Samsung Galaxy M42 5G फोन 28 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर

Samsung Galaxy M42 दीर्घकाळ चर्चेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समध्ये या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स व फीचर्स समोर आले आहेत. फोनच्या पावरचा अंदाज जवळपास लागला आहे आणि लोकांना प्रतीक्षा हे हि या फोनच्या भारतीय बाजारती लॉन्चची. आजच्या सॅमसंगच्या घोषणेनंतर हि प्रतीक्षा संपेल. कंपनीने घोषणा केली आहे कि Samsung Galaxy M42 5G फोन येत्या 28 एप्रिलला भारतात लॉन्च केला जाईल. (Samsung Galaxy M42 5G phone India launch on 28 April with Snapdragon 750G SOC)

Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्चची माहिती शॉपिंग साइट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. अमेझॉनवर गॅलेक्सी एम42 चे प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आले आहेत ज्यावर लॉन्च डेट सोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि सॅमसंग कंपनी येत्या 28 एप्रिलला भारतात लॉन्च ईवेंट आयोजित करणार आहे आणि ईवेंटच्या मंचावरून Samsung Galaxy M42 5G फोन भारतात लॉन्च केला जाईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी च्या लॉन्चची माहिती देण्यासोबतच अमेझॉन प्रोडक्ट पेजवर खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटसह येईल. विशेष म्हणजे हा चिपसेट 5जी बॅंडला सपोर्ट करतो. तसेच हा स्मार्टफोन Samsung Pay आणि Secured by Knox सारख्या अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येईल. सॅमसंगने असे पण सांगितले आहे कि Galaxy M42 5G फोन 6GB आणि 8GB RAM वेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अशी असेल किंमत

Samsung Galaxy M42 5G फोनबद्दल मागे न्यूज एजन्सी IANS ने लॉन्चपूर्वीच या फोनच्या किंमतीचा खुलासा केला होता. एजन्सीने इंडस्ट्री सोर्सच्या आधारावर रिपोर्ट प्रकाशित केला होता ज्यात फोनच्या किंमतचा उल्लेख केला गेला होता. या रिपोर्टमध्ये दावा केला गेला होता कि सॅमसंग आपला हा फोन 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च करेल आणि हा फोन एप्रिलच्या शेवटी बाजारात येईल.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरीसह OPPO घेऊन येत आहे लो बजेट असलेला फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी!

हि माहिती आली समोर

बोलेल जात आहे की सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची HD+ Super AMOLED स्क्रीन मिळेल. फोनमध्ये Infinity-U waterdrop नॉच दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन Android OS 11 वर काम करेल आणि यात 6 GB RAM मेमरीसह 128 GB ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर व्यतिरिक्त 8 MP ची अल्ट्रा—वाइड लेंस, 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 5 MP ची मॅक्रो लेंस दिला जाऊ शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 5G सह 4G VOLTE सपोर्ट, डुअल बॅंड वाय-फाय, USP Type-C पोर्ट मिळेल. Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्च डेटसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here