26GB RAM सह येऊ शकतो Infinix GT 10 Pro 5G, ह्यात असेल ट्रान्सपरंट पॅनल आणि LED लाइट

Highlights

  • INFINIX GT 10 Pro 5G फोनचं नवीन लीक आलं आहे.
  • भारतात याची एंट्री सप्टेंबरमध्ये होऊ शकते.
  • GT सीरीज जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये सादर होऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून INFINIX च्या ट्रान्सपरंट बॅक पॅनल असलेल्या फोनची चर्चा जोरदार सुरु आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपली नवीन जीटी सीरीज घेऊन येत आहे. ह्यात INFINIX GT 10 Pro आणि INFINIX GT 10 Pro + स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डिवाइसचे एक मोठा लीक समोर आला आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत.

Infinix GT 10 Pro 5G (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर पारस गुगलानीनं INFINIX GT 10 Pro 5G फोनचा नवीन लीक सादर केला आहे.
  • सर्वात मोठी बातमी म्हणजे नवीन INFINIX GT 10 Pro 5G जगातील पहिला 26 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनू शकतो.
  • लाँच टाइम लाइन पाहता हा डिवाइस जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • भारतात ह्याची एंट्री सप्टेंबरमध्ये केली जाऊ शकते.
  • असं देखील सांगण्यात आलं आहे की GT सीरीजचा प्रो प्लस व्हेरिएंट भारतात सेलसाठी उपलब्ध होणार नाही.

Infinix 10 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : टिपस्टरनुसार ह्या डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनचा बॅक पॅनल एलईडी लाइटसह येईल. ज्याची तुलना नथिंग फोन 2 शी केली जात आहे.
  • प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्ससाठी कंपनी ह्यात Dimensity 8050 चिपसेट देऊ शकते.
  • स्टोरेज : हा जगातील पहिला 26 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनू शकतो. ह्याचे अनेक स्टोरेज ऑप्शन येऊ शकतात. जोडीला 256GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 100 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सलच्या दोन कॅमेरा लेन्स दिल्या जाऊ शकतात.
  • बॅटरी : हा फोन 7000mAh बॅटरीसह 160W आणि 260W फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह येण्याची शक्यता आहे.
  • ओएस : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.
  • अन्य : ह्यात लेटेस्ट वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G कनेक्टिव्हिटी असे फीचर्स दिले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here