Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

Realme कमी काळात शानदार डिजाइन आणि दमदार स्मार्टफोनच्या जीवावर मार्केट वेगळी जागा बनवण्यात यशस्वी झाली आहे. कंपनी आता आपली Realme 5 सीरीज वाढवत यात नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. Realme च्या नवीन स्मार्टफोनचा मॉडेल नंबर RMX1925 सह इंडिया ब्यूरो ऑफ इंडिया स्टँडर्ड (BIS) वर दिसला आहे.

तसेच थायलंडच्या नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीकम्युनिकेशन एजेंसी (NBTC) वर Realme 5s ला मान्यता मिळाली आहे. या दोन्ही लिस्टिंगवरून असा अंदाज लावला जात आहे कि हा फोन भारतासोबतच थायलंड मध्ये लॉन्च केला जाईल. पण या दोन्ही लिस्टिंग मध्ये Realme 5s च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला नाही.

आशा आहे कि येत्या काळात Realme 5s चे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत समोर येईल. तसेच 20 नोव्हेंबरला भारतात Realme X2 Pro लॉन्च केला जाईल. त्यामुळे कदाचित कंपनी या दिवशी Realme 5s लॉन्च करू शकते. तसेच कंपनी डिसेंबर मध्ये XT 730G सादर करेल. Realme 5s बद्दल बोलले जात आहे कि हा एक बजेट स्मार्टफोन असेल.

Realme X2 Pro ब्रँडचा 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा असेलला फोन आहे जो यूरोप मध्ये लॉन्च झाला आहे. जो भारतात येऊ शकतो ज्यामुळे भारतात लॉन्च झालेल्या Redmi Note 8 Pro च्या मागणी आणि विक्री वर पण मोठा प्रभाव पडू शकतो.

Realme X2 Pro मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.5 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच Realme X2 Pro मध्ये डुअल स्टीरियो स्पीकर्स Dolby Atmos आणि सर्टिफाइड Hi-res साउंड क्वॉलिटी सपॉर्ट आहे. Realme X2 Pro मध्ये 50 वॉट VOOC चार्जिंग टेक्नोलॉजी सह पावरफुल 4,000एमएएच बॅटरी देण्यात आली. फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here