4000एमएएच बॅटरी आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह 6 मार्चला लॉन्च होईल Infinix S5 Pro

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

Infinix ने गेल्या आठवड्यात सांगितले होते कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्या सह येईल. इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix S5 Pro असेल जो लो बजेट मध्ये लॉन्च होईल. Infinix S5 Pro बद्दल 91मोबाईल्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत सांगितले होते कि इनफिनिक्स पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल आणि या डिवाईसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. आज Infinix ने अधिकृतपणे S5 Pro ची लॉन्च डेट पण सांगितली आहे.

Infinix ने आपल्या अधिकृत ऑफिशियल ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून Infinix S5 Pro ची लॉन्च डेट सांगितली आहे. ट्वीटच्या माध्यमातून Infinix ने सांगितले आहे कि ब्रँडचा आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 6 मार्चला भारतात लॉच होईल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro आधी 18 फेब्रुवारीला लॉन्च केला जाणार होता पण चीन मधील कोरोना वायरस मुळे ब्रँडला लॉन्च डेट बदलावी लागली.

Infinix S5 Pro 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. त्यामुळे आशा आहे कि हा फोन भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. कंपनीने ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि इनफिनिक्स एस5 प्रो फ्लिपकार्ट यूनिक डिवाईस असेल आणि फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फक्त फ्लिपकार्ट वर होईल.

असा असेल लुक

Infinix S5 Pro चा लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट मिळेल. फोनचा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनल वर उजवीकडे असेल जो सेल्फीची कमांड देताच बाहेर येईल आणि फोटो क्लिक करेल. Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या खाली Infinix ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि स्पीकर पण देण्यात आला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन्स कंपनीने अजून ऑफिशियल केले नाहीत पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इनफिनिक्स हा स्मार्टफोन 4,000एमएएच च्या मोठ्या पावर असलेल्या बॅटरी सह लॉन्च करेल जो AI smart power management टेक्नॉलॉजी सह येईल. त्याचबरोबर हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro लॉन्च झाल्यानंतर Tecno ब्रँड पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड Transsion Holdings Limited चे आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here