17 डिसेंबरला लॉन्च होईल जगातील पहिला असा स्मार्टफोन ज्याच्या डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा

हुआवई बद्दल गेल्या आठवड्यात एक लीक समोर आला होता ज्यात कंपनीने एका अशा फोनचा फोटो दाखवला होता ज्याच्या फ्रंट पॅनल वरील सेल्फी कॅमेरा नॉच किंवा बेजल वर नसून डिस्प्ले वरील एका छोट्याश्या ‘होल’ मध्ये होता. या लीक मध्ये एवढे समजले की हुआवईचा हा फोन डिसेंबर मध्ये समोर येईल पण फोनच्या नावाची व लॉन्च डेटची माहिती नव्हती. तर आता हुआइर्वने अधिकृतपणे सांगितले आहे की या इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव हुआवई नोवा 4 असेल आणि हा 17 डिसेंबरला टेक मंचावर येईल.

हुआवई ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव व लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. हुआवई ने सांगितले आहे की कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन नोवा 4 नावाने 17 डिसेंबरला टेक मंचावर येईल. 17 डिसेंबरला हा स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला जाईल जो नंतर जगातील इतर बाजारांत येईल. हुआवई नोवा 4 मध्ये इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असेल जो फोन बॉडी व नॉच पासून लांब फोनच्या डिस्प्लेच्या आतमध्ये असेल. या कॅमेऱ्याच्या चारही बाजूला फोनची स्क्रीन असेल.

फोनचा हा सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या आत दिला जाईल. म्हणजे फोनच्या डिस्प्लेच्या आत एक छोटेशे छिद्र असेल आणि आणि या छिद्रात फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या फ्रंट पॅनलवरून नसून ​फोनच्या स्क्रीन खाली असेल. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी ए8एस पण असाच सेल्फी कॅमेरा असेल. पण हुआवई पहिली बाजी मारत आपल्या नोवा 4 ने जगातील पहिला इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनचा खिताब आपल्या नावे करण्यात यशस्वी होईल.

हुआवई नोवा 4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6जीबी तसेच 4जीबी च्या दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड पाई आधारित असेल तसेच प्रोसेसिंग साठी यात कपंनीचा सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट किरीन 980 दिला जाऊ शकतो. कंपनी ने हुआवई नोवा 4 संबंधित इतर माहिती अजून आॅफिशियल केली नाही. त्यामुळे फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 17 डिसेंबरची वाट बघणेच योग्य.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here