रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा

Highlights

  • रियलमीने GT Neo 5 SE चा लाँच ऑफिशियली कन्फर्म झाला आहे.
  • हा डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • रिपोर्टनुसार फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर असू शकतो.

गेले कित्येक दिवस Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनबद्दल लीक व माहिती समोर येत होती. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्स सोबतच गीकबेंच लिस्टिंगवर देखील दिसला आहे. त्याचबरोबर आता कंपनीनं अधिकृतपणे या हँडसेटचा लाँच कन्फर्म केला आहे. रियलमीनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रियलमी जीटी नियो 5 एसई स्मार्टफोनचा लाँच कन्फर्म केला आहे. परंतु कंपनीनं कोणतीही लाँच डेट सांगितली नाही. आशा आहे की हा डिवाइस या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरवातीला लाँच होऊ शकतो.

रियलमी जीटी नियो 5 एसई कन्फर्म

पुढील प्रोमोशनल पोस्टरमध्ये दिसत आहे की (रियलमीनं वीबोवर पोस्ट केलेलं पोस्टर), कंपनी रियलमी जीटी नियो 5 एसईचा चिनी बाजारातील लाँच टीज करत आहे. ब्रँडनं अखेरीस डिवाइसच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, जे नाव आतापर्यंत अफवांमध्ये येतं होतं. दुर्दैवाने पोस्टरमध्ये डिवाइस बाबत आणखी माहिती मिळाली नाही. तसेच याची डिजाइन आणि फीचर्स देखील अधिकृतपणे समोर आलेले नाहीत.

रियलमी जीटी नियो 5 एसईचे लीक स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 SE मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 1.5K AMOLED पॅनल दिला जाऊ शकतो. तसेच , पावरसाठी डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. जोडीला 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

सॉफ्टवेयर पाहता, हा डिवाइस नवीन अँड्रॉइड 13-आधारित RealmeUI 4.0 स्किनवर चालू शकतो. डिवाइसची बॅटरी पाहता, रियलमी जीटी नियो 5 एसई मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच यात 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा सेल्फी शूटर असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here