पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्वस्त फोन Infinix S5 Pro येत आहे भारतात, 6 मार्चला होईल लॉन्च

Infinix भारतात आपला स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro स्मार्टफोन 6 मार्चला लॉन्च करेल. कंपनीने याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर दिली आहे. ट्विटर वर कंपनीने 15 सेकंदांचा एक टीजर प्रकाशित केला आहे, ज्यात फोनच्या डिजाइन आणि कॅमेऱ्याची माहिती देण्यात आली आहे. वीडियो मध्ये फोनच्या नावावर अधिकृतपणे शिकामोर्तब करण्यात आला आहे.

याआधी 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून बातमी मिळवली होती कि Infinix चा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. जर असे झाले तर हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन बनेल. इनफिनिक्सच्या ट्विटनुसार Infinix S5 Pro भारतात 6 मार्चला लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा असेल. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. ट्विट मध्ये अशी माहिती समोर आली आहे कि Infinix S5 Pro फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. तसेच डिवाइस ग्रीन कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाईल.

डिजाइन बद्दल बोलायचे तर या डिवाइसच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर आणि वर्टिकल शेप मध्ये रियर कॅमेरा असेल. तसेच फ्रंटला कोणतीही नॉच किंवा पंच होल कटआउट नसेल. या डिवाइस मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल. याआधी आलेल्या रिपोर्टनुसार समोर आले होते कि आगामी डिवाइस मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स एस5 प्रो या कंपनीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून पदार्पण करेल.

Infinix S5 Lite

इनफिनिक्स आपले प्रोडक्ट्सच्या किंमती आक्रमकपणे सादर करते. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीतच लॉन्च केले जातात. इनफिनिक्सच्या लेटेस्ट स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर Infinix S5 Lite पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Infinix S5 Lite मध्ये 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here