या आत एका छोट्याश्या छिद्रचे स्थान असेल आणि याच छिद्रात फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या फ्रंट पॅनल वर नसुन फोनच्या स्क्रीनच्या खाली असेल. विशेष म्हणजे हुआवईचा हा फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा असेल. आता पर्यंत सेल्फी कॅमेरा फोनच्या बॉडी पार्ट, नॉच किंवा मग स्लाईडर पॅनल वर आला आहे.
हुआवई ने फोनचा फोटो शेयर करताना डिसेंबर महिन्याचा उल्लेख केला आहे. कंपनी ने अजून फोनचे सांगितले नाव सांगितले नाही पण या इमेज पोस्ट मध्ये हुआवई ने हिंट दिली आहे की कपंनी चा इन-डिसप्ले सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन डिसेंबर मध्ये येईल. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या फोनचे नाव हुआवई नोवा 4 सांगितले जात आहे तर काही लीक्स हा फोन नोवा 3एस आहे असे सांगत आहेत.
हुआवई चा हा आगामी स्मार्टफोन कोणत्या नावाने बाजारात येईल हे आता सांगता येत नाही. तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो काय असेल तसेच फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याची प्लेटमेंट कशी असेल या सर्व माहिती साठी हुआवई च्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे.















