JioPhone 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Jun 2023 05:13:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio Phone 5G आला समोर! पाहा फर्स्ट लुक आणि स्पेसिफिकेशन्स; 10 हजारांपेक्षा कमी असू शकते किंमत https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-image-revealed-price-specifications-and-feature/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-image-revealed-price-specifications-and-feature/#respond Fri, 23 Jun 2023 05:11:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21725 Jio Phone 5G लवकरच बाजारात एंट्री करू शकतो. जेव्हापासून मुकेश अंबानींनी फोनचा उल्लेख केला आहे तेव्हापासून भारतीय मोबाइल युजर्स ह्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीनं आतापर्यंत रिलायन्स जियोच्या 5जी फोन लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एका नवीन लीकमध्ये जियो फोन 5जीची लाइव्ह ईमेज समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक आणि अनेक महत्वाच्या […]

The post Jio Phone 5G आला समोर! पाहा फर्स्ट लुक आणि स्पेसिफिकेशन्स; 10 हजारांपेक्षा कमी असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियो फोन 5 च्या फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे
  • Jio Phone 5G चा बॅक पॅनल प्लास्टिकचा वाटत आहे
  • फोटोमध्ये दिसलेला फोन Jio 5G n78 Band वर चालत आहे.

Jio Phone 5G लवकरच बाजारात एंट्री करू शकतो. जेव्हापासून मुकेश अंबानींनी फोनचा उल्लेख केला आहे तेव्हापासून भारतीय मोबाइल युजर्स ह्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीनं आतापर्यंत रिलायन्स जियोच्या 5जी फोन लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एका नवीन लीकमध्ये जियो फोन 5जीची लाइव्ह ईमेज समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Jio Phone 5G चा लुक

फ्रंट पॅनल : जियो फोन 5 च्या फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो ‘यू’ शेप आहे. ह्या नॉचच्या वरच्या बाजूला स्पिकर देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. डिस्प्लेवरच टच नेव्हिगेशन बटन दिसत आहेत.

  • रियर पॅनल : Jio Phone 5G चा बॅक पॅनल प्लास्टिकचा वाटत आहे जो काढता येईल. इथे वरच्या बाजूला वर्टिकल शेप ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात दोन लेन्स आणि एक फ्लॅश आहे. पॅनलच्या मध्यभागी ‘Jio’ लोगो आहे तर खालच्या बाजूला ‘5G’ लिहिण्यात आलं आहे. रियर पॅनलच्या दोन्ही बाजूंना डॉट्स आहेत. तर सर्वात खाली ‘ultimate speed, unlimited experiences’ लिहिण्यात आलं आहे.
  • साइड पॅनल : समोर आलेल्या फोटोजमध्ये रिलायन्स जियोच्या 5जी फोनचा साइड पॅनल्स दिसत नाही परंतु उजवीकडे वॉल्यूम रॉकर दिसत आहे. त्याच्या खाली पावर बटन देखील आहे. तर खालच्या पॅनलवर स्पिकर आणि यूएसबी पोर्ट मिळू शकतो.

    Jio Phone 5G इंटरनेट स्पीड

    समोर आलेल्या फोटोमध्ये जियो फोन 5जी वर 5जी सर्व्हिस वापरलेली आहे तसेच ह्या इंटरनेट स्पीड टेस्टिंगमध्ये 470.17Mbps डाउनलोड स्पीड आणि 34.25Mbps अपलोड स्पीड मिळत आहे. फोटोमध्ये मोबाइलचे लोकेशन लखनऊ, उत्तर प्रदेश आहे जिथे जियो 5जी फोनमध्ये 24ms लेटेंसी मिळत आहे. फोटोमध्ये दिसलेला फोन Jio 5G n78 Band वर चालत आहे.

    Jio Phone 5G प्राइस (लीक)

    जियो फोन 5जीची किंमत भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, अशी चर्चा आहे. तर लीकनुसार Jio Phone 5G यावर्षी दिवाळी नंतर भारतीय बाजारात येऊ शकतो. म्हणजे मुकेश अंबानी अपने 5जी फोन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान लाँच करू शकतात.

    Jio Phone 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • 6.5″ HD+ Display
    • 13MP + 2MP Rear Camera
    • 5MP Selfie Camera
    • Pragati OS
    • 5,000mAh Battery
    • स्क्रीन : जियो फोन 5जी 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनू शकते ज्यावर 60हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
    • ओएस : Jio Phone 5G मध्ये Pragati OS दिला जाऊ शकतो ज्याची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे. ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये भारतीय स्थानिक भाषांचा सपोर्ट देखील मिळतो.
    • प्रोसेसर : समोर आलेल्या नवीन लीकनुसार जियो फोन 5जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 किंवा यूनिसोक 5जी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच जुन्या लीकमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट असल्याचं समोर आलं आहे.
    • मेमरी : हा 5जी मोबाइल फोन 4 जीबी रॅम + 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह लाँच होऊ शकतो ज्यात एक्स्ट्रनल मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील दिला जाईल.
    • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी च्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो.
    • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या रिलायन्स जियो 5जी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

    The post Jio Phone 5G आला समोर! पाहा फर्स्ट लुक आणि स्पेसिफिकेशन्स; 10 हजारांपेक्षा कमी असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-image-revealed-price-specifications-and-feature/feed/ 0 जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-leaked-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-leaked-india-launch-soon/#respond Thu, 08 Dec 2022 06:30:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15786 Mukesh Ambani यंदा रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा केली होती की कंपनी आपल्या 5जी फोनवर काम करत आहे. तेव्हापासून भारतीय या 5जी मोबाइलची आतुरतेने वाट बघत आहेत. Reliance Jio 5G Services भारतात सुरु झाली आहे आणि आता कंपनी आपल्या Jio Phone 5G ची देखील तयारी केली आहे. रिलायन्स जियोनं अद्याप जियोफोन 5जीच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती […]

    The post जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Mukesh Ambani यंदा रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा केली होती की कंपनी आपल्या 5जी फोनवर काम करत आहे. तेव्हापासून भारतीय या 5जी मोबाइलची आतुरतेने वाट बघत आहेत. Reliance Jio 5G Services भारतात सुरु झाली आहे आणि आता कंपनी आपल्या Jio Phone 5G ची देखील तयारी केली आहे. रिलायन्स जियोनं अद्याप जियोफोन 5जीच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु हा अफॉर्डेबल 5जी फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट झालं आहे की लवकरच Jio Phone 5G भारतात लाँच होणार आहे.

    Reliance Jio Phone 5G Launch ची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग काल रात्रीची म्हणजे 7 डिसेंबर 2022 ची आहे जिथे जियोफोन 5जी Jio LS1654QB5 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे JioPhone5G या नावावरील पडदा उठला आहे आणि कन्फर्म झालं आहे की हा स्वस्त 5जी फोन लवकरच लाँच होणार आहे. हे देखील वाचा: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Oppo लाँच करणार 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip ची लाँच डेट कंफर्म

    Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

    गीकबेंच लिस्टिंगमध्ये जियोफोन 5जी अँड्रॉइड 12 ओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनमध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल हे समजलं आहे. गीकबेंचनुसार, हा स्मार्टफोन 2.21गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लाँच होईल तसेच या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट (Qualcomm Snapdragon 480+) मिळेल. ग्राफिक्ससाठी जियोफोन 5जी मध्ये एड्रेनो 619 जीपीयू दिला जाऊ शकतो.

    Jio Phone 5G चे संभाव्य स्पेक्स

    लीक्सनुसार Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो.

    फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा: 11GB RAM ची ताकद असलेल्या स्वस्त 5G Phone वर बंपर सूट; अशी आहे Realme 9 5G वरील ऑफर

    सर्वात स्वस्त 5जी फोन

    Jio Phone 5G भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) असू शकतो. काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टनुसार रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन जियोफोन 5जी 8,000 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार या फोनची किंमत 8 हजार ते 12 हजार पर्यंत असू शकते. फोनच्या ठोस किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डिटेल्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

    The post जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-leaked-india-launch-soon/feed/ 0