गेल्या आठवड्यात बातमी आली होती की चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आपल्या आयकू 9 सीरिजचा विस्तार करणार आहे. कंपनी लवकरच आपला नवीन फोन iQOO 9T 5G भारतात लाँच करणार आहे. आता कंपनीनं या फोनसंबंधित एक ट्विट केलं आहे. त्यातून फोनच्या डिजाईनसह काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. iQOO 9T 5G स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह बाजारात येईल, तसेच फोनच्या बॅक पॅनलवर BMW थीम स्ट्रिप डिजाइन मिळेल. तसेच कंपनीनं आता या स्मार्टफोनच्या ब्लॅक कलर व्हेरिएंट शेयर केला आहे. तसेच पोस्टरमधून सांगितलं आहे की हा फोन अॅमेझॉन स्पेशल असेल, त्यामुळे अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हा हँडसेट लाँच केला जाऊ शकतो.
iQOO 9T 5G ची डिजाइन
iQOO 9T स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेमसह व्हाईट आणि ब्लॅक अशा दोन रंगात सादर होईल. दोन्ही फोन ड्युअल टोन डिजाइनसह येतील. व्हाईट व्हेरिएंट BMW थीम स्ट्रिपसह सादर करण्यात येईल. दोन्ही मॉडेलच्या वरच्या बाजूला कॅमेरा मॉड्यूल ब्लॅक कलरमधेच असेल, जो संपूर्ण वरच्या पॅनलमध्ये असेल. तसेच खालच्या बाजूला USB-C पोर्टसह तुम्हाला लाउडस्पिकर ग्रिल मिळेल. लिक्सनुसार, फोनमध्ये फोनमध्ये पंच होल डिस्प्ले मिळू शकतो. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग व्हिडीओ देखील युट्युबवर वायरल झाला होता. हे देखील वाचा: 11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात; या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत
iQOO 9T 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.78-इंच, FHD+ AMOLED 120Hz रिफ्रेश रेट
- Qualcomm Snapdragon 8+ Gen1
- 12GB LPDDR5 RAM
- 256GB UFS 3.1
- 50MP + 12MP + 2MP
- 16MP सेल्फी कॅमेरा
- 4700mAh,125W फास्ट चार्जिंग
आगामी आयकू फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. परफॉर्मन्ससाठी कंपनी यात Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर देऊ शकते. सोबतीला 12GB LPDDR5 RAM मिळू शकतो, तसेच फोनमध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. कंपनीचा इतिहास पाहता या फोनमध्ये देखिली व्हेपर कूलिंग चेंबर मिळू शकतो त्यामुळे गेमिंग सारखे हेव्ही टास्क देखील हा फोन न गरम होता करू शकेल. हे देखील वाचा: नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात
फोटोग्राफीसाठी विवोच्या फ्लॅगशिप फोनप्रमाणे iQOO 9T 5G मध्ये तुम्हाला V1+ इमेजिंग चिप मिळेल. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात 50MP चा Samsung GN5 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल. तसेच 12MP चा वाईड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. फ्रंटला कंपनी 16MP चा सेल्फी कॅमेरा देऊ शकते. पावर बॅकअपसाठी आगामी फ्लॅगशिप आयकू फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी मिळू शकते आणि यात तुम्हाला 125 वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.
















