260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा

Highlights

  • इनफिनिक्स जीटी 10 प्रो 260W चार्जिंगसह लाँच होऊ शकतो.
  • या मोबाइल फोनमध्ये 200MP Rear Camera दिला जाऊ शकतो.
  • Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट मिळू शकतो.

इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी शक्तीप्रदर्शन करत ‘All-Round FastCharge’ टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी 260W wired आणि 110W wireless fast charging ला सपोर्ट करते. आता बातमी आली आहे की ही टेक्नॉलॉजी असलेला Infinix GT 10 Pro हा ब्रँडचा पहिला मोबाइल फोन बनू शकतो. या मोबाइल फोनचे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात 200MP Camera चा देखील समावेश आहे.

Infinix Zero Ultra 5G

Infinix GT 10 Pro ची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार इनफिनिक्सनं अलीकडेच प्रदर्शित केलेली 260वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी कंपनी जीटी 10 प्रो स्मार्टफोनच्या माध्यमातून मार्केटमध्ये सादर करू शकते. टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर केलेल्या डिटेल्सनुसार वेबसाइटनं सांगितलं आहे की हा इनफिनिक्स फोन यावर्षी तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलाई-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा

इनफिनिक्स जीटी 10 प्रो चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 260W Fast Charging
  • 200MP Rear Camera
  • 12GB RAM + 256GB ROM
  • MediaTek Dimensity 9000
Infinix Zero Ultra 5G

Infinix GT 10 Pro चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार या फोनची सर्वात मोठी यूएसपी 260वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असू शकते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4,400एमएएचची बॅटरी फक्त 8 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यापर्यंत फुल चार्ज केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार इनफिनिक्स जीटी 10 प्रो स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.

इनफिनिक्स जीटी 10 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो जो रियर कॅमेरा सेटअपमध्ये मिळेल. रिपोर्टनुसार ही लेन्स ओआयएस फीचरसह येऊ शकते. तसेच आगामी इनफिनिक्स मोबाइल 6.8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. आशा आहे की ही स्क्रीन पंच-होल स्टाईल असेल. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा

Infinix Zero 20

Infinix GT 10 Pro मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. हा 5जी चिपसेट 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला आहे. जीटी 10 प्रो स्मार्टफोन 12 जीबी रॅमसह मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मिळू शकते. कंपनीनं स्मार्टफोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेले स्पेसिफिकेशन्स सध्या फक्त लीक म्हणता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here