Indian Railway - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/indian-railways-provide-free-wifi-in-moving-train-every-coach-station-piyush-goyal/ https://www.91mobiles.com/marathi/indian-railways-provide-free-wifi-in-moving-train-every-coach-station-piyush-goyal/#respond Thu, 24 Oct 2019 11:51:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5582 ट्रेन मध्ये वाई-फाई सुविधा देण्यासाठी रेल्वेला खूप गुंतवणूक करावी लागेल आणि यासाठी रेल्वेला परदेशी टेक्नॉलॉजी आणि गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागेल.

The post आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारताचे आधुनिकीकरण वेगाने होत आहे. भारत जगात सर्वात मोठा मोबाईल कन्ज्यूमर म्हणून उदयास आला आहे. आज भारतात वापरल्या जाणाऱ्या इंटरनेट डेटाची गणना जगातील अनेक मोठ्या देशांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहचवण्यासाठी एकीकडे टेलीकॉम कंपन्या वेगाने काम करत आहेत तर दुसरीकडे भारत सरकार पण देशात इंटरनेट अजून सहज आणि सुगम बनवण्याच्या उद्देशाने योजना बनवत आहे. भारतीयांसाठी मोठी घोषणा करत देशाचे रेल्वे मंत्री म्हणाले कि त्यांचा प्रयत्न देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये वाई-फाई देण्याचा आहे.

प्रत्येक ट्रेन मध्ये वाई-फाई देण्याची घोषणा करताना रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले कि त्यांचा प्रयत्न आहे कि येत्या चार ते साढेचार वर्षांमध्ये देशात धावणाऱ्या प्रत्येक ट्रेन मध्ये वाई-फाई असावा. न्यूज एजेंसीला दिलेल्या या मुलाखतीत पियूष गोयल म्हणाले कि भारतीय रेल्वे मध्ये वाई-फाई देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आणि जर प्रत्येक ट्रेन मध्ये वाई-फाई उपलब्ध झाले तर यामुळे फक्त प्रवाश्याना इंटरनेटचा लाभ मिळेल असे नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने पण हे मोठे पाउल असेल. यासाठी ट्रॅकच्या बाजूने टॉवर लावण्यासोबतच ट्रेन मध्ये पण राउटर सारख्या मशिन्स लावाव्या लागतील.

मंत्र्यांच्या मते रेल्वे विभागाने या योजनेवर काम पण सुरु केले आहे आणि येत्या काही वर्षांत धावत्या ट्रेन मध्ये पण रेल्वे प्रवाशांना फ्री वाई-फाई ची सुविधा मिळेल. पियूष गोयल यांच्यानुसार भारतात 5150 स्टेशन समध्ये फ्री वाई-फाई आहे आणि पुढच्यावर्षी हा आकडा वाढून 6400 पर्यंत पोहचले. रेल्वे स्टेशन मध्ये वाई-फाई दिल्यानंतर आता ट्रेनच्य आत पण वाई-फाई सर्विस सुरु करण्याची योजना आहे. सोबतच सरकारची योजना ट्रेन्सची सिग्नल सिस्टम पण वाई-फाई आधारित करण्याची आहे.

प्रवास होईल सुरक्षित

ट्रेन मध्ये वाई-फाई सुविधा उपलब्ध झाल्यामुळे इंटरनेटचा वापर तर सोप्पं होईल पण सोबतच रेल्वे प्रवाशांची सुरक्षा पण आणखीन वाढेल. पियूष गोयल यांच्या मते रेल्वे मध्ये वाई-फाई उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक कोच मध्ये सीसीटीवी कॅमेरा लावला जाईल आणि या कॅमेऱ्यात होणारी लाईव रिकॉर्डिंग स्थानिक पोलीस स्थानकात उपलब्द होईल. अशाप्रकारे रेल्वे मध्ये वाई-फाई सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असेल. रेल्वे मंत्र्यांनी मान्य केले कि ट्रेन मध्ये वाई-फाई सुविधा देण्यासाठी रेल्वेला खूप गुंतवणूक करावी लागेल आणि यासाठी रेल्वेला परदेशी टेक्नॉलॉजी आणि गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागेल.

हे देखील वाचा: BSNL-MTNL साठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता Jio आणि Airtel च्या अडचणी वाढणार

फ्री वाई-फाई असलेले स्टेशन

भारतात 5150 रेल्वे स्टेशन्स मध्ये फ्री वाई-फाई सर्विस देण्यात आली आहे. या रेल्वे स्टेशन्सचा संपूर्ण परिसर वाई-फाई झोन बनवण्यात आला आहे, जिथे कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या कोणत्याही भागात बसून कोणत्याही शुल्काविना वाई-फाई चा लाभ घेता येईल. इंडियन रेल्वे स्टेशन्स मध्ये वाई-फाई देण्याचे हे काम रेलटेल कॉरपोरेशन ऑफ इंडियाने केले आहे.

रोज एक स्टेशनला मिळाला वाई-फाई

रेल्वे स्टेशन्स मध्ये मोफत वाई-फाई देण्याचे हे मिशन साल 2016 मध्ये सुरु केले गेले होते आणि 2 वर्ष आणि तीन महिन्यांमध्ये कॉरपोरेशनने देशातील 1,000 स्टेशन्स मध्ये वाई-फाई ची सुविधा दिली होती. रेलटेल नुसार सरासरी एका महिन्यात 37 स्टेशन्सना वाई-फाई झोन मध्ये बदलण्यात आले आहे आणि रोज देशातील 1 रेल्वे स्टेशन फ्री वाई-फाई स्टेशन बनला आहे.

हे देखील वाचा:Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

विशेष म्हणजे देशातील फ्री वाई-फाई सर्विस देणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तसेच वाई-फाई झोन बनणारा 1,000वे स्टेशन पण मुंबईतील रे रोड स्टेशन होते. रेलटेल ने टाटा ट्रस्ट सोबत मिळून रेल्वे स्टेशन्स वर वाई-फाई सेटअपसाठी नवीन भागेदारी केली आहे. त्यांनी 4,000 पेक्षा जास्त भारतीय रेल्वे स्टेशन्स वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले आहेत ज्यात बी, सी, डी आणि ई कॅटेगरीतसा समावेश आहे.

The post आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indian-railways-provide-free-wifi-in-moving-train-every-coach-station-piyush-goyal/feed/ 0
खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/ https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/#respond Fri, 29 Mar 2019 13:12:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3968 फ्री वाई-फाई सर्विस ने सुसज्ज होणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तर वाई-फाई झोन मध्ये परावर्तित होणाऱ्या 1,000व्या स्टेशनचा मान पण मुंबईतील रे रोड स्टेशनला मिळाला आहे.

The post खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या माणसाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा यावरून अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल अश्या झाल्या आहेत. हे जरी मी विनोदाने बोललो असलो तरी बऱ्याच अंशी हे सत्य आहे. हातात मोबाईल आणि मोबाईल मध्ये इंटरनेट सर्वांचीच हि गरज बनली आहे. डिजीटल होत असलेल्या जगात इंटरनेट वेगाने वाढत आहे. टेलीकॉम कंपन्या स्वस्तात जास्त इंटरनेट बेनिफिट देत आहेत, तसेच भारत सरकार ने पण सार्व​जनिक ठिकाणी इंटरनेट देण्यासाठी अनेक कामे केली आहेत. याचसंदर्भात सामान्य माणसांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कि भारतात 1,000 रेल्वे स्टेशन पूर्णपणे फ्री वाई-फाई ने सुसज्ज झाले आहेत.

1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई झोन
भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना भेट देत भारत सरकार ने घोषणा केली आहे कि देशात 1,000 रेल्वे स्टेशन्स फ्री वाई-फाई सर्विस ने सुस्सज करण्यात आले आहे. या 1,000 रेल्वे स्टोशन्सचा संपूर्ण परिसर वाई-फाई झोन बनला आहे, जिथे कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या कोणत्याही ठिकणी बसून कोणतेही शुल्क न देता फ्री वाई-फाई चा लाभ घेता येतो. इंडियन रेल्वे स्टेशन्स वाई-फाई ने सुसज्ज करण्याचे हे काम रेलटेल कॉरपोरेशन ऑफ इंडिया ने केले आहे.

रोज एका स्टेशनला मिळाला वाई-फाई
रेलटेल ने सांगितले आहे कि रेल्वे स्टेशन्सना फ्री वाई-फाई देण्याचे हे मिशन साल 2016 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2 वर्ष आणि तीन महिन्यांत कॉरपोरेशनने देशातील 1,000 स्टेशन्स मध्ये वाई-फाई ची सुविधा दिली आहे. अशाप्रकारे रेलटेल ने सरासरी एका महिन्यात 37 स्टेशन्स वाई-फाई झोन मध्ये परावर्तित केले आहेत आणि रोज देशातील 1 रेल्वे स्टेशन फ्री वाई-फाई स्टेशन बनला आहे. रेलटेल 1,000 वाई-फाई स्टेशन्स बनवल्यानंतर पण आपला हाच वेग कायम ठेवणार आहे.

हे देखील वाचा: ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील धनबाद 4जी मध्ये अव्वल, बघा तुमच्या शहराची परिस्तिथी

विशेष म्हणजे देशात फ्री वाई-फाई सर्विस ने सुसज्ज होणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तर वाई-फाई झोन मध्ये परावर्तित होणाऱ्या 1,000व्या स्टेशनचा मान पण मुंबईतील रे रोड स्टेशनला मिळाला आहे. अलीकडेच रेलटेल ने टाटा ट्रस्ट सोबत रेल्वे स्टेशन्स वर वाई-फाई सेटअप देण्यासाठी भागीदारी केली आहे. त्यांनी 4,000 पेक्षा पण जास्त भारतीय रेल्वे स्टेशन्सना वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले आहे ज्यात बी, सी, डी आणि ई कॅटेगरी आहेत.

भारतीय रेल्वेच्या प्रगतीबद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वीच इंडियन रेल्वे ने एक नवीन प्रीमियम राजधानी एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे जी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन आणि मुबंईच्या छत्रपति शिवाजी महाराज ट्रमिनस दरम्यान चालते. हि ट्रेन फक्त देशातील सर्वात फास्ट ट्रेन्स पैकी नसून हिच्यात अत्याधुनिक आणि मनोरंजक टेक्नॉलॉजी पण आहे. प्रवासात इंटरनेट बेनिफिट देण्यासाठी ट्रेन मध्ये वाई-फाई हॉटस्पॉट आहे. हा वाई-फाई प्रवासी कोणताही अतिक्ति शुल्काविना आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता. ट्रेनचा या वाई-फाई चा वापर एकावेळी 500 तासांपर्यंत केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे

या ट्रेन मधील टीवी स्क्रीन 3डी ला पण सपोर्ट करते. या स्क्रीन वर 3डी वीडियोज प्ले होतात. आणि हा 3डी कंटेंट बघण्यासाठी ट्रेन स्टॉफ कडून 3डी चष्मे पण दिले जातात. तसेच ​ट्रेन प्रवासात एखादी अडचण आल्यास किंवा प्रवासातील जेवण, सफाई, सर्विस सारख्या गोष्टींचा तुमचा अनुभव कसा होता, हा सर्व फीडबॅक तुम्ही प्रवासातच देऊ शकता. भारतीय रेल्वे ने ‘आप की राय’ मोबाईल ऍप ची सुरवात केली आहे आणि या ऍप मधून तुमच्या प्रतिक्रिया रेल्वे विभागाला देऊ शकता.

फ्री वाई फाई असलेल्या 1,000 रेल्वे स्टोशन्सची संपूर्ण लिस्ट बघण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/feed/ 0
भारतीय रेल्वेत मिळणार विमानासारख्या सुविधा, 3डी फिल्म सोबत अनलिमिटेड वाई-फाई मिळेल मोफत https://www.91mobiles.com/marathi/indian-railway-free-wi-fi-3d-gadgets-rajdhani-delhi-mumbai-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/indian-railway-free-wi-fi-3d-gadgets-rajdhani-delhi-mumbai-in-marathi/#respond Wed, 23 Jan 2019 09:49:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3441 सुविधांच्या बाबतीत पण ट्रेन विमानपेक्षा कमी नव्हे.

The post भारतीय रेल्वेत मिळणार विमानासारख्या सुविधा, 3डी फिल्म सोबत अनलिमिटेड वाई-फाई मिळेल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. वाळवंट असो वा जंगल किंवा डोंगराळ भाग असो सगळीकडे भारतीय रेल्वे पोचली आहे. भारतीय रेल्वे फक्त प्रवासाचा सहज आणि आरामदायी साधन नसून किंमतीच्या बाबतीती पण किफायतशीर आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वे आता ऍडव्हान्स पण होत आहे. आतापर्यन्त विमान प्रवासात तुम्हाला प्रत्येक सीट वर टीवी बघायला मिळत होती तसेच आता ट्रेन मध्ये पण होणार आहे. विशेष म्हणजे हि मजा कोणत्याही साधारण चित्रपटाची नसेल तर 3डी मध्ये मिळेल.

इंडियन रेल्वे ने राजधानी एक्सप्रेस मध्ये हि नवीन सुविधा सुरु केली आहे. रेल्वे विभागाने एक नवीन प्रीमियम राजधानी एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे जी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन आणि मुबंईच्या छत्रपति शिवाजी महाराज ट्रमिनस दरम्यान धावते. हि ट्रेन फक्त देशातील सर्वात फास्ट ट्रेन्स पैकी एक नसून आधुनिक आणि मनोरंजक टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. सुविधांच्या बाबतीत पण ट्रेन विमानपेक्षा कमी नव्हे.

मोफत वाई-फाई
राजधानी एक्सप्रेस ने आपल्या प्रवाश्यांना प्रवासात इंटरनेट देण्यासाठी स्वतःचा वाई-फाई हॉटस्पॉट बनवला आहे. हे वाई-फाई रेल्वे प्रवासी कोणत्याही शुल्काविना आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकतात. ट्रेनच्या या वाई-फाई चा वापर एकावेळी 500 तासांपर्यंत केला जाऊ शकतो.

3डी चष्मा
या ट्रेन मधील टीवी स्क्रीन 3डी सपोर्ट सह येते. या स्क्रीन वर 3डी ग्राफिक्स वाली वीडियोज चालतात आणि या 3डी कंटेंटची मजा घेण्यासाठी ट्रेन स्टाफ कडून 3डी चष्मे दिले जातात. ज्याप्रकारे सिनेमा हॉल मध्ये 3डी मूवी बघता येते तसाच ट्रेन मध्ये पण 3डी वीडियोचा आनंद घेता येईल. प्रवास संपताना हे 3डी चष्मे स्टाफला परत करावे लागतील.

इंस्टंट फीडबॅक
​ट्रेनच्या प्रवासात जर तुम्हाला एखादी अडचण आली किंवा प्रवासात जेवण, सफाई, सर्विस इत्यादीचा तुमचा अनुभव कसा होता, या सर्वाचा फीडबॅक तुम्ही तेव्हाच देऊ शकता. भारतीय रेल्वे ने ‘आप की राय’ मोबाइलला ऍपची सुरवात केली आहे आणि याच ऍपच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया रेल्वे विभागाला सांगू शकता.

टिकट वेरिफिकेशन
साधारणतः ट्रेन मध्ये प्रवासात टीटीई प्रवाश्याच्या सीट वर येतो आणि तिकीट चेक करतो. टीटीई तुमच्या सीट वर यायला तासभर लागतो. पण या ट्रेन मध्ये हातोहात तिकीट चेक पण होईल आणि कंफर्म पण होईल. या टेक्नॉलॉजी मुले जास्त वेटिंग लिस्ट मधील लोकांना होईल तसेच प्रवाशांची तिकीट चेक होताच त्याची तिकीट पण कंफर्म होईल.

The post भारतीय रेल्वेत मिळणार विमानासारख्या सुविधा, 3डी फिल्म सोबत अनलिमिटेड वाई-फाई मिळेल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indian-railway-free-wi-fi-3d-gadgets-rajdhani-delhi-mumbai-in-marathi/feed/ 0
आता व्हाट्सॅप वरून समजेल किती लेट आहे ट्रेन, फक्त हा नंबर करावा लागेल सेव https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-train-live-running-status-on-whatsapp-on-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-train-live-running-status-on-whatsapp-on-phone-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 13:30:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1309 भारतीय रेल्वे ने आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक नंबर जाहीर केला आहे जो व्हाट्सॅप वरून ट्रेन संबधी सर्व माहिती मिळेल.

The post आता व्हाट्सॅप वरून समजेल किती लेट आहे ट्रेन, फक्त हा नंबर करावा लागेल सेव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन रेल्वे संपूर्ण जगातील ट्रेन चे सर्वात मोठे जाळे आहे. कुठेही जाण्याचे सर्वात सोप्पा, स्वस्त आणि वेगवान साधन म्हणजे ट्रेन आहे. पण ट्रेन चे उशिरा येणे म्हणजे लोकांसाठी डोकेदुखी असते. बदलत्या हवामानात न थांबता सेवा देणे रेल्वे साठी पण कठीण आहे. आपण भारतीय ट्रेन च्या उशिरा येण्या शी एडजस्ट करतोच पण जर होणारा उशीर आधीच समजला तर त्याचा त्रास कमी होतो. रेल्वे प्रवाशांची हीच समस्या सोडविण्यासाठी भारतीय रेल्वे ने एक उपाय शोधला आहे. आता विना टेंशन तुम्हाला तुमच्या व्हाट्सॅप वर ट्रेन चा उशीर व रनिंग स्टेट्स सह टिकट व ​बुकिंग संबधी सर्व माहिती मिळेल आणि तेही अगदी मोफत.

भारतीय रेल्वे ने आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक नंबर जाहीर केला आहे जो व्हाट्सॅप वरून ट्रेन संबधी सर्व माहिती मिळेल. आता पर्यंत ट्रेन चे लाइव स्टेट्स जाणून घेण्यासाठी इंटरनेट वेबसाइट ची मदत घ्यावी लागत होती किंवा टोल-फ्री नंबर 139 वर कॉल करावा लागत होता. वेबसाइट साठी इंटरनेट पॅक आणि चांगला स्पीड गरजेचा आहे तर टोल-फ्री नंबर वरून रनिंग स्टेट्स जाणून घेण्यासाठी अनेक मिनिटे लाईन बिजी मिळते.

आता या सर्व समस्या दूर करत आता फक्त एका नंबर वर ट्रेन चा नंबर व्हाट्सॅप मेसेज केल्यास रेल्वे संबधी सर्व माहिती मिळेल. रेल्वे कडून 7349389104 जाहिर करण्यात आला आहे. हा नंबर तुमच्या फोन मध्ये सेव करावा लागेल, त्यानंतर हा तुमच्या व्हाट्सॅप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल. ज्या ट्रेन संबधी माहिती तुम्हाला हवी असेल त्या ट्रेन चा नंबर या नंबर वर व्हाट्सॅप करा. 10 सेकेंड्स मध्ये त्या ट्रेन संबधी माहिती तुमच्या व्हाट्सॅप वर येईल.

रेल्वे कडून व्हाट्सॅप मेसेज मध्ये ट्रेन चे लाईव स्टेट्स येईल. ट्रेन कोणत्या स्टेशन वर पोचली आहे, किती उशिरा धावत आहे आणि तुमच्या स्टोशन वर कधी पोहोचेल या सर्व सूचना व्हाट्सॅप मेसेज मधून तुम्हाला मिळतील. फक्त एवढेच नव्हे तर होटल, टूर पॅकेज, ई-कॅटरिंग, वेटिंग रूम व टॅक्सी सारखी अनेक प्रकारची आवश्यक माहिती या नंबर वरून घेता येईल.

रेल्वे विभागाचा दावा आहे की 7349389104 नंबर 10 सेकेंड मध्ये प्रवाशांना ट्रेन चे स्टेट्स सांगेन. तुम्हाला तर माहितीच असेल की व्हाट्सॅप वर सिंगल टिक येणे म्हणजे मेसेज सेंड होणे, डबल टिक येणे म्हणजे मेसेज ​डिलीवर होणे आणि ब्लू टिक येणे म्हणजे मेसेज वाचला जाणे. रेल्वे चे म्हणणे आहे की व्हाट्सॅप वर पाठवलेल्या मेसेज वर ब्लू टिक येताच विभागाकडून रनिंग स्टेट्स पाठवण्यात येईल. सर्वर वर गर्दी असल्यास मेसेज रीड करण्यास थोडा वेळ लागू शकतो.

The post आता व्हाट्सॅप वरून समजेल किती लेट आहे ट्रेन, फक्त हा नंबर करावा लागेल सेव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-train-live-running-status-on-whatsapp-on-phone-in-marathi/feed/ 0