Infinix S5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 06 Mar 2020 12:51:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला फोन, फक्त 9999 रुपयांमध्ये मिळेल 4000mAh बॅटरी, 4GB RAM आणि 48MP ट्रिपल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-launched-cheapest-pop-up-camera-phone-48mp-triple-rear-4000mah-battery-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-launched-cheapest-pop-up-camera-phone-48mp-triple-rear-4000mah-battery-specs-price-sale-offer/#respond Fri, 06 Mar 2020 12:51:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6740 Infinix S5 Pro इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण बनला आहे.

The post लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला फोन, फक्त 9999 रुपयांमध्ये मिळेल 4000mAh बॅटरी, 4GB RAM आणि 48MP ट्रिपल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चे नाव त्या टेक ब्रँडस मध्ये येते जे आपले स्मार्टफोन्स आक्रमक किंमती सह सादर करतात. इनफिनिक्सचे फोन कमी किंमतीत येतात तसेच हा ब्रँड आपल्या डिवाईसेजच्या माध्यमातून एखादा नवीन रेकॉर्ड पण बनवते. आज दीर्घ प्रतीक्षेनंतर इनफिनिक्सने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Infinix S5 Pro सादर केला आहे. हा स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे आणि यामुळे Infinix S5 Pro इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण बनला आहे.

लुक व​ डिजाईन

सर्वात आधी Infinix S5 Pro च्या लुक बद्दल बोलायचे तर पॉप-अप कॅमेरा या डिवाईसची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन बेजल लेस डिजाईन वर बनवलेला आहे जो फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या वरच्या पॅनल वर उजवीकडे पॉप अप कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फीची कमांड दिल्यावर बाहेर येतो. फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. इनफिनिक्स एस5 प्रो 3D Glass फिनिश वर बनवलेला आहे. तसेच Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

फोनचा रियर कॅमेरा सेटअप उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. रियर कॅमेरा सेटअप पॉप-अप कॅमेर्‍याच्या खाली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि याच्या खाली Infinix ची ब्रँडिंग आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. Infinix S5 Pro च्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह स्पीकर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91 टक्के आहे. कंपनीने हा फोन 6.53 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ फुलव्यू डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. इनफिनिक्स ने आपला फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो एक्सओएस 6.0 सह चालतो.

इनफिनिक्स एस5 प्रो मध्ये प्रोसेसिंग साठी 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड 64बिट आक्टाकोर प्रोसेसर सह 12नॅनोमीटर टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात Infinix S5 Pro 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स एस5 प्रो ची सर्वात मोठी ओळख याचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या एआई पॉप-अप कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. रियर कॅमेरा सेटअप पाहता Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि थर्ड लो लाईट सेंसरला सपोर्ट करतो. इनफिनिक्स एस5 प्रो चा रियर कॅमेरा गूगल लेंस इम्बेडेड आहे.

Infinix S5 Pro रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Infinix S5 Pro मध्ये एआई स्मार्ट पावर सेविंग फीचर सह 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Infinix S5 Pro कंपनीने 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन येत्या 13 मार्च पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. Infinix S5 Pro Forest Green आणि Voilet कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला फोन, फक्त 9999 रुपयांमध्ये मिळेल 4000mAh बॅटरी, 4GB RAM आणि 48MP ट्रिपल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-launched-cheapest-pop-up-camera-phone-48mp-triple-rear-4000mah-battery-specs-price-sale-offer/feed/ 0
पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्वस्त फोन Infinix S5 Pro येत आहे भारतात, 6 मार्चला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-launch-india-6-march-pop-up-selfie-camera-price-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-launch-india-6-march-pop-up-selfie-camera-price-sale-flipkart/#respond Tue, 03 Mar 2020 11:49:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6721 Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून पदार्पण करेल.

The post पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्वस्त फोन Infinix S5 Pro येत आहे भारतात, 6 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix भारतात आपला स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro स्मार्टफोन 6 मार्चला लॉन्च करेल. कंपनीने याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर दिली आहे. ट्विटर वर कंपनीने 15 सेकंदांचा एक टीजर प्रकाशित केला आहे, ज्यात फोनच्या डिजाइन आणि कॅमेऱ्याची माहिती देण्यात आली आहे. वीडियो मध्ये फोनच्या नावावर अधिकृतपणे शिकामोर्तब करण्यात आला आहे.

याआधी 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून बातमी मिळवली होती कि Infinix चा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. जर असे झाले तर हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन बनेल. इनफिनिक्सच्या ट्विटनुसार Infinix S5 Pro भारतात 6 मार्चला लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा असेल. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. ट्विट मध्ये अशी माहिती समोर आली आहे कि Infinix S5 Pro फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. तसेच डिवाइस ग्रीन कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाईल.

डिजाइन बद्दल बोलायचे तर या डिवाइसच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर आणि वर्टिकल शेप मध्ये रियर कॅमेरा असेल. तसेच फ्रंटला कोणतीही नॉच किंवा पंच होल कटआउट नसेल. या डिवाइस मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल. याआधी आलेल्या रिपोर्टनुसार समोर आले होते कि आगामी डिवाइस मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स एस5 प्रो या कंपनीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून पदार्पण करेल.

Infinix S5 Lite

इनफिनिक्स आपले प्रोडक्ट्सच्या किंमती आक्रमकपणे सादर करते. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीतच लॉन्च केले जातात. इनफिनिक्सच्या लेटेस्ट स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर Infinix S5 Lite पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Infinix S5 Lite मध्ये 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्वस्त फोन Infinix S5 Pro येत आहे भारतात, 6 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-launch-india-6-march-pop-up-selfie-camera-price-sale-flipkart/feed/ 0
4000एमएएच बॅटरी आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह 6 मार्चला लॉन्च होईल Infinix S5 Pro https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-on-6-march-4000mah-battery-pop-up-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-on-6-march-4000mah-battery-pop-up-selfie-camera/#respond Tue, 11 Feb 2020 19:16:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6565 Infinix S5 Pro आधी 18 फेब्रुवारीला लॉन्च केला जाणार होता पण चीन मधील कोरोना वायरस मुळे ब्रँडला लॉन्च डेट बदलावी लागली.

The post 4000एमएएच बॅटरी आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह 6 मार्चला लॉन्च होईल Infinix S5 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्या आठवड्यात सांगितले होते कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्या सह येईल. इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix S5 Pro असेल जो लो बजेट मध्ये लॉन्च होईल. Infinix S5 Pro बद्दल 91मोबाईल्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत सांगितले होते कि इनफिनिक्स पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल आणि या डिवाईसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. आज Infinix ने अधिकृतपणे S5 Pro ची लॉन्च डेट पण सांगितली आहे.

Infinix ने आपल्या अधिकृत ऑफिशियल ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून Infinix S5 Pro ची लॉन्च डेट सांगितली आहे. ट्वीटच्या माध्यमातून Infinix ने सांगितले आहे कि ब्रँडचा आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 6 मार्चला भारतात लॉच होईल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro आधी 18 फेब्रुवारीला लॉन्च केला जाणार होता पण चीन मधील कोरोना वायरस मुळे ब्रँडला लॉन्च डेट बदलावी लागली.

Infinix S5 Pro 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. त्यामुळे आशा आहे कि हा फोन भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. कंपनीने ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि इनफिनिक्स एस5 प्रो फ्लिपकार्ट यूनिक डिवाईस असेल आणि फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फक्त फ्लिपकार्ट वर होईल.

असा असेल लुक

Infinix S5 Pro चा लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट मिळेल. फोनचा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनल वर उजवीकडे असेल जो सेल्फीची कमांड देताच बाहेर येईल आणि फोटो क्लिक करेल. Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या खाली Infinix ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि स्पीकर पण देण्यात आला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन्स कंपनीने अजून ऑफिशियल केले नाहीत पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इनफिनिक्स हा स्मार्टफोन 4,000एमएएच च्या मोठ्या पावर असलेल्या बॅटरी सह लॉन्च करेल जो AI smart power management टेक्नॉलॉजी सह येईल. त्याचबरोबर हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro लॉन्च झाल्यानंतर Tecno ब्रँड पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड Transsion Holdings Limited चे आहेत.

The post 4000एमएएच बॅटरी आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह 6 मार्चला लॉन्च होईल Infinix S5 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-on-6-march-4000mah-battery-pop-up-selfie-camera/feed/ 0
Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-on-14-february-valentine-day-in-india-under-10k-cheapest-smartphone-in-pop-up-camera-segment/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-on-14-february-valentine-day-in-india-under-10k-cheapest-smartphone-in-pop-up-camera-segment/#respond Thu, 30 Jan 2020 13:04:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6444 हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल ज्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनेल.

The post Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चे नाव त्या निवडक ब्रँडस मध्ये येते जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन आणतात. इनफिनिक्स तीच कंपनी आहे जिने भारतातील सर्वात स्वस्त 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Infinix S4 आणि भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त 6 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन Hot 7 Pro लॉन्च केला होता. इनफिनिक्स ने आपली ही परंपरा कायम ठेवत भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. ब्रँडच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix S5 Pro असेल आणि 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार हा डिवाईस येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येईल.

Infinix ने अजूनतरी Infinix S5 Pro ची लॉन्च डेट किंवा या फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत पण 91मोबाईल्सला सूत्रांकडून मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार कंपनीचा हा शानदार स्मार्टफोन येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येईल. Infinix S5 Pro संबंधित खास बाब अशी की हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल ज्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनेल.

असे असतिल स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन्स कंपनीने अजून ऑफिशियल केले नाहीत पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इनफिनिक्स हा स्मार्टफोन 4,000एमएएच च्या मोठ्या पावर असलेल्या बॅटरी सह लॉन्च करेल जो AI smart power management टेक्नॉलॉजी सह येईल. त्याचबरोबर हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro लॉन्च झाल्यानंतर Tecno ब्रँड पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड Transsion Holdings Limited चे आहेत.

अशी असेल डिजाईन

Infinix S5 Pro चा लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट मिळेल. फोनचा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनल वर उजवीकडे असेल जो सेल्फीची कमांड देताच बाहेर येईल आणि फोटो क्लिक करेल. Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या खाली Infinix ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि स्पीकर पण देण्यात आला आहे.

Honor 9X ला मिळेल टक्कर

सूत्रांनुसार Infinix S5 Pro भारतात लॉन्च करून कंपनी मोबाईल यूजर्सना सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन उपलब्ध करवून देईल. तसेच या डिवाईस च्या माध्यमातून Infinix ला अलिकडेच भारतात लॉन्च झालेल्या पॉप-अप कॅमेरा असलेल्या ऑनर स्मार्टफोन Honor 9X ला टक्कर द्यायची आहे. Honor 9X इंडियन मार्केट मध्ये 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-on-14-february-valentine-day-in-india-under-10k-cheapest-smartphone-in-pop-up-camera-segment/feed/ 0
Infinix S5 Pro असेल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-with-pop-up-selfie-camera-cheapest-smartphone-in-segment/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-with-pop-up-selfie-camera-cheapest-smartphone-in-segment/#respond Tue, 21 Jan 2020 11:40:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6336 Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून एंट्री घेईल.

The post Infinix S5 Pro असेल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix बाबत अलीकडेच खुलासा झाला होता कि हा टेक ब्रँड भारतात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे आणि नवीन सीरीजच्या व्यतिरिक्त कंपनी भारतीय बाजारात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणेल. 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून बातमी मिळवली होती कि Infinixचा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. तसेच आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाचा पण खुलासा झाला आहे. रिपोर्ट मधून समोर आले आहे कि इनफिनिक्सचा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात Infinix S5 Pro नावाने लॉन्च होईल.

Infinix S5 Pro च्या नावाची माहिती द मोबाईल इंडियन वेबसाइटच्या बातमीमधून मिळाली आहे. या वेबसाइटने सूत्रांच्या आधारावर लिहिले आहे कि इनफिनिक्स आपला आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा मोबाईल Infinix S5 Pro नावाने लॉन्च करेल. रिपोर्टनुसार हा आगामी डिवाईस मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स एस5 प्रो या कंपनीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. 91मोबाईल्सने सांगितले होते कि हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. अर्थात् Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून एंट्री घेईल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार Infinix S5 Pro पुढल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल. तसेच Infinix के बाद Tecno पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड चीनी कंपनी Transsion Holdings Limited चे आहेत. मीडिया रिपोर्टनुसार Infinix एक नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात पण करेल ज्या अंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील. हे फोन लो बजेट मधेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Infinix S5 Lite

इनफिनिक्स आपले प्रोडक्ट्सच्या किंमती आक्रमकपणे सादर करते. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीतच लॉन्च केले जातात. इनफिनिक्सच्या लेटेस्ट स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर Infinix S5 Lite पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Infinix S5 Lite मध्ये 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Infinix S5 Pro असेल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-with-pop-up-selfie-camera-cheapest-smartphone-in-segment/feed/ 0