iQOO 9T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 05 Aug 2022 06:56:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-vs-iqoo-9t-india-launch-price-specifications-feature-sale-offer-compared-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-vs-iqoo-9t-india-launch-price-specifications-feature-sale-offer-compared-in-marathi/#respond Fri, 05 Aug 2022 06:56:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12014 हा आठवत भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी शानदार आहे. तीन दिवसांत दोन तगडे फोन भारतात लाँच झाले आहेत. आधी iQOO 9T नं बाजारात पाऊल टाकले आणि त्यानंतर OnePlus 10T देखील बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 आणि हायएंड स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील एखादा शक्तिशाली स्मार्टफोन […]

The post OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हा आठवत भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी शानदार आहे. तीन दिवसांत दोन तगडे फोन भारतात लाँच झाले आहेत. आधी iQOO 9T नं बाजारात पाऊल टाकले आणि त्यानंतर OnePlus 10T देखील बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 आणि हायएंड स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील एखादा शक्तिशाली स्मार्टफोन विकत घेण्याचं नियोजन करत असाल तर आयकू 9टी तसेच वनप्लस 10टी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. आयकू 9टी आणि वनप्लस 10टी दोन्ही 49,999 रुपयांमध्ये लाँच झाले आहेत. त्यामुळे यापैकी कोणता फोन 50 हजार रुपयांच्या किंमतीला न्याय देतो ते जाणून घेऊया. पुढे आम्ही दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनवर आधारीत एक छोटीशी तुलना केली आहे ज्यामुळे तुम्हाला या फोन्सची चांगली माहिती मिळेल.

OnePlus 10T vs iQOO 9T: Display

वनप्लस 10टी स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 950निट्स ब्राईटनेस आणि 1000हर्ट्ज टच रिस्पांस रेटला सपोर्ट करते. आयकू 9टी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन डिस्प्ले एचडीआर10+ सारख्या फीचर्ससह येतो तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Processor

वनप्लस 10टी आणि आयकू 9टी दोन्ही मोबाईल फोन अँड्रॉइड ओएस 12 वर लाँच झाले आहेत ज्यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो तर आयकू मोबाईलमध्ये ओरिजन ओशियन ओएस देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 ला सपोर्ट करतात.

OnePlus 10T vs iQOO 9T: Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10टी च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स766 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. आयकू 9टी देखील ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल सॅमसंग जीएन5 प्रायमरी सेन्सरसह 13एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12एमपी पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Battery

शक्तिशाली स्पेसिफिकेशन्ससह या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देखील आहे. आयकू 9टी स्मार्टफोन 4,700एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तर दुसरीकडे वनप्लस 10टी स्मार्टफोन 4,800एमएएच बॅटरीवला सपोर्ट करतो जी 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आली आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Price

OnePlus 10T

8GB RAM + 128GB Storage = 49,999

12GB RAM + 256GB Storage = 54,999

16GB RAM + 256GB Storage = 59,999

iQOO 9T

8GB RAM + 128GB Storage = 49,999

12GB RAM + 256GB Storage = 54,999

The post OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-vs-iqoo-9t-india-launch-price-specifications-feature-sale-offer-compared-in-marathi/feed/ 0
पटकन फुल चार्ज होणारा iQOO 9T आला भारतात; वनप्लसला टक्कर देण्यासाठी दमदार प्रोसेसरसह एंट्री https://www.91mobiles.com/marathi/120w-fast-charge-smartphone-iqoo-9t-launch-check-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/120w-fast-charge-smartphone-iqoo-9t-launch-check-price-and-features/#respond Tue, 02 Aug 2022 09:35:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11913 iQOO नं भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 9T लाँच केला आहे. गेले कित्येक दिवस हा स्मार्टफोन टीज केला जात होता. अखेरीस iQOO 9T स्मार्टफोन कंपनीनं क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह लाँच केला आहे. त्याचबरोबर या दमदार आयकू स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला E5 AMOLED […]

The post पटकन फुल चार्ज होणारा iQOO 9T आला भारतात; वनप्लसला टक्कर देण्यासाठी दमदार प्रोसेसरसह एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO नं भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 9T लाँच केला आहे. गेले कित्येक दिवस हा स्मार्टफोन टीज केला जात होता. अखेरीस iQOO 9T स्मार्टफोन कंपनीनं क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह लाँच केला आहे. त्याचबरोबर या दमदार आयकू स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयकूचा दावा आहे की हा फोन फक्त 20 मिनिटांत फुल चार्ज होतो. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा दमदार स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसाठी 9 बँड्सला सपोर्ट करतो. बाजारात याच टक्कर वनप्लस, शाओमी आणि सॅमसंगच्या हायएंड हँडसेटशी होणार आहे.

iQOO 9T चे स्पेसिफिकेशन

  • 120Hz अडेप्टिव रिफ्रेश रेट असलेला E5 AMOLED डिस्प्ले
  • क्वॉलकॉम Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
  • 4700mAh बॅटरी 120W फास्ट चार्ज
  • 50MP+13MP+12MP ट्रिपल रियर कॅमेरा कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • ड्युअल स्टीरियो स्पिकर

iQOO 9T स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि हा डिस्प्ले HDR10+ ला सपोर्ट करतो. डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. की प्रोटेक्शन देण्यात आला आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आलं आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. यात 4GB अतिरिक्त रॅम व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं वाढवता येतो. फोनमध्ये Android 12 आधारित ऑरिजन ओसियन (Origin Ocean) कस्टम स्किन आहे.

iQOO 9T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Samsung GN5 चा आहे, जो गिम्बल स्टॅबिलायजेशनसह येतो. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये 13MP अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 12MP चा पोर्टेट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

iQOO 9T स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. यात स्टीरियो स्पिकर Hi-Fi ऑडियो सपोर्टसह देण्यात आले आहेत. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन मिळतात.

iQOO 9T ची किंमत आणि उपलब्धता

iQOO 9T स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 49,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर हायएंड व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत या स्मार्टफोन ICICI बँकेच्या ग्राहकांना 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच जुना आयकू स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर फोन 7000 रुपयांचा बोनस आणि नॉन आयकू स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा बोनस देण्यात येईल. हा फोन 12 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर देखील विकत घेता येईल. iQOO 9T स्मार्टफोनची विक्री 4 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल.

The post पटकन फुल चार्ज होणारा iQOO 9T आला भारतात; वनप्लसला टक्कर देण्यासाठी दमदार प्रोसेसरसह एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/120w-fast-charge-smartphone-iqoo-9t-launch-check-price-and-features/feed/ 0
125W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेल्या iQOO 9T 5G बाबत मोठा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/125w-charging-12-gb-ram-iqoo-9t-amazon-special-phone-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/125w-charging-12-gb-ram-iqoo-9t-amazon-special-phone-features-and-specifications/#respond Mon, 18 Jul 2022 06:52:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11477 गेल्या आठवड्यात बातमी आली होती की चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आपल्या आयकू 9 सीरिजचा विस्तार करणार आहे. कंपनी लवकरच आपला नवीन फोन iQOO 9T 5G भारतात लाँच करणार आहे. आता कंपनीनं या फोनसंबंधित एक ट्विट केलं आहे. त्यातून फोनच्या डिजाईनसह काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. iQOO 9T 5G स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen […]

The post 125W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेल्या iQOO 9T 5G बाबत मोठा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात बातमी आली होती की चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आपल्या आयकू 9 सीरिजचा विस्तार करणार आहे. कंपनी लवकरच आपला नवीन फोन iQOO 9T 5G भारतात लाँच करणार आहे. आता कंपनीनं या फोनसंबंधित एक ट्विट केलं आहे. त्यातून फोनच्या डिजाईनसह काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. iQOO 9T 5G स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह बाजारात येईल, तसेच फोनच्या बॅक पॅनलवर BMW थीम स्ट्रिप डिजाइन मिळेल. तसेच कंपनीनं आता या स्मार्टफोनच्या ब्लॅक कलर व्हेरिएंट शेयर केला आहे. तसेच पोस्टरमधून सांगितलं आहे की हा फोन अ‍ॅमेझॉन स्पेशल असेल, त्यामुळे अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हा हँडसेट लाँच केला जाऊ शकतो.

iQOO 9T 5G ची डिजाइन

iQOO 9T स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेमसह व्हाईट आणि ब्लॅक अशा दोन रंगात सादर होईल. दोन्ही फोन ड्युअल टोन डिजाइनसह येतील. व्हाईट व्हेरिएंट BMW थीम स्ट्रिपसह सादर करण्यात येईल. दोन्ही मॉडेलच्या वरच्या बाजूला कॅमेरा मॉड्यूल ब्लॅक कलरमधेच असेल, जो संपूर्ण वरच्या पॅनलमध्ये असेल. तसेच खालच्या बाजूला USB-C पोर्टसह तुम्हाला लाउडस्पिकर ग्रिल मिळेल. लिक्सनुसार, फोनमध्ये फोनमध्ये पंच होल डिस्प्ले मिळू शकतो. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग व्हिडीओ देखील युट्युबवर वायरल झाला होता. हे देखील वाचा: 11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात; या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत

iQOO 9T 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78-इंच, FHD+ AMOLED 120Hz रिफ्रेश रेट
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen1
  • 12GB LPDDR5 RAM
  • 256GB UFS 3.1
  • 50MP + 12MP + 2MP
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 4700mAh,125W फास्ट चार्जिंग

आगामी आयकू फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. परफॉर्मन्ससाठी कंपनी यात Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर देऊ शकते. सोबतीला 12GB LPDDR5 RAM मिळू शकतो, तसेच फोनमध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. कंपनीचा इतिहास पाहता या फोनमध्ये देखिली व्हेपर कूलिंग चेंबर मिळू शकतो त्यामुळे गेमिंग सारखे हेव्ही टास्क देखील हा फोन न गरम होता करू शकेल. हे देखील वाचा: नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात

फोटोग्राफीसाठी विवोच्या फ्लॅगशिप फोनप्रमाणे iQOO 9T 5G मध्ये तुम्हाला V1+ इमेजिंग चिप मिळेल. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात 50MP चा Samsung GN5 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल. तसेच 12MP चा वाईड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. फ्रंटला कंपनी 16MP चा सेल्फी कॅमेरा देऊ शकते. पावर बॅकअपसाठी आगामी फ्लॅगशिप आयकू फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी मिळू शकते आणि यात तुम्हाला 125 वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.

The post 125W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेल्या iQOO 9T 5G बाबत मोठा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/125w-charging-12-gb-ram-iqoo-9t-amazon-special-phone-features-and-specifications/feed/ 0