टेक्नो पुन्हा एकदा भारतीय बाजारात रेडमी रियलमीला आव्हान देण्यासाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वी Tecno Spark 8P स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनी Tecno Spark 9 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं एक ट्वीट करून या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. त्यानुसार, Tecno चा हा फोन भारतात 18 जुलैला लाँच केला जाईल. हा आगामी स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर लिस्ट झाला आहे. टेक्नोच्या आगामी स्मार्टफोनच्या लँडिंग पेजवरून स्मार्टफोनच्या काही मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. टेक्नोचा हा फोन Tecno Spark 8 चा उत्तराधिकारी आहे जो गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. पुढे आम्ही Tecno Spark 9 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती दिली आहे.
अॅमेझॉन लिस्टिंग
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर Tecno Spark 9 स्मार्टफोनचं लँडिंग पेज लाईव्ह झालं आहे. हा 10,000 रुपयांमध्ये येणारा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 11GB रॅम मिळेल. टेक्नोच्या या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये जियोमॅट्रिक पॅटर्न देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात येईल, ज्यात दोन कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लॅश मिळेल. हा फोन इनफिनिटी ब्लॅक आणि स्काय मिरर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. हे देखील वाचा: नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात
Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात येईल, वॉटरड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर देण्यात येईल. यात 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, म्हणजे एकूण 11GB रॅमचा सपोर्ट मिळेल. तसेच फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळेल. या टेक्नो फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळेल. हा फोन Android 12 वर चालेल.
Tecno Spark 8P चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8P स्मार्टफोनमध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.6 इंचाचा हा FHD+ डिस्प्ले 401PPI पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. या टेक्नो मोबाईलचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.1 टक्के आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित HiOS 7.6 वर चालतो ज्यात प्रोसेसिंगसाठी ARM Cortex-A75 ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच Mediatek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन Arm Mali-G52 GPU ला सपोर्ट करतो जो 1GHz Graphics core वर चालतो.
Tecno Spark 8P स्मार्टफोन 4GB RAM सह लाँच झाला आहे, सोबतीला 3जीबी वचुर्अल रॅम देण्यात आल्यामुळे एकूण 7GB RAM ची परफॉर्मन्स फोनमधून मिळते. या फोनमध्ये 64GB Storage देण्यात आली आहे जी 512GB पर्यंत वाढवता येते. हा फोन IPX2 स्प्लॅश रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. Tecno Spark 8P मध्ये 5000mAh Battery देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये हा फोन 25 दिवस स्टँडबाय टाइम देऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय iQOO 9T; लाँच पूर्वीच Unboxing व्हिडीओ वायरल
फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलच्या अन्य दोन लेन्सला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो तसेच एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. विशेष म्हणजे कंपनीनं फ्रंटला देखील ड्युअल फ्लॅशलाईट दिली आहे.















