आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

भारताचे आधुनिकीकरण वेगाने होत आहे. भारत जगात सर्वात मोठा मोबाईल कन्ज्यूमर म्हणून उदयास आला आहे. आज भारतात वापरल्या जाणाऱ्या इंटरनेट डेटाची गणना जगातील अनेक मोठ्या देशांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहचवण्यासाठी एकीकडे टेलीकॉम कंपन्या वेगाने काम करत आहेत तर दुसरीकडे भारत सरकार पण देशात इंटरनेट अजून सहज आणि सुगम बनवण्याच्या उद्देशाने योजना बनवत आहे. भारतीयांसाठी मोठी घोषणा करत देशाचे रेल्वे मंत्री म्हणाले कि त्यांचा प्रयत्न देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये वाई-फाई देण्याचा आहे.

प्रत्येक ट्रेन मध्ये वाई-फाई देण्याची घोषणा करताना रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले कि त्यांचा प्रयत्न आहे कि येत्या चार ते साढेचार वर्षांमध्ये देशात धावणाऱ्या प्रत्येक ट्रेन मध्ये वाई-फाई असावा. न्यूज एजेंसीला दिलेल्या या मुलाखतीत पियूष गोयल म्हणाले कि भारतीय रेल्वे मध्ये वाई-फाई देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आणि जर प्रत्येक ट्रेन मध्ये वाई-फाई उपलब्ध झाले तर यामुळे फक्त प्रवाश्याना इंटरनेटचा लाभ मिळेल असे नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने पण हे मोठे पाउल असेल. यासाठी ट्रॅकच्या बाजूने टॉवर लावण्यासोबतच ट्रेन मध्ये पण राउटर सारख्या मशिन्स लावाव्या लागतील.

मंत्र्यांच्या मते रेल्वे विभागाने या योजनेवर काम पण सुरु केले आहे आणि येत्या काही वर्षांत धावत्या ट्रेन मध्ये पण रेल्वे प्रवाशांना फ्री वाई-फाई ची सुविधा मिळेल. पियूष गोयल यांच्यानुसार भारतात 5150 स्टेशन समध्ये फ्री वाई-फाई आहे आणि पुढच्यावर्षी हा आकडा वाढून 6400 पर्यंत पोहचले. रेल्वे स्टेशन मध्ये वाई-फाई दिल्यानंतर आता ट्रेनच्य आत पण वाई-फाई सर्विस सुरु करण्याची योजना आहे. सोबतच सरकारची योजना ट्रेन्सची सिग्नल सिस्टम पण वाई-फाई आधारित करण्याची आहे.

प्रवास होईल सुरक्षित

ट्रेन मध्ये वाई-फाई सुविधा उपलब्ध झाल्यामुळे इंटरनेटचा वापर तर सोप्पं होईल पण सोबतच रेल्वे प्रवाशांची सुरक्षा पण आणखीन वाढेल. पियूष गोयल यांच्या मते रेल्वे मध्ये वाई-फाई उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक कोच मध्ये सीसीटीवी कॅमेरा लावला जाईल आणि या कॅमेऱ्यात होणारी लाईव रिकॉर्डिंग स्थानिक पोलीस स्थानकात उपलब्द होईल. अशाप्रकारे रेल्वे मध्ये वाई-फाई सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असेल. रेल्वे मंत्र्यांनी मान्य केले कि ट्रेन मध्ये वाई-फाई सुविधा देण्यासाठी रेल्वेला खूप गुंतवणूक करावी लागेल आणि यासाठी रेल्वेला परदेशी टेक्नॉलॉजी आणि गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागेल.

हे देखील वाचा: BSNL-MTNL साठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता Jio आणि Airtel च्या अडचणी वाढणार

फ्री वाई-फाई असलेले स्टेशन

भारतात 5150 रेल्वे स्टेशन्स मध्ये फ्री वाई-फाई सर्विस देण्यात आली आहे. या रेल्वे स्टेशन्सचा संपूर्ण परिसर वाई-फाई झोन बनवण्यात आला आहे, जिथे कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या कोणत्याही भागात बसून कोणत्याही शुल्काविना वाई-फाई चा लाभ घेता येईल. इंडियन रेल्वे स्टेशन्स मध्ये वाई-फाई देण्याचे हे काम रेलटेल कॉरपोरेशन ऑफ इंडियाने केले आहे.

रोज एक स्टेशनला मिळाला वाई-फाई

रेल्वे स्टेशन्स मध्ये मोफत वाई-फाई देण्याचे हे मिशन साल 2016 मध्ये सुरु केले गेले होते आणि 2 वर्ष आणि तीन महिन्यांमध्ये कॉरपोरेशनने देशातील 1,000 स्टेशन्स मध्ये वाई-फाई ची सुविधा दिली होती. रेलटेल नुसार सरासरी एका महिन्यात 37 स्टेशन्सना वाई-फाई झोन मध्ये बदलण्यात आले आहे आणि रोज देशातील 1 रेल्वे स्टेशन फ्री वाई-फाई स्टेशन बनला आहे.

हे देखील वाचा:Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

विशेष म्हणजे देशातील फ्री वाई-फाई सर्विस देणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तसेच वाई-फाई झोन बनणारा 1,000वे स्टेशन पण मुंबईतील रे रोड स्टेशन होते. रेलटेल ने टाटा ट्रस्ट सोबत मिळून रेल्वे स्टेशन्स वर वाई-फाई सेटअपसाठी नवीन भागेदारी केली आहे. त्यांनी 4,000 पेक्षा जास्त भारतीय रेल्वे स्टेशन्स वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले आहेत ज्यात बी, सी, डी आणि ई कॅटेगरीतसा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here