Infinix GT 10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Jul 2023 12:09:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 26GB RAM सह येऊ शकतो Infinix GT 10 Pro 5G, ह्यात असेल ट्रान्सपरंट पॅनल आणि LED लाइट https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-5g-may-soon-become-india-first-26gb-ram-phone/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-5g-may-soon-become-india-first-26gb-ram-phone/#respond Tue, 18 Jul 2023 12:09:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22453 गेल्या काही दिवसांपासून INFINIX च्या ट्रान्सपरंट बॅक पॅनल असलेल्या फोनची चर्चा जोरदार सुरु आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपली नवीन जीटी सीरीज घेऊन येत आहे. ह्यात INFINIX GT 10 Pro आणि INFINIX GT 10 Pro + स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डिवाइसचे एक मोठा लीक समोर आला आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत. […]

The post 26GB RAM सह येऊ शकतो Infinix GT 10 Pro 5G, ह्यात असेल ट्रान्सपरंट पॅनल आणि LED लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • INFINIX GT 10 Pro 5G फोनचं नवीन लीक आलं आहे.
  • भारतात याची एंट्री सप्टेंबरमध्ये होऊ शकते.
  • GT सीरीज जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये सादर होऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून INFINIX च्या ट्रान्सपरंट बॅक पॅनल असलेल्या फोनची चर्चा जोरदार सुरु आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपली नवीन जीटी सीरीज घेऊन येत आहे. ह्यात INFINIX GT 10 Pro आणि INFINIX GT 10 Pro + स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डिवाइसचे एक मोठा लीक समोर आला आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत.

Infinix GT 10 Pro 5G (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर पारस गुगलानीनं INFINIX GT 10 Pro 5G फोनचा नवीन लीक सादर केला आहे.
  • सर्वात मोठी बातमी म्हणजे नवीन INFINIX GT 10 Pro 5G जगातील पहिला 26 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनू शकतो.
  • लाँच टाइम लाइन पाहता हा डिवाइस जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • भारतात ह्याची एंट्री सप्टेंबरमध्ये केली जाऊ शकते.
  • असं देखील सांगण्यात आलं आहे की GT सीरीजचा प्रो प्लस व्हेरिएंट भारतात सेलसाठी उपलब्ध होणार नाही.

Infinix 10 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : टिपस्टरनुसार ह्या डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनचा बॅक पॅनल एलईडी लाइटसह येईल. ज्याची तुलना नथिंग फोन 2 शी केली जात आहे.
  • प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्ससाठी कंपनी ह्यात Dimensity 8050 चिपसेट देऊ शकते.
  • स्टोरेज : हा जगातील पहिला 26 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनू शकतो. ह्याचे अनेक स्टोरेज ऑप्शन येऊ शकतात. जोडीला 256GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 100 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सलच्या दोन कॅमेरा लेन्स दिल्या जाऊ शकतात.
  • बॅटरी : हा फोन 7000mAh बॅटरीसह 160W आणि 260W फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह येण्याची शक्यता आहे.
  • ओएस : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.
  • अन्य : ह्यात लेटेस्ट वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G कनेक्टिव्हिटी असे फीचर्स दिले जाऊ शकतात.

The post 26GB RAM सह येऊ शकतो Infinix GT 10 Pro 5G, ह्यात असेल ट्रान्सपरंट पॅनल आणि LED लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-5g-may-soon-become-india-first-26gb-ram-phone/feed/ 0
260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-could-launch-with-260w-fast-charging-and-200mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-could-launch-with-260w-fast-charging-and-200mp-camera/#respond Wed, 15 Mar 2023 12:30:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19524 इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी शक्तीप्रदर्शन करत ‘All-Round FastCharge’ टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी 260W wired आणि 110W wireless fast charging ला सपोर्ट करते. आता बातमी आली आहे की ही टेक्नॉलॉजी असलेला Infinix GT 10 Pro हा ब्रँडचा पहिला मोबाइल फोन बनू शकतो. या मोबाइल फोनचे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात 200MP […]

The post 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इनफिनिक्स जीटी 10 प्रो 260W चार्जिंगसह लाँच होऊ शकतो.
  • या मोबाइल फोनमध्ये 200MP Rear Camera दिला जाऊ शकतो.
  • Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट मिळू शकतो.

इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी शक्तीप्रदर्शन करत ‘All-Round FastCharge’ टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी 260W wired आणि 110W wireless fast charging ला सपोर्ट करते. आता बातमी आली आहे की ही टेक्नॉलॉजी असलेला Infinix GT 10 Pro हा ब्रँडचा पहिला मोबाइल फोन बनू शकतो. या मोबाइल फोनचे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात 200MP Camera चा देखील समावेश आहे.

Infinix Zero Ultra 5G

Infinix GT 10 Pro ची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार इनफिनिक्सनं अलीकडेच प्रदर्शित केलेली 260वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी कंपनी जीटी 10 प्रो स्मार्टफोनच्या माध्यमातून मार्केटमध्ये सादर करू शकते. टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर केलेल्या डिटेल्सनुसार वेबसाइटनं सांगितलं आहे की हा इनफिनिक्स फोन यावर्षी तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलाई-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा

इनफिनिक्स जीटी 10 प्रो चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 260W Fast Charging
  • 200MP Rear Camera
  • 12GB RAM + 256GB ROM
  • MediaTek Dimensity 9000
Infinix Zero Ultra 5G

Infinix GT 10 Pro चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार या फोनची सर्वात मोठी यूएसपी 260वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असू शकते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4,400एमएएचची बॅटरी फक्त 8 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यापर्यंत फुल चार्ज केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार इनफिनिक्स जीटी 10 प्रो स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.

इनफिनिक्स जीटी 10 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो जो रियर कॅमेरा सेटअपमध्ये मिळेल. रिपोर्टनुसार ही लेन्स ओआयएस फीचरसह येऊ शकते. तसेच आगामी इनफिनिक्स मोबाइल 6.8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. आशा आहे की ही स्क्रीन पंच-होल स्टाईल असेल. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा

Infinix Zero 20

Infinix GT 10 Pro मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. हा 5जी चिपसेट 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला आहे. जीटी 10 प्रो स्मार्टफोन 12 जीबी रॅमसह मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मिळू शकते. कंपनीनं स्मार्टफोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेले स्पेसिफिकेशन्स सध्या फक्त लीक म्हणता येतील.

The post 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-could-launch-with-260w-fast-charging-and-200mp-camera/feed/ 0