Infinix Hot 10 Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 19 Apr 2021 11:29:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-price-in-india-revealed-check-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-price-in-india-revealed-check-specifications-and-features/#respond Mon, 19 Apr 2021 11:29:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10620 करमणुकीसाठी Infinix Hot 10 Play अतिशय योग्य स्मार्टफोन ठरू शकतो.

The post Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने भारतात आपला बजेट स्मार्टफोन Infinix Hot 10 Play लॉन्च केला आहे. Infinix Hot 10 Play चा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. Infinix Hot 10 Play स्मार्टफोन कंपनीने मोठी बॅटरी आणि मोठ्या डिस्प्ले साइजसह सादर केला आहे. Infinix चा हा स्मार्टफोन अश्या युजर्सना लक्षात ठेऊन सादर केला गेला आहे ज्यांना फोनमध्ये व्हिडीओ बघायला आवडते. त्यामुळे करमणुकीसाठी Infinix Hot 10 Play अतिशय योग्य स्मार्टफोन ठरू शकतो. इथे आम्ही तुम्हाला Infinix Hot 10 Play स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची संपूर्ण माहिती देत आहोत. (Infinix Hot 10 Play price in India revealed check specifications and features)

Infinix Hot 10 Play : डिस्प्ले आणि डिजाइन

Infinix Hot 10 Play स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन HD+ आणि यात फ्रंट कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. फोनमध्ये बॉटम चिन साधारण आकारापेक्षा थोडी जाड आहे जी बजेट स्मार्टफोनमध्ये दिसते. बाकी तीन कडा सामान्य आहेत. डिजाइन पाहता मोठा डिस्प्ले असल्यामुळे हा फोन थोडा मोठा आहे. फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटपासून बनला आहे, ज्यात टेक्चर मिळतो. फोनच्या मागे डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर पण मिळतो.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरीसह OPPO घेऊन येत आहे लो बजेट असलेला फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी!

Infinix Hot 10 Play : परफॉर्मन्स

Infinix Hot 10 Play स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केला गेला आहे. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Helio G35 चिपसेटसह सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये पावरफुल 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Infinix Hot 10 Play स्मार्टफोन Android 10 वर लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M42 5G फोन 28 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर

Infinix Hot 10 Play : कॅमेरा

Infinix Hot 10 Play स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या मागे डुअल रियर कॅमेऱ्यासह LED फ्लॅश दिला आहे. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये प्राइमेरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे, सोबत डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आहे.

Infinix Hot 10 Play : किंमत आणि सेल ऑफर्स

Infinix Hot 10 Play स्मार्टफोनचा सिंगल वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन भारतात 8,499 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन चार कलर ऑप्शन – ब्लू, ग्रीन, ब्लॅक आणि पर्पलमध्ये उपलब्ध करवण्यात आला आहे.

Infinix Hot 10 Play स्मार्टफोनचा पहिला सेल 26 एप्रिलला होणार आहे. ऑफर पाहता या स्मार्टफोनसह जियो युजर्सना 349 रुपयांच्या रिचार्जवर 4000 रुपयांचे बेनिफिट मिळतील, ज्यात 50 रुपयांचे 40 कॅशबॅक वाउचर आणि 2000 रुपयांचे पार्टनर ब्रँड कुपन आहेत.

The post Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-price-in-india-revealed-check-specifications-and-features/feed/ 0
19 एप्रिलला भारतात लॉन्च होईल स्वस्त Infinix Hot 10 Play स्मार्टफोन, यात मिळू शकते 6,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-launching-in-india-on-19-april-under-10k-budget-price/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-launching-in-india-on-19-april-under-10k-budget-price/#respond Thu, 01 Apr 2021 13:05:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10473 इनफिनिक्स हॉट 10 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो.

The post 19 एप्रिलला भारतात लॉन्च होईल स्वस्त Infinix Hot 10 Play स्मार्टफोन, यात मिळू शकते 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेला टेक ब्रँड Infinix लवकरच भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 19 एप्रिलला इनफिनिक्स भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जो Infinix Hot 10 Play नावाने बाजारात येईल. ब्रँडच्या इतर मोबाईल्स प्रमाणे इनफिनिक्स हॉट 10 प्ले पण एक लो बजेट डिवायस असेल जो 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये लॉन्च केला जाईल. (Infinix Hot 10 Play Launching in india on 19 april under 10k budget Price)

Infinix Hot 10 Play ची माहिती देत इनफिनिक्स इंडियाने सांगितले आहे कि कंपनी आपला हा नवीन डिवायस येत्या 19 एप्रिलला भारतात लॉन्च करेल. हॉंगकॉंग बेस्ड ब्रँडने दावा केला आहे कि हा मोबाईल 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बाजारात येईल. लॉन्च डेटची माहिती देण्यासोबत इनफिनिक्सने सांगितले आहे कि हॉट 10 प्ले स्मार्टफोन भारतात चार कलर वेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल ज्यात Morandi Green, 7 degree Purple, Aegean Blue आणि Obsidian Black चा समावेश असेल.

Infinix Hot 10 Play

इनफिनिक्स हॉट 10 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा फोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Infinix Hot 10 Play च्या बॅक पॅनलवर एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी पावर मॅरेथॉन टेक्नोलॉजीसह येते.

हे देखील वाचा : Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन

Infinix Hot 10 Play च्या इंडियन मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स कशे असतील याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आली नाही पण आशा आहे कि फोनचा इंटरनॅशनल मॉडेलच भारतीय बाजारात येईल. देशात हा फोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. इनफिनिक्स हॉट 10 प्ले च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 19 एप्रिलची वाट बघावी लागेल.

The post 19 एप्रिलला भारतात लॉन्च होईल स्वस्त Infinix Hot 10 Play स्मार्टफोन, यात मिळू शकते 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-launching-in-india-on-19-april-under-10k-budget-price/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-launched-with-6000mah-battery-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-launched-with-6000mah-battery-specs-price/#respond Fri, 22 Jan 2021 09:18:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9747 Infinix Hot 10 Play एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक ब्रँड इनफिनिक्सने गेल्या वर्षी आपल्या ‘हाॅट सीरीज’ मध्ये दोन स्मार्टफोन Infinix Hot 10 आणि Infinix Hot 10 Lite लाॅन्च केले होते. हे दोन्ही फोन लो बजेट मध्ये आले होते, जे कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. आता या सीरीजचा विस्तार करत इनफिनिक्सने अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 Play पण बाजारात आणला आहे. इनफिनिक्स हाॅट 10 प्ले सध्या फिलिपिंस मध्ये लाॅन्च केला आहे जो येत्या काळात भारतासह जगातील इतर बाजारांमध्ये पण येईल. फिलिपिंस मध्ये या फोनची किंमत PHP 4,290 म्हणजे जवळपास 6,500 रुपये आहे.

Infinix Hot 10 Play

इनफिनिक्स हाॅट 10 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर लाॅन्च झाला आहे जो 720 X 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि एक वाॅटरड्राॅप नाॅच स्क्रीन आहे ज्यात तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘वी’ शेप नाॅच देण्यात आली आहे. इंटरनॅशनल मार्केट मध्ये हा फोन Aegean Blue आणि Morandi Green कलर मध्ये लाॅन्च केला गेला आहे.

Infinix Hot 10 Play

Infinix Hot 10 Play अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन वर लाॅन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 सह चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे या फोन मध्ये गुगलचे सर्व ‘गो’ ऍप्स वापरता येतील जे कमी रॅम वर पण फास्ट काम करेल तसेच बॅटरी आणि इंटरनेटचा वापर कमी करतील. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट आहे. हा फोन 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा : फक्त 5,999 रुपयांमध्ये विकला जाईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला स्वस्त Infinix Smart HD 2021 फोन

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हाॅट 10 प्ले स्मार्टफोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश उलट्या ‘L’ च्या आकारात आहेत. हा फोन 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्यासह सेकेंडरी डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Hot 10 Play एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हाॅट 10 प्ले मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार एका फुल चार्ज मध्ये 55 दिवसांपेक्षा जास्त स्टँडबाय टाईम देऊ शकते.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-launched-with-6000mah-battery-specs-price/feed/ 0
Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-listed-on-fcc-2gb-ram-32-gb-storage-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-listed-on-fcc-2gb-ram-32-gb-storage-leaked/#respond Tue, 15 Dec 2020 07:48:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9308 Infinix Hot 10 Play अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे. तिथे हा फोन Infinix X688C मॉडेल नंबर सह सर्टिफाइड झाला आहे.

The post Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्या महिन्यात भारतात आपल्या ‘हॉट 10’ सीरीज अंतगर्त Infinix Hot 10 लॉन्च केला होता जो फक्त 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सीरीजचा अजून एक फोन Infinix Hot 10 Lite नायजेरिया व इतर देशांमध्ये आणला आहे. आता बातमी येत आहे कि इनफिनिक्स कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे जो Infinix Hot 10 Play नावाने सादर केला जाईल.

Infinix Hot 10 Play अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे. तिथे हा फोन Infinix X688C मॉडेल नंबर सह सर्टिफाइड झाला आहे. बोलले जात आहे कि हॉट 10 प्ले सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. लिस्टिंगनुसार Infinix Hot 10 Play 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाईल आणि फोटोग्राफीसाठी पण फोनच्या बॅक पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर दिले जातील. तसेच हा फोन 10वॉट चार्जर सह बाजारात येणार असल्याचे एफसीसी वर समोर आले आहे.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे तसेच या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे.

हे देखील वाचा : लॉन्च झाला नोकियाचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन Nokia C1 Plus, बघा याचे शानदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. नवीन वेरिएंटच्या एंट्री नंतर हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर विकत घेता येईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआय लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हि बॅटरी पावर मॅरॅथॉन टेक्नोलॉजी सह येते जी बॅटरी लाइफला 25 टक्के पर्यंत वाढवते. फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

इनफिनिक्स हॉट 10 व्हिडीओ

The post Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-listed-on-fcc-2gb-ram-32-gb-storage-leaked/feed/ 0