iQOO नं भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 9T लाँच केला आहे. गेले कित्येक दिवस हा स्मार्टफोन टीज केला जात होता. अखेरीस iQOO 9T स्मार्टफोन कंपनीनं क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह लाँच केला आहे. त्याचबरोबर या दमदार आयकू स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयकूचा दावा आहे की हा फोन फक्त 20 मिनिटांत फुल चार्ज होतो. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा दमदार स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसाठी 9 बँड्सला सपोर्ट करतो. बाजारात याच टक्कर वनप्लस, शाओमी आणि सॅमसंगच्या हायएंड हँडसेटशी होणार आहे.
iQOO 9T चे स्पेसिफिकेशन
- 120Hz अडेप्टिव रिफ्रेश रेट असलेला E5 AMOLED डिस्प्ले
- क्वॉलकॉम Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
- 4700mAh बॅटरी 120W फास्ट चार्ज
- 50MP+13MP+12MP ट्रिपल रियर कॅमेरा कॅमेरा
- 16MP सेल्फी कॅमेरा
- ड्युअल स्टीरियो स्पिकर
iQOO 9T स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि हा डिस्प्ले HDR10+ ला सपोर्ट करतो. डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. की प्रोटेक्शन देण्यात आला आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आलं आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. यात 4GB अतिरिक्त रॅम व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं वाढवता येतो. फोनमध्ये Android 12 आधारित ऑरिजन ओसियन (Origin Ocean) कस्टम स्किन आहे.
iQOO 9T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Samsung GN5 चा आहे, जो गिम्बल स्टॅबिलायजेशनसह येतो. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये 13MP अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 12MP चा पोर्टेट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
iQOO 9T स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. यात स्टीरियो स्पिकर Hi-Fi ऑडियो सपोर्टसह देण्यात आले आहेत. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन मिळतात.
iQOO 9T ची किंमत आणि उपलब्धता
iQOO 9T स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 49,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर हायएंड व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत या स्मार्टफोन ICICI बँकेच्या ग्राहकांना 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच जुना आयकू स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर फोन 7000 रुपयांचा बोनस आणि नॉन आयकू स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा बोनस देण्यात येईल. हा फोन 12 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर देखील विकत घेता येईल. iQOO 9T स्मार्टफोनची विक्री 4 ऑगस्टपासून अॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल.
















