Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी

Infinix चे नाव त्या निवडक ब्रँडस मध्ये येते जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन आणतात. इनफिनिक्स तीच कंपनी आहे जिने भारतातील सर्वात स्वस्त 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Infinix S4 आणि भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त 6 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन Hot 7 Pro लॉन्च केला होता. इनफिनिक्स ने आपली ही परंपरा कायम ठेवत भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. ब्रँडच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix S5 Pro असेल आणि 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार हा डिवाईस येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येईल.

Infinix ने अजूनतरी Infinix S5 Pro ची लॉन्च डेट किंवा या फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत पण 91मोबाईल्सला सूत्रांकडून मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार कंपनीचा हा शानदार स्मार्टफोन येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येईल. Infinix S5 Pro संबंधित खास बाब अशी की हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल ज्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनेल.

असे असतिल स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन्स कंपनीने अजून ऑफिशियल केले नाहीत पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इनफिनिक्स हा स्मार्टफोन 4,000एमएएच च्या मोठ्या पावर असलेल्या बॅटरी सह लॉन्च करेल जो AI smart power management टेक्नॉलॉजी सह येईल. त्याचबरोबर हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro लॉन्च झाल्यानंतर Tecno ब्रँड पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड Transsion Holdings Limited चे आहेत.

अशी असेल डिजाईन

Infinix S5 Pro चा लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट मिळेल. फोनचा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनल वर उजवीकडे असेल जो सेल्फीची कमांड देताच बाहेर येईल आणि फोटो क्लिक करेल. Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या खाली Infinix ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि स्पीकर पण देण्यात आला आहे.

Honor 9X ला मिळेल टक्कर

सूत्रांनुसार Infinix S5 Pro भारतात लॉन्च करून कंपनी मोबाईल यूजर्सना सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन उपलब्ध करवून देईल. तसेच या डिवाईस च्या माध्यमातून Infinix ला अलिकडेच भारतात लॉन्च झालेल्या पॉप-अप कॅमेरा असलेल्या ऑनर स्मार्टफोन Honor 9X ला टक्कर द्यायची आहे. Honor 9X इंडियन मार्केट मध्ये 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here